पंतप्रधान पिक विमा योजना 2025 : शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार पैसे

पंतप्रधान पिक विमा योजना 2025 : शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार पैसे

पंतप्रधान पिक विमा योजना 2025 लवकरच जमा होणार शेतकऱ्यांच्या बँक खात्यात.

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी दिलासा देणारी बातमी आहे. ११ ऑगस्ट २०२५ रोजी म्हणजेच उद्या पंतप्रधान पिक विमा योजना २०२५ अंतर्गत खरीप २०२३ आणि रब्बी २०२३–२४ हंगामातील बाकी राहिलेली नुकसान भरपाईची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाणार आहे.

विशेष म्हणजे ज्या पद्धतीने पीएम किसान सन्मान निधीचे पैसे शेतकऱ्यांना पाठविले जातात अगदी तशाच पद्धतीने हि रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केली जाणार आहे.
एकूण ₹९२१ कोटींची नुकसान भरपाई शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केली जाणार असून, यामध्ये खरीप हंगामासाठी ₹८०९ कोटी आणि रब्बी हंगामासाठी ₹११२ कोटीची रक्कम असेल.

यावेळी प्रथमच DBT (Direct Benefit Transfer) पद्धतीने सर्व शेतकऱ्यांच्या खात्यात एकाच दिवशी रक्कम जमा होणार आहे.

पुढील लेखपण वाचा आई कर्ज योजना अंतर्गत मिळणार बिनव्याजी १५ लाख रुपये कर्ज

नुकसानभरपाई का रखडली?

२०२३ च्या खरीप व २०२३–२४ च्या रब्बी हंगामात अवकाळी पाऊस, गारपीट, दुष्काळ, कीडरोग आदी कारणांमुळे राज्यातील अनेक शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले होते.

पिक विमा घेतलेल्या शेतकऱ्यांनी नुकसानभरपाईसाठी दावा केला होता, मात्र राज्य सरकारने विमा कंपन्यांना आपला हिस्सा असलेला ₹१,०२८.९७ कोटी प्रीमियम वेळेत भरला नव्हता.
हा नुकसानभरपाईचा हप्ता १३ जुलै २०२५ रोजीच जमा झाल्याने नुकसान भरपाई वितरणाची प्रोसेस उशीराने सुरू झाली.

या हंगामात एकूण ९५ लाख ६५ हजार शेतकऱ्यांना ₹४,३९७ कोटींची भरपाई मिळणे अपेक्षित होते.
यापैकी—

  • ८० लाख ४० हजार शेतकऱ्यांना आधीच ₹३,५८८ कोटी वितरित करण्यात आले आहेत.
  • उर्वरित १५ लाख २५ हजार शेतकऱ्यांना ₹८०९ कोटी (खरीप) आणि ₹११२ कोटी (रब्बी) असे एकूण ₹९२१ कोटी उद्या म्हणजेच दिनांक ११ ऑगस्ट २०२५ रोजी मिळणार आहेत.

डीबीटी पद्धतीचा नवा टप्पा – पंतप्रधान पिक विमा योजना २०२५ मधील बदल

यापूर्वी पिक विम्याची भरपाई विमा कंपन्यांकडून थेट दिली जात असे. मात्र, या वेळी पीएम किसान सन्मान निधीच्या धर्तीवर डीबीटी पद्धतीने रक्कम वितरित केली जाणार असल्याने यातून खालील फायदा होणार आहे.
डीबीटीचे फायदे:

  • थेट व पारदर्शक व्यवहार
  • वेळेत भरपाई मिळणे
  • मध्यस्थ व कागदोपत्री विलंब कमी होणे.

पंतप्रधान पिक विमा योजना 2025 शेतकऱ्यांना होणार फायदा

१. तातडीची आर्थिक मदत

गेल्या हंगामातील नुकसानामुळे अनेक शेतकरी कर्जबाजारी झाले आहेत. या भरपाईमुळे ते कर्ज फेडणे, बियाणे-खत खरेदी करणे आणि शेती पुनर्संचयित करणे शक्य होईल.

२. विश्वासार्हता वाढविणे

सरकारने पिक विमा योजनेअंतर्गत वेळेत रक्कम देण्याचा प्रयत्न केल्याने शेतकऱ्यांचा विश्वास वाढेल.

३. पुढील हंगामासाठी प्रोत्साहन

सध्याच्या खरीप हंगामात लागवड व पेरणीसाठी लागणारे भांडवल मिळाल्याने शेतकरी पुढील हंगामासाठी सज्ज होतील.

खरीप २०२३ भरपाई तपशील.

  • एकूण लाभार्थी: १५ लाख २५ हजार शेतकरी.
  • एकूण रक्कम: ₹८०९ कोटी.

रब्बी २०२३-२४ भरपाई तपशील.

  • एकूण लाभार्थी: त्याच शेतकऱ्यांपैकी पात्र असलेले.
  • एकूण रक्कम: ₹११२ कोटी.

पंतप्रधान पिक विमा योजना 2025 संदर्भात तुमच्या काही शंका असतील तर कमेंट्स करू शकता.

पंतप्रधान पिक विमा योजनेत ९२१ कोटींची भरपाई कधी मिळणार?

भरपाई सोमवारी, ११ ऑगस्ट २०२५ रोजी थेट डीबीटीद्वारे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे.

खरीप व रब्बी हंगामातील किती भरपाई दिली जाणार आहे?

खरीप हंगामासाठी ₹८०९ कोटी आणि रब्बी हंगामासाठी ₹११२ कोटी, अशा एकूण ₹९२१ कोटींचा भरणा होईल.

डीबीटी पद्धतीने पैसे देण्याचे फायदे कोणते?

डीबीटी पद्धतीमुळे भरपाई थेट लाभार्थ्याच्या बँक खात्यात जाते, पारदर्शकता वाढते, विलंब कमी होतो आणि फसवणूक टळते.

भरपाई वितरणात विलंब का झाला?

राज्य सरकारचा ₹१०२८ कोटींचा विमा हप्ता उशिरा भरल्यामुळे भरपाई वितरण लांबले. तो १३ जुलै २०२५ रोजी भरल्यानंतर प्रक्रिया सुरू झाली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *