भजनी मंडळ अनुदान अर्ज सुरु – 25 हजार रुपये मिळणार अनुदान

भजनी मंडळ अनुदान अर्ज सुरु – 25 हजार रुपये मिळणार अनुदान

भजनी मंडळ अनुदान सुरु झाले असून एका भजनी मंडळास साहित्य खरेदी करण्यासाठी २५ हजार रुपये मिळणार आहेत. यासाठी ऑनलाईन अर्ज करावा लागणार आहे. हि संपूर्ण प्रोसेस आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत.

महाराष्ट्र राज्य हे संस्कृती आणि परंपरेचा वारसा जपणारे राज्य आहे. सण-उत्सव, धार्मिक कार्यक्रम आणि गावोगावी होणाऱ्या कीर्तन-भजनांच्या परंपरेत भजनी मंडळांचे महत्त्वाचे योगदान आहे.

गावातील भजनी मंडळीना एकत्र आणून सामाजिक, सांस्कृतिक आणि धार्मिक जागर निर्माण करणाऱ्या या मंडळांना राज्य शासनाकडून आता थेट आर्थिक सहाय्य मिळणार आहे.

या संदर्भातील भजनी मंडळ अनुदान योजना ऑनलाईन अर्ज सुरु झाले असून अर्ज करण्याची अंतिम मुदत ६ सप्टेंबर २०२५ आहे.

पुढील माहितीपण वाचा भजनी मंडळांना 5 कोटीचे अनुदान महाराष्ट्र – शासनाचा नवीन 14 ऑगस्ट 2025 रोजी जी आर आला

भजनी मंडळ अनुदान योजनेचा उद्देश

ग्रामीण भागासह शहरांमध्ये भजनी मंडळे केवळ धार्मिक कार्यक्रमापुरती मर्यादित नसून सामाजिक एकात्मता, संस्कृतीचे जतन आणि नव्या पिढीला पारंपरिक कलेशी जोडण्याचे महत्त्वाचे काम करतात. मात्र, अनेकदा अशा भजनी मंडळांकडे वाद्यसाहित्य खरेदी करण्यासाठी किंवा आवश्यक साधनसामग्रीसाठी पुरेसा निधी नसतो.

या अडचणी लक्षात घेऊन महाराष्ट्र शासनाने ही योजना सुरू केली आहे.

  • भजनी मंडळांना आर्थिक आधार देणे.
  • पारंपरिक वाद्ये, साऊंड सिस्टीम, वेशभूषा यासाठी मदत करणे.
  • ग्रामीण भागात सांस्कृतिक वातावरण बळकट करणे.
  • भजन, कीर्तन आणि सांस्कृतिक कार्यक्रमांना चालना देणे.

भजनी मंडळांसाठी ५ कोटी निधीची तरदूत केली असल्याने अर्ज पात्र झाल्यावर भजनी मंडळांच्या बँक खात्यामध्ये हा निधी जमा होणार आहे.

भजनी मंडळ अनुदान योजना – पात्रता

ही योजना सर्वांसाठी खुली असली तरी योजनेचा लाभ घेण्यासाठी काही अटी घालण्यात आल्या आहेत त्या खालीलप्रमाणे आहेत.

संबंधित मंडळाने शासनाकडे आधीपासून अन्य कोणत्याही समान योजनेसाठी अर्ज केलेला नसावा.

भजनी मंडळाचे नोंदणीकृत अस्तित्व असणे आवश्यक.

मंडळाने गावपातळीवर नियमित सांस्कृतिक उपक्रम राबवलेले असावेत.

अर्ज करताना मंडळाच्या पदाधिकाऱ्यांची संपूर्ण माहिती आणि बँक खात्याचे तपशील आवश्यक राहतील.

पुढील माहिती पण बघा बांधकाम कामगार योजना

योजनेचा लाभ घेण्यासाठी लागणारी कागदपत्रे

भजनी मंडळ अनुदान अर्ज सुरु झाले असून अर्ज सादर करण्याआधी काही कागदपत्रे तुमच्याकडे असुद्या जेणे करून ऑनलाईन अर्ज सादर करतांना कोणतीही अडचण येणार नाही. खालील कागदपत्रे ऑनलाईन अर्ज सादर करतांना अपलोड करायची आहेत.

  • ग्रामपंचायतचा दाखला.
  • कार्यक्रमाचे फोटो.
  • झालेल्या कार्यक्रमाच्या आयोजकाचे पत्र.
  • कार्यक्रमासंदर्भातील दैनिक वृत्तपत्रामध्ये प्रकाशित झालेल्या बातम्यांच्या कात्रणाची छायांकित प्रत.
  • कार्यक्रमाचे निमंत्रण बिल किंवा जाहिरातींचे कात्रण.

भजनी मंडळ अनुदान योजना ऑनलाईन अर्ज प्रक्रिया

या योजनेचा सर्व अर्ज प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन पद्धतीने केली जात आहे. यासाठी शासनाची अधिकृत वेबसाईट आहे – www.mahaanudan.org.

भजनी मंडळ ऑनलाईन नोंदणी करण्याची पद्धत

भजनी मंडळाची नोंदणी करणे आवश्यक आहे. हि नोंदणी करण्याची पद्धत कशी आहे जाणून घ्या या संदर्भातील माहिती.

विभाग निवडावा ( अमरावती, कोकण, छत्रपती संभाजी नगर, नागपूर, नाशिक व पुणे यापैकी एक विभाग निवडावा. )

जिल्हा तालुका व ग्रामपंचायत निवडावी.

भजनी मंडळाचे नाव.

मंडळाचा पत्ता.

मोबाईल नंबर व इमेल आयडी असेल तर तो नोंदवून सबमिट या बटनावर क्लिक करावे.

अशा पद्धतीने भजनी मंडळाची ऑनलाईन नोंदणी केली जाते.

असा करा ऑनलाईन अर्ज

  1. प्रथम www.mahaanudan.org या संकेतस्थळावर भजनी मंडळाची नोंदणी करा.
  2. नोंदणी केल्यानंतर मोबाईल नंबर टाका त्यावर आलेला ओटीपी दिलेल्या चौकटीत टाका आणि लॉगीन करा.
  3. “भजनी मंडळ भांडवली अर्ज” या पर्यायावर क्लिक करा.
  4. अर्ज ओपन होईल यामध्ये माहिती भरण्यास सुरुवात करा.

अर्जामध्ये बँक तपशील, भजनी मंडळाने केलेले कामे आणि कागदपत्रे अपलोड अशी प्रोसेस आहे. या संदर्भातील सविस्तर माहितीचा खालील व्हिडीओ पहा आणि त्या पद्धतीने तुमचा अर्ज सादर करून द्या.

अर्ज करण्याची महत्त्वाची दिनांक

  • अर्जाची सुरुवात: २३ ऑगस्ट २०२५
  • अर्जाची अंतिम तारीख: ६ सप्टेंबर २०२५
  • अर्ज करण्यासाठी संकेतस्थळ: www.mahaanudan.org

भजनी मंडळांना मिळणारे फायदे

  • प्रत्येकी २५,००० रुपयांचे थेट भांडवली अनुदान
  • या रकमेचा वापर वाद्ये, तबला, पखवाज, हार्मोनियम, झांज, साऊंड सिस्टम किंवा आवश्यक साहित्य खरेदीसाठी करता येईल.
  • गावातील उत्सव अधिक रंगतदार होणार असून नव्या पिढीला संस्कृतीशी जोडण्यास मदत होईल.
  • ग्रामीण पातळीवर कलाकारांना प्रोत्साहन मिळेल.

योजनेत अर्ज करताना घ्यावयाची काळजी

  1. सर्व माहिती अचूक आणि पूर्ण भरावी.
  2. चुकीची माहिती दिल्यास अर्ज बाद होऊ शकतो.
  3. बँक खात्याचे तपशील जुळते असणे आवश्यक आहे.
  4. अर्ज सबमिट केल्यानंतर त्याचा acknowledgment क्रमांक सुरक्षित ठेवावा.

निष्कर्ष

भजनी मंडळ अनुदान योजना ऑनलाईन अर्ज सुरु झाले असून राज्यातील भजनी मंडळांसाठी ही एक मोठी संधी आहे. गणेशोत्सवासारख्या मोठ्या उत्सवाला सांस्कृतिक अधिष्ठान देण्यासाठी शासनाने केलेले हे पाऊल स्वागतार्ह आहे.

👉 तुमचे भजनी मंडळ पात्र असेल तर विलंब न करता ६ सप्टेंबर २०२५ पूर्वी अर्ज करा आणि २५,००० रुपयांचे अनुदान मिळवून सांस्कृतिक कार्य अधिक प्रभावी करा.

भजनी मंडळ अनुदान योजना काय आहे?

महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागामार्फत राज्यातील १८०० भजनी मंडळांना प्रत्येकी ₹२५,०००/- इतके भांडवली अनुदान देण्याची ही योजना आहे.

भजनी मंडळ अनुदान योजना ऑनलाईन अर्ज कधी सुरु झाले?

अर्जाची सुरुवात २३ ऑगस्ट २०२५ रोजी झाली आहे.

या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज कुठे करावा लागेल?

अर्जासाठी अधिकृत संकेतस्थळ आहे – www.mahaanudan.org.

भजनी मंडळ अनुदान योजनेसाठी पात्रता काय आहे?

मंडळ नोंदणीकृत असणे आवश्यक आहे. तसेच मंडळाने नियमित सांस्कृतिक उपक्रम राबवलेले असावेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *