पीएम किसान योजनेचे थांबलेले हफ्ते पुन्हा सुरु होणार नवीन अपडेट्स

पीएम किसान योजनेचे थांबलेले हफ्ते पुन्हा सुरु होणार नवीन अपडेट्स

पीएम किसान हफ्ता पुन्हा सुरु होणार जाणून घ्या या विषयी सविस्तर माहिती

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना (PM-KISAN) अंतर्गत अनेक शेतकऱ्यांचे २ हजार रुपयांचे हप्ते विविध कारणांमुळे थांबले होते. काही हफ्ते मिळाले परंतु काही हफ्ते मिळाले नाही त्यामुळे कोणत्या कारणाने हे हफ्ते बंद झाले या संदर्भात अनेक शेतकरी बांधवाना माहिती नसते.

आता हे थांबलेले हप्ते पुन्हा सुरू करण्यासाठी  कृषी विभागाने शेतकऱ्यांना माहिती अद्यावत करण्याचे आवाहन केले आहे. योग्य कागदपत्रे व नोंदी दुरुस्त केल्यास पीएम किसान हफ्ता पुन्हा सुरु होण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.

गाय म्हैस योजनेचा पण लाभ घ्या..खालील प्रमाणे अर्ज करा.

गाय म्हैस अर्ज सुरु असा करा ऑनलाईन अर्ज

पीएम किसान हफ्ते का थांबले आहेत?

जिल्हा कृषी विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, अनेक लाभार्थ्यांच्या नोंदींमध्ये जमीन हस्तांतरणासंबंधी माहिती अपूर्ण किंवा चुकीची आढळून आली आहे.
विशेषतः १ फेब्रुवारी २०१९ नंतर झालेल्या खालील प्रकारच्या जमिनीच्या व्यवहारांची योग्य नोंद पोर्टलवर नसल्यामुळे हप्ते रोखण्यात आले होते:

  • जमीन खरेदी
  • भेट (Gift Deed)
  • वारसा हस्तांतरण
  • अनुदान किंवा इतर प्रकारचे हस्तांतरण

या व्यवहारांची माहिती पीएम किसान पोर्टलवर अपडेट नसल्याने संबंधित लाभार्थ्यांचा पीएम किसान हफ्ता पुन्हा सुरु झालेला नाही.

खालील योजनेचा पण लाभ घ्या.

बीज भांडवल योजना

कुटुंब सदस्य पडताळणीतील मोठी अडचण

कृषी उपसंचालकांनी सांगितले की, कुटुंब सदस्य पडताळणीमध्ये मोठ्या प्रमाणावर विसंगती दिसून आली आहे.
अनेक ठिकाणी:

  • पती–पत्नी
  • सज्ञान (१८ वर्षांवरील) मुले

यांना एकाच कुटुंबातील लाभार्थी म्हणून दाखवून योजनेचा लाभ घेतल्याचा संशय आहे. या कारणामुळे अनेक लाभार्थ्यांच्या नोंदी तात्पुरत्या स्वरूपात स्थगित करण्यात आल्या आहेत.

कोणत्या शेतकऱ्यांनी तात्काळ कारवाई करावी?

खालील परिस्थिती असलेल्या शेतकऱ्यांनी त्वरित माहिती अद्यावत करणे आवश्यक आहे:

  • पीएम किसानचे हप्ते थांबलेले आहेत
  • २०१९ नंतर जमीन हस्तांतरण झाले आहे
  • कुटुंबातील एकापेक्षा अधिक व्यक्ती लाभ घेत आहेत
  • ई-केवायसी, आधार लिंक किंवा बँक खात्यात चूक आहे

या सर्व प्रकरणांमध्ये पीएम किसान हफ्ता पुन्हा सुरु करण्यासाठी त्वरित अर्ज करणे गरजेचे आहे.

आवश्यक कागदपत्रे कोणती?

शेतकऱ्यांनी खालील कागदपत्रे तयार ठेवावीत:

  • ७/१२ उतारा किंवा जमीन कागदपत्र
  • आधार कार्ड
  • बँक पासबुक
  • जमीन हस्तांतरणाचे दस्तऐवज (जर लागू असेल तर)

कुटुंब सदस्यांची माहिती

अर्ज कुठे व कसा करायचा?

जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयाकडे यासंबंधित संपूर्ण यादी प्राप्त झाली आहे.
सर्व लाभार्थ्यांनी खालील ठिकाणी अर्ज सादर करावा:

  • संबंधित कृषी पर्यवेक्षक
  • कृषी निरीक्षक
  • तालुका कृषी अधिकारी कार्यालय

तसेच लाभार्थी PM Kisan पोर्टलवर स्वतः लॉगिन करून माहिती अद्यावत करू शकतात.

पीएम किसान पोर्टलवर माहिती अपडेट कशी कराल?

पीएम किसान योजनेसाठी तुम्ही दिलेले बँक खाते अचूक आहे का? आधार बँक अकाऊंट सीडिंग झालेले आहे का? Land सीडिंग झालेले आहे का? Ekyc यशस्वी झालेली आहे का? हि सर्व माहिती अगोदर चेक करून घ्या. यासाठी तुम्हाला कोणतेही शुल्क लागत नाही. हि माहिती तुम्ही अगदी तुमच्या मोबाईलद्वारे ऑनलाईन पद्धतीने चेक करू शकता.

  1. pmkisan.gov.in वेबसाईटवर जा
  2. “Know Your Status” पर्याय निवडा
  3. Registration Number टाका. (रजिस्ट्रेशन नंबर माहित नसेल तर Know your registration number या पर्यायावर क्लिक करा. मोबाईल नंबर आणि otp टाकून नंबर मिळवा.)
  4. Otp आणि कॅपचा कोड टाका.
  5. Get Data या पर्यावर क्लिक करताच यामध्ये तुम्हाला तुमच्या पीएम किसान सन्मान योजना संदर्भात संपूर्ण माहिती मिळेल.
  6. आधार नंबर बँकेशी लिंक केल्यानंतर १५ दिवसांनी तो data या वेबसाईटवर दिसतो.

योजनेचा सारांश

पीएम किसान योजनेतील २ हजार रुपयांचा हफ्ता थांबलेला असलेल्या शेतकऱ्यांसाठी ही मोठी संधी आहे. वेळेत माहिती दुरुस्त केल्यास थांबलेले हप्ते पुन्हा मिळण्याची पूर्ण शक्यता आहे. त्यामुळे कोणताही विलंब न करता त्वरित आवश्यक कागदपत्रांसह अर्ज करा आणि पीएम किसान हफ्ता पुन्हा सुरु करून घ्या.

पीएम किसान हफ्ता का थांबला?

जमीन हस्तांतरणाची माहिती अपडेट नसणे, कुटुंब सदस्य पडताळणीतील त्रुटी, e-KYC अपूर्ण असणे, आधार-बँक लिंक नसणे किंवा बँक खात्यातील चुकांमुळे हफ्ता थांबवण्यात आला.

थांबलेला २ हजार रुपयांचा हफ्ता पुन्हा मिळेल का?

होय. सर्व माहिती व कागदपत्रे योग्यरीत्या अपडेट केल्यास थांबलेला हफ्ता पुन्हा मिळण्याची पूर्ण शक्यता आहे.

२०१९ नंतर जमीन खरेदी / वारसा झाला असेल तर काय करावे?

१ फेब्रुवारी २०१९ नंतर जमीन खरेदी, वारसा, भेट (Gift Deed) किंवा इतर हस्तांतरण झाले असल्यास त्याची नोंद पीएम किसान पोर्टलवर करणे आवश्यक आहे.

एकाच कुटुंबातील दोन व्यक्तींना लाभ मिळू शकतो का?

नाही. पती–पत्नी किंवा १८ वर्षांवरील मुले एकाच कुटुंबातून वेगवेगळे लाभ घेऊ शकत नाहीत. अशा प्रकरणांत हफ्ता थांबवला जातो.

 e-KYC पूर्ण नसेल तर काय होईल?

e-KYC अपूर्ण असल्यास पीएम किसानचा हफ्ता मिळत नाही. त्यामुळे e-KYC तात्काळ पूर्ण करणे आवश्यक आहे.

पीएम किसान स्टेटस कसा तपासायचा?

pmkisan.gov.in वेबसाईटवर जा
“Know Your Status” वर क्लिक करा
Registration Number टाका
OTP आणि कॅप्चा टाका
“Get Data” वर क्लिक करा

रजिस्ट्रेशन नंबर माहित नसेल तर काय करावे?

“Know your registration number” या पर्यायावर क्लिक करून मोबाईल नंबर व OTP टाकून रजिस्ट्रेशन नंबर मिळवता येतो.

आधार-बँक लिंक केल्यानंतर लगेच माहिती दिसते का?

नाही. आधार बँक खात्याशी लिंक केल्यानंतर पोर्टलवर माहिती दिसण्यासाठी साधारणतः १५ दिवस लागू शकतात.

अर्ज कुठे करायचा?

कृषी पर्यवेक्षक
कृषी निरीक्षक
तालुका कृषी अधिकारी कार्यालय
तसेच PM Kisan पोर्टलवर स्वतः ऑनलाईन माहिती अपडेट करता येते.

अर्जासाठी कोणती कागदपत्रे लागतात?

७/१२ उतारा
आधार कार्ड
बँक पासबुक
जमीन हस्तांतरण कागदपत्रे (असल्यास)
कुटुंब सदस्यांची माहिती

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *