बीजभांडवल कर्ज योजनेसाठी अर्ज सुरु – कोण करू शकते अर्ज पात्रता कागदपत्रे संपूर्ण माहिती.

बीजभांडवल कर्ज योजनेसाठी अर्ज सुरु – कोण करू शकते अर्ज पात्रता कागदपत्रे संपूर्ण माहिती.

बीजभांडवल कर्ज योजनेसाठी अर्ज सुरु पात्र लाभार्थींनी अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

बऱ्याचदा केवळ कर्ज न मिळाल्याने अनेकजण आपला उद्योग व्यवसाय करू शकत नाही. त्यामुळे उद्योग किंवा व्यवसाय करण्यासाठी योग्य वेळी कर्ज मिळाले तर फायदा होऊ शकतो.

तुम्ही जर दिव्यांग असाल किंवा तुमच्या मित्रपरिवारातील कोणी दिव्यांग असेल तर त्यांच्यासाठी आनंदाची बातमी आहे. दिव्यांग व्यक्तींसाठी बीजभांडवल योजनेसाठी अर्ज सुरु झालेले आहेत.

दिव्यांग व्यक्तींना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवणे हा सामाजिक विकासाचा महत्त्वाचा उद्देश आहे. याच उद्देशाने शासनामार्फत “बीज भांडवल योजना” राबविण्यात येत असून, या योजनेअंतर्गत दिव्यांग व्यक्तींना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी आर्थिक सहाय्य दिले जाते.

खालील योजना पण पहा.

आई कर्ज योजना 2025

बीजभांडवल योजनेतून कर्ज घेवून करता येतात छोटे मोठे व्यवसाय

स्वयंरोजगाराच्या माध्यमातून स्वावलंबी जीवन जगण्याची संधी या योजनेतून अनेक लाभार्थींना मिळत आहे.

ही योजना विशेषतः त्या दिव्यांग व्यक्तींसाठी आहे ज्या स्वतःचा छोटा-मोठा व्यवसाय सुरू करू इच्छितात, पण भांडवलाअभावी अडचणी येतात.

दुकाने, सर्व्हिस सेंटर, दुचाकी दुरुस्ती, किराणा दुकान, बेकरी, मोबाईल रिपेअरिंग, शिवणकाम व्यवसाय, ब्युटी पार्लर, ऑनलाइन सेवा केंद्र अशा विविध व्यवसायांसाठी या योजनेतून मदत दिली जाते.

योजनेचा उद्देश काय आहे?

बीजभांडवल कर्ज योजनेसाठी अर्ज सुरु झालेले आहेत आणि अनेकजण यासाठी अर्ज देखील करणार आहेत. परंतु या योजनेचा उद्देश काय आहे ते समजून घेणे महत्वाचे आहे.

बीज भांडवल योजनेचा मुख्य उद्देश दिव्यांग व्यक्तींना आर्थिकदृष्ट्या स्वयंपूर्ण करणे हा आहे. या योजनेमुळे दिव्यांग नागरिकांना नोकरीवर अवलंबून न राहता स्वतःचा व्यवसाय उभारण्याची प्रेरणा मिळते. यामुळे समाजातील या घटकाला सन्मानाचे जीवन जगण्याची संधी प्राप्त होते.

अर्ज करताना आवश्यक असलेली कागदपत्रे

या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदाराने काही महत्त्वाची कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहे. त्यामध्ये

वैध दिव्यांगत्व प्रमाणपत्र.

दोन पासपोर्ट साईज फोटो.

जन्मतारीख किंवा वयाचा दाखला.

तहसीलदारांकडून प्राप्त केलेला उत्पन्नाचा दाखला (वार्षिक उत्पन्न एक लाख रुपयांपर्यंत दर्शविणारा).

रहिवासी दाखला.

बीजभांडवल कर्ज योजनेसाठी अर्ज सुरु झालेले असून कोणकोणती कागदपत्रे लागतात या संदर्भातील खालील व्हिडीओ पहा.

रेशन कार्ड यांचा समावेश आहे.

यासोबतच दोन प्रतिष्ठित व्यक्तींचे दाखले (नगरसेवक, सरपंच, ग्रामसेवक किंवा संबंधित अधिकाऱ्यांकडून).

सुरु करावयाच्या व्यवसायाचे खरेदी कोटेशन (रु. १.५० लाखांपर्यंत).

राष्ट्रीयकृत बँकेचे नाव व शाखेचा तपशील.

चार्टर्ड अकाउंटंटकडून तयार केलेला व्यवसायाचा प्रोजेक्ट रिपोर्ट.

ज्या ठिकाणी व्यवसाय सुरु करणार आहात त्या जागेची मालकी किंवा भाडे कराराची कागदपत्रे सादर करणे बंधनकारक आहे.

तसेच, बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या संबंधित वॉर्ड कार्यालयात नोंदणी असल्याची कागदपत्रे, जागेचे संमतीपत्र, भाडे प्रमाणपत्र आणि आवश्यक असल्यास शॉप अ‍ॅक्ट लायसन्ससारखी परवानेही अर्जासोबत जोडावी लागतात.

अधिकृत माहितीची लिंक

अर्ज कोठे करावा?

इच्छुक दिव्यांग व्यक्तींनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी, मुंबई उपनगर यांच्या कार्यालयाशी थेट संपर्क साधावा. हे कार्यालय प्रशासकीय इमारत, चौथा मजला, आर.सी. मार्ग, चेंबूर (पूर्व), मुंबई – ७१ येथे आहे.

या कार्यालयामध्ये या योजनेचे अर्ज नमुने मोफत उपलब्ध असून, आवश्यक मार्गदर्शन देखील दिले जाते. नव्याने व्यवसाय सुरू करू इच्छिणाऱ्या दिव्यांग व्यक्तींनी ही सुवर्णसंधी दवडू नये, असे आवाहन अधिकाऱ्यांकडून करण्यात आले आहे.

निष्कर्ष

बीज भांडवल योजना ही केवळ आर्थिक मदत देणारी योजना नसून, दिव्यांग व्यक्तींच्या आत्मविश्वासाला नवी दिशा देणारी महत्त्वाची पायरी आहे.

योग्य माहिती, पूर्ण कागदपत्रे आणि वेळेवर केलेला अर्ज यामुळे या योजनेचा लाभ सहज मिळू शकतो. त्यामुळे पात्र दिव्यांग बांधवांनी पुढे येऊन या योजनेचा लाभ घ्यावा आणि स्वतःच्या पायावर उभे राहावे.

बीज भांडवल योजना म्हणजे काय?

बीज भांडवल योजना ही शासनामार्फत दिव्यांग व्यक्तींना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी आर्थिक मदत देणारी योजना आहे. या योजनेचा मुख्य उद्देश दिव्यांग व्यक्तींना स्वावलंबी बनवणे व त्यांना स्वयंरोजगाराची संधी उपलब्ध करून देणे हा आहे.

या योजनेचा लाभ कोण घेऊ शकतो?

ही योजना भारतातील व महाराष्ट्र राज्यातील कायमस्वरूपी रहिवासी असलेल्या दिव्यांग व्यक्तींसाठी आहे. ज्यांच्याकडे वैध दिव्यांगत्व प्रमाणपत्र आहे आणि जे स्वतःचा व्यवसाय सुरू करू इच्छितात, ते या योजनेसाठी अर्ज करू शकतात.

अर्ज करण्यासाठी कोणती कागदपत्रे लागतात?

दिव्यांगत्व प्रमाणपत्र
आधार कार्ड
जन्मतारीख किंवा वयाचा दाखला
उत्पन्नाचा दाखला
रहिवासी दाखला
रेशन कार्ड
दोन पासपोर्ट साईज फोटो
व्यवसायाचे कोटेशन
बँक खात्याची माहिती
प्रोजेक्ट रिपोर्ट (चार्टर्ड अकाउंटंट कडून)

अर्ज कसा करायचा?

सध्या या योजनेसाठी अर्ज ऑफलाईन पद्धतीने केला जातो. अर्जाचा नमुना जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी कार्यालयात मिळतो. संपूर्ण भरलेला अर्ज व सर्व कागदपत्रे जोडून संबंधित कार्यालयात दोन प्रतीत सादर करावा लागतो.

प्रोजेक्ट रिपोर्ट म्हणजे काय?

प्रोजेक्ट रिपोर्ट म्हणजे आपण कोणता व्यवसाय सुरू करणार आहोत, त्यासाठी किती खर्च येईल, अपेक्षित नफा किती असेल, आणि तो व्यवसाय कसा चालविला जाईल यांचा सविस्तर अहवाल. हा अहवाल साधारणपणे चार्टर्ड अकाउंटंट (CA) कडून तयार करून घेतला जातो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *