२०२५ या वर्षासाठी गाय म्हैस अर्ज सुरु झाले असून हे अर्ज विदर्भ व मराठवाडा या भागातील १९ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना करता येणार आहेत.
ग्रामीण भागातील पशुपालकांचे उत्पन्न वाढावे, दुग्धव्यवसाय अधिक सक्षम व्हावा आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढावा यासाठी राज्य शासनाने विदर्भ–मराठवाडा दुग्धविकास प्रकल्प (VMDP) – टप्पा दोन सुरू केला आहे.
हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प सन २०२४–२५ ते २०२७–२८ या चार वर्षांच्या कालावधीत १९ जिल्ह्यांमध्ये राबविण्यात येणार आहे.
खालील योजनेचा पण लाभ घ्या.
शेतात जाण्यासाठी बैलगाडी रस्ता
ग्रामीण पशुपालकांच्या आर्थिक उन्नतीवर भर
गाय म्हैस अर्ज सुरु झाले असूनया प्रकल्पाचा मुख्य उद्देश ग्रामीण भागातील लहान व मध्यम पशुपालकांची आर्थिक स्थिती मजबूत करणे हा आहे.
वाढते पशुखाद्य दर, कमी दूध उत्पादन आणि आधुनिक सुविधांचा अभाव यामुळे अनेक पशुपालक अडचणीत आहेत. या पार्श्वभूमीवर शासनाने अनुदानाच्या माध्यमातून विविध दुग्धविकास योजना उपलब्ध करून दिल्या आहेत.
खालील योजना पण पहा.
५० टक्के अनुदानावर उच्च दूध उत्पादन देणारी दुधाळ जनावरे
विदर्भ–मराठवाडा दुग्धविकास प्रकल्प (VMDP) – टप्पा दोन योजनेअंतर्गत गाय म्हैस अर्ज सुरु झाले असून राज्यातील पशुपालकांना दुधाळ गाय किंवा गाई-म्हशींचे वाटप ५०% अनुदानावर हि जनावरे मिळणार आहेत.
अनेक शेतकरी आपल्या शेतीला जोड व्यवसाय म्हणून दुग्ध व्यवसाय करत असतात. तुम्हाला देखील या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर ऑनलाईन अर्ज सादर करून द्या.
या योजनेतून कमी भांडवल असलेल्या पशुपालकांनाही चांगल्या प्रतीची जनावरे घेणे आता शक्य होणार आहे. यामुळे दूध उत्पादनात वाढ होऊन शेतकऱ्यांना किंवा पशुपालकांना उत्पन्नाचा स्रोत उपलब्ध होईल.
७५% अनुदानावर गाभण कालवड – भ्रूण प्रत्यारोपणासह
या प्रकल्पातील आणखी एक महत्त्वाची योजना म्हणजे सात महिन्यांची गाभण कालवड. ही कालवड भ्रूणप्रत्यारोपण (Embryo Transfer) तंत्रज्ञानाद्वारे तयार केलेली असून, ती ७५ टक्के अनुदानावर दिली जाणार आहे.
या आधुनिक तंत्रज्ञानामुळे भविष्यात उच्च प्रतीची, अधिक दूध देणारी जनावरे पशुपालकांना मिळण्यास मदत होणार आहे.
पशुखाद्यांवर आकर्षक अनुदान
दुग्धव्यवसायात योग्य आहाराला फार महत्त्व आहे. हे लक्षात घेऊन शासनाने खालील पशुखाद्यांवर अनुदान जाहीर केले आहे:
- प्रजनन पूरक खाद्य – २५% अनुदान
- फॅट व SNF वर्धक खाद्य – २५% अनुदान
- मुरघास (सायलेज) – २५% अनुदान
या खाद्यांमुळे जनावरांचे आरोग्य सुधारेल, दूधातील फॅट व SNF वाढेल आणि एकूण दूध उत्पादनात लक्षणीय वाढ होईल. यामुळे शेतकऱ्यांचा दुग्ध उत्पादनावरील खर्च कमी होऊन उत्पादनात वाढ होईल.
कडबा कुट्टी यंत्रावर ५०% अनुदान
कडबा कुट्टी यंत्र शेतकऱ्यांसाठी खूपच आवश्यक आहे. ग्रामीण भागतील शेतकरी बांधव दुधाळ जनावरांबरोबरीने कामासाठी बैल देखील पळतात. यामुळे त्यांना चाऱ्यासाठी हे कडबा कुट्टी मशीन खूप कामी येते.
दुधाळ जनावरांना पौष्ठिक कडबा कुट्टी यंत्र ५० टक्के अनुदानावर उपलब्ध करून दिले जाणार आहे. यामुळे वेळ, श्रम आणि खर्चात बचत होऊन पशुपालकांचा दुग्धव्यवसाय अधिक शाश्वत बनेल.
कोण अर्ज करू शकतो?
या योजनांचा लाभ घेण्यासाठी अर्जदार हा संबंधित जिल्ह्यातील म्हणजेच विदर्भ किंवा मराठवाड्यातील दिलेल्या १९ जिल्ह्यातील पशुपालक असणे आवश्यक आहे.
त्याच्याकडे किमान १ तरी दुधाळ जनावर असणे आवश्यक आहे, जनावरांची काळजी घेण्याची क्षमता आणि दुग्धव्यवसाय करण्याची तयारी असावी.
त्यामुळे तुम्ही किंवा तुमच्या मित्र परीवरील कोणी या योजनेसाठी पात्र असतील तर गाय म्हैस अर्ज सुरु झाले आहे तुमचा अर्ज सादर करून द्या.
योजनेसाठी लागणारी कागदपत्रे
गाय म्हैस अर्ज सुरु झाले असून या योजनेचा लाभ घेण्यासाठी पशुपालकाकडे खालील कागदपत्रे असणे आवश्यक आहे.
- अर्जदाराचे आधार कार्ड स्कॅन करून ठेवावे.
- राशन कार्ड.
- राशन कार्डवरील सर्व सदस्यांचे आधार नंबर.
- फार्मर पोअरर कोड.
- दुध खरेदी प्रमाणपत्र.
- सातबारा.
- पशुआधार कार्ड. (त्यावरील tag number)
- बँक पासबुक.
इत्यादी कागदपत्रे सोबत असू द्या. यातील अर्जदाराचे आधार कार्ड आणि राशन कार्ड स्कॅन करून ठेवा कारण हि कागदपत्रे अपलोड करावी लागतात.
ऑनलाईन अर्ज कसा करायचा खालील व्हिडीओ पहा
या सर्व योजनांचा लाभ घेण्यासाठी पशुपालकांनी ऑनलाईन अर्ज करणे बंधनकारक आहे. ऑनलाईन संदर्भातील खालील व्हिडीओ पहा आणि त्या प्रमाणे तुमचा अर्ज सादर करून द्या. गाय म्हैस अर्ज सुरु झाले असून तुमचा किंवा तुमच्या मित्रांचा अर्ज खालील व्हिडीओ प्रमाणे सादर करून द्या.
नोंदणीसाठी ऑनलाईन अर्ज लिंक – https://vmddp.com/register
अर्ज करताना सर्व माहिती अचूक भरावी, अन्यथा अर्ज अपात्र ठरू शकतो.
योजनेचा सारांश
विदर्भ–मराठवाडा दुग्धविकास प्रकल्प टप्पा दोन हा पशुपालकांसाठी मोठी संधी आहे. योग्य वेळी अर्ज करून या योजनांचा लाभ घेतल्यास दुग्धव्यवसायातून चांगले उत्पन्न मिळू शकते. त्यामुळे पात्र पशुपालकांनी विलंब न करता ऑनलाईन अर्ज करावा, असे आवाहन करण्यात येत आहे.
या योजनेसाठी विदर्भ व मराठवाड्यातील १९ जिल्ह्यातील पशुपालक अर्ज सादर करू शकतात.
योजनेचा लाभ घेण्यासाठी पशुपालकांना ऑनलाईन अर्ज सादर करणे आवश्यक आहे. – https://vmddp.com या संकेतस्थळावर इच्छुक अर्जदार नोंदणी करू शकतात.
अर्जदाराचे आधार कार्ड
ऑनलाईन किंवा ऑफलाईन राशन कार्ड.
राशन कार्डवरील सर्व सदस्यांचे आधार नंबर.
शेतकऱ्यांचा फार्मर पोअरर कोड.
देत देत असल्याबाबत दुध खरेदी प्रमाणपत्र.
जमिनीचा सातबारा.
जनावरांचे पशुआधार कार्ड. (त्यावरील tag number)
बँकेचे पासबुक.
दुधाळ गाय म्हैस साठी ५० टक्के तर कालवडीसाठी ७५ टक्के अनुदान आहे. कडबा कुट्टी मशीनसाठी देखील ५० टक्के अनुदान मिळते.