पॉवर टिलर मशीनसाठी ५० टक्के अनुदान अशी करा कागदपत्रे अपलोड

पॉवर टिलर मशीनसाठी ५० टक्के अनुदान अशी करा कागदपत्रे अपलोड

बऱ्याच शेतकरी बांधवानी पॉवर टिलर मशीनसाठी ऑनलाईन अर्ज सादर केलेले होते. त्यांना आता या संदर्भात संदेश येण्यास सुरुवात झालेली आहे.

ज्यांनी ऑनलाईन अर्ज सादर केलेले आहे त्यांना आता संदेश आल्यामुळे नेमके कोणती कागदपत्रे अपलोड करावी लागतात या संदर्भात आपण या लेखामध्ये सविस्तर माहिती जाणून घेणारा आहोत.

ज्यांनी अजूनही पॉवर टिलर मशीनसाठी अजूनही ऑनलाईन अर्ज सादर केलेले नाही त्यांनी ऑनलाईन अर्ज कसा सादर करावा या संदर्भात सविस्तर मार्गदर्शन करणार आहोत.

मशीनसाठी ऑनलाईन अर्ज कशा पद्धतीने सादर करावा निवड झाल्यावर कोणती कागदपत्रे अपलोड करावीत या संदर्भातील सविस्तर माहिती या लेखामध्ये दिलेली आहे त्यामुळे हा लेख संपूर्ण वाचा.

पुढील माहिती पण वाचा भांडे योजना ऑनलाईन अर्ज

पॉवर टिलर मशीन म्हणजे काय?

पॉवर टिलर मशीन हे लहान व मध्यम शेतकऱ्यांसाठी अत्यंत उपयुक्त शेती यंत्र आहे. या मशीनच्या साहाय्याने नांगरणी, फवारणी, माती ढिलविणे, गवत कापणे अशा अनेक शेतीतील कामांमध्ये वेळ आणि मजुरी दोन्हीची बचत होते.

आजच्या आधुनिक शेतीत पॉवर टिलरचा वापर वाढत असून सरकारही यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन देत आहे.

यामुळे अनेक शेतकरी हे मशीन खरेदी करण्यासाठी इच्छुक आहेत परंतु या मशीनसाठी खर्च जास्त येत असल्याने अनेक शेतकरी महाडीबीटी पोर्टलवर यासाठी ऑनलाईन अर्ज करत. योजनेसाठी निवड झाल्यावर शासनाकडून ५० टक्के अनुदान दिले जाते.

पुढील माहिती पण पहा पीएम विश्वकर्मा ओळखपत्र

पॉवर टिलर मशीनसाठी ५० टक्के अनुदान ऑनलाईन अर्ज प्रोसेस

महाडीबीटी वेब पोर्टलवर ऑनलाईन अर्ज करण्याची प्रोसेस खालीलप्रमाणे आहे.

  • महाडीबीटी वेब पोर्टलवर लॉगीन करा.
  • कृषी यांत्रिकीकरण पर्याय निवडा.
  • मुख्य घटक या पर्यायासाठी कृषी यंत्र अवजारांच्या खरेदीसाठी अर्थसहाय्य हा पर्याय निवडा.
  • तपशिलामध्ये पॉवर टिलर हा पर्याय निवडा.
  • अर्ज जतन करून सादर करून द्या.

ऑनलाईन अर्ज लिंक

योजनेसाठी लागणारी कागदपत्रे

जेंव्हा लॉगीन करून कागदपत्रे अपलोड करायची असतात त्यावेळी तीनच पर्याय दिसतात यामध्ये बँक पासबुक, यंत्राचे दरपत्रक आणि वनपट्टाधारक लाभार्थी करिता प्रमाणपत्र दिसतात.

प्रत्यक्षात मात्र यापेक्षा जास्त कागदपत्रे pdf मध्ये एकत्र करून अपलोड करावी लगतात.

  1. बँक पासबुक.
  2. डीलर सर्टिफिकेट.
  3. हमीपत्र.
  4. पंचायत समितीचे संमतीपत्र.
  5. आधार कार्ड दोन्ही बाजूचे
  6. यंत्र खरेदी केल्याचे बिल.

अर्ज मंजूर झाल्यानंतर पुढील प्रक्रिया

कागदपत्रे तपासल्यानंतर विभागीय कृषी कार्यालयाकडून अर्जांची पडताळणी केली जाते. पात्र शेतकऱ्यांना अनुदान मंजूर झाल्याचा संदेश प्राप्त होतो. त्यानंतर शेतकरी अधिकृत विक्रेत्याकडून पॉवर टिलर मशीन खरेदी करून बिल सादर करतो. विभागाकडून खात्यावर अनुदानाची रक्कम थेट जमा केली जाते.

पॉवर टिलर मशीनसाठी ५० टक्के अनुदानाचे फायदे

  • शेतीतील कामाचा वेळ आणि श्रम दोन्ही कमी होतात
  • उत्पादनक्षमता वाढते
  • मजुरीवरील खर्च कमी होतो
  • अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी उपयुक्त

सरकारी अनुदानामुळे आर्थिक भार कमी

निष्कर्ष

पॉवर टिलर मशीनसाठी ५० टक्के अनुदान ही योजना शेतकऱ्यांसाठी एक सुवर्णसंधी आहे. महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करून वेळेत कागदपत्रे सादर केल्यास हे अनुदान सहज मिळू शकते.

आधुनिक शेतीकडे वाटचाल करताना अशा योजनांचा योग्य वापर करणे अत्यावश्यक आहे.

पॉवर टिलर मशीनसाठी ५० टक्के अनुदान मिळण्यासाठी कोणते पात्रतेचे निकष आहेत?

अर्जदार महाराष्ट्रातील रहिवासी शेतकरी असावा, त्याच्याकडे शेतीचा 7/12 उतारा असावा आणि त्याचे नाव त्यावर असणे आवश्यक आहे. तसेच लाभार्थीने यापूर्वी याच घटकाखाली अनुदान घेतलेले नसावे.

पॉवर टिलर मशीनसाठी अर्ज करताना विक्रेत्याचे कोटेशन कुठून घ्यावे?

कोटेशन फक्त शासनाने मान्यता दिलेल्या विक्रेत्याकडून (Authorized Dealer) घ्यावे. खाजगी विक्रेत्यांकडून घेतलेले कोटेशन स्वीकारले जात नाही.

पॉवर टिलर मशीनसाठी अनुदान किती काळात मिळते?

सर्व कागदपत्रे योग्यरित्या सादर करून पडताळणी पूर्ण झाल्यास साधारण ३० ते ६० दिवसांच्या आत शेतकऱ्याच्या बँक खात्यावर अनुदान जमा केले जाते.

पॉवर टिलर मशीनची क्षमता (HP) निवडताना काय लक्षात घ्यावे?

शेताचा आकार आणि जमिनीचा प्रकार पाहून मशीनची क्षमता ठरवावी. लहान शेतीसाठी ८–१२ HP तर मध्यम शेतीसाठी १२–१५ HP पॉवर टिलर अधिक उपयुक्त ठरतो.

पॉवर टिलर अनुदान अर्ज नाकारला गेल्यास काय करावे?

अर्ज नाकारल्याचे कारण महाडीबीटी पोर्टलवर “Application Status” मध्ये दिसते. आवश्यक दुरुस्त्या करून पुन्हा अर्ज सादर करता येतो किंवा स्थानिक कृषी अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *