पीएम किसान नवीन रजिस्ट्रेशन संदर्भात आपण या लेखामध्ये माहिती जाणून घेणार आहोत. 2025 मध्ये पीएम किसान नवीन रजिस्ट्रेशन प्रक्रियेत काही महत्त्वाचे बदल करण्यात आले असून, हे बदल जाणून घेणे प्रत्येक नव्या लाभार्थ्यासाठी अत्यंत आवश्यक आहे.
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना (PM Kisan Sanman Nidhi Yojana) ही केंद्र सरकारची महत्त्वाकांक्षी योजना असून याअंतर्गत पात्र शेतकरी बांधवांना दरवर्षी ₹6000 आर्थिक मदत थेट बँक खात्यात दिली जाते.
ज्या शेतकऱ्यांना पीएम किसान सन्मान निधीचा हफ्ता मिळतो त्यांना नमो महाराष्ट्र शासनाच्या नमो शेतकरी सन्मान निधीचा देखील हफ्ता दिला जातो.
जर तुम्ही नवीन शेतकरी असाल, किंवा तुमच्या वडिलांच्या/आईच्या नावावरून जमीन तुमच्या नावावर आली असेल, तरीही तुम्हाला पीएम किसान योजनेचा लाभ मिळू शकतो. मात्र, त्यासाठी नवीन नियमांनुसार अर्ज करणे गरजेचे आहे.
ज्यांना पीएम किसान सन्मान निधीचे काही हफ्ते मिळाले आहेत मात्र आता पुढील हफ्ते जमा होत नाहीत या संदर्भातील माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करून माहिती पहा.
हफ्ते जमा होत नाहीत माहिती पहा
पीएम किसान नवीन रजिस्ट्रेशनमध्ये झालेले महत्त्वाचे बदल
केंद्र सरकारने पीएम किसान योजनेतील फसवणूक टाळण्यासाठी आणि योग्य लाभार्थ्यांपर्यंत योजना पोहोचवण्यासाठी काही कडक नियम लागू केले आहेत.
नवीन अनिवार्य अटी:
- Previous Owner Details (मागील मालकाची माहिती)
- तात्काळ e-KYC (ई-केवायसी)
या दोन अटी पूर्ण न केल्यास पीएम किसान नवीन रजिस्ट्रेशन अर्ज अपूर्ण (Incomplete) मानला जाईल आणि अर्जदारास या योजेंचा लाभ मिळणार नाही.
खालील योजनांचा पण लाभ घ्या.
- पीएम किसान नवीन रजिस्ट्रेशन 2025 : नवीन नियम, कागदपत्रे आणि अर्ज करण्याची संपूर्ण प्रक्रिया
- लग्नासाठी २.५० लाख अनुदान शासनाची नवीन योजना, जी.आर. आला – पहा संपूर्ण माहिती
- पीएम किसान योजनेचे थांबलेले हफ्ते पुन्हा सुरु होणार नवीन अपडेट्स
- गाय म्हैस अर्ज सुरु झाले सोबत मिळणार कडबाकुट्टी यंत्र मुरघास सगळे ५० टक्के अनुदानावर
- जिल्हा परिषद योजना 2025 सेस फंडातून शिलाई मशीन ताडपत्री व इतर योजनांसाठी अर्ज सुरु
पीएम किसान नवीन रजिस्ट्रेशनसाठी आवश्यक कागदपत्रे
पीएम किसान सन्मान निधी योजनेचा लाभ मिळविण्यासाठी नवीन अर्ज करावा लागतो. अर्ज करण्यापूर्वी खालील कागदपत्रे तयार ठेवा:
- आधार कार्ड (मोबाईल नंबर आधारशी लिंक असणे आवश्यक)
- जमिनीचा ७/१२ उतारा
- ८-अ उतारा
- जमिनीच्या पूर्वीच्या मालकाचे (वडील/आई) आधार कार्ड
- मृत्यू प्रमाणपत्र (जमीन वारसाहक्काने मिळाली असल्यास)
- OTP साठी मोबाईल फोन
योग्य कागदपत्रे असल्यास अर्ज प्रक्रिया जलद आणि अडथळारहित होते.
पीएम किसान नवीन रजिस्ट्रेशन कसे करावे? (Step-by-Step)
खाली दिलेल्या स्टेप्स फॉलो करून तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता अर्ज अगदी मोबाईलद्वारे देखील करता येईल:
Step 1: अधिकृत वेबसाइटला भेट द्या
सर्वप्रथम pmkisan.gov.in या अधिकृत वेबसाइटवर जा आणि “New Farmer Registration” या पर्यायावर क्लिक करा.
Step 2: आधार आणि मोबाईल OTP पडताळणी
- तुमचा आधार क्रमांक टाका
- मोबाईल नंबर भरा
- राज्य निवडा
- कॅप्चा कोड टाकून Get OTP वर क्लिक करा
मोबाईल OTP आणि नंतर आधार OTP यशस्वीरीत्या व्हेरिफाय करा.
वैयक्तिक माहिती भरणे
OTP पडताळणीनंतर वैयक्तिक माहितीचा फॉर्म उघडेल:
- कॅटेगरी (General / SC / ST)
- मानधन योजना: No
- वैवाहिक स्थिती (Single / Married)
ही माहिती आधार डेटाशी जुळणारी असावी.
जमिनीचा तपशील – सर्वात महत्त्वाचा टप्पा
पीएम किसान नवीन रजिस्ट्रेशन मध्ये जमीन तपशील अचूक भरणे अत्यंत गरजेचे आहे.
- जमीन मालकी: Single किंवा Joint
- Land Transfer: 1 फेब्रुवारी 2019 नंतर जमीन नावावर झाली आहे का?
- जमीन मिळण्याचे कारण:
- Death of Father
- Death of Mother
- Gift / Sale / Inheritance
- Vesting Date: जमीन नावावर झाल्याची तारीख
Previous Owner Details का अनिवार्य आहेत?
नवीन नियमानुसार, जमीन ज्यांच्याकडून मिळाली आहे त्या व्यक्तीचा:
- आधार नंबर
- नाव
टाकून Demo Authentication करणे आवश्यक आहे.
हे ऑथेंटिकेशन अयशस्वी झाल्यास अर्ज पुढे जात नाही.
कागदपत्रे अपलोड करण्याची प्रक्रिया
अर्जाच्या शेवटी खालील PDF फाइल्स अपलोड कराव्या लागतात:
- मृत्यू प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- जमीन उतारा (७/१२ किंवा ८-अ)
कागदपत्रे अपलोड करतांना लक्षात असू द्या कि फाइल साईज 200 KB पेक्षा कमी असावी.
अर्जानंतर e-KYC करणे का गरजेचे आहे?
फक्त अर्ज करून थांबू नका. e-KYC अनिवार्य आहे.
e-KYC करण्याचे दोन मार्ग:
- CSC सेंटर – बायोमेट्रिक e-KYC (₹5 अंदाजे शुल्क)
- PM Kisan Mobile App – फेस ऑथेंटिकेशनद्वारे मोफत e-KYC
e-KYC न केल्यास हप्ता मिळणार नाही.
योजनेचा सारांश
पीएम किसान नवीन रजिस्ट्रेशन प्रक्रियेत झालेले बदल लक्षात घेता, आता प्रत्येक टप्पा काळजीपूर्वक पूर्ण करणे अत्यंत आवश्यक आहे.
विशेषतः Previous Owner Details आणि e-KYC या दोन अटींकडे दुर्लक्ष केल्यास अर्ज फेटाळला जाऊ शकतो.
ही माहिती उपयुक्त वाटल्यास ती इतर शेतकरी बांधवांसोबत नक्की शेअर करा, जेणेकरून कोणताही पात्र शेतकरी या योजनेपासून वंचित राहणार नाही.
पीएम किसान नवीन रजिस्ट्रेशन म्हणजे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेत प्रथमच नोंदणी करण्याची प्रक्रिया. या प्रक्रियेद्वारे पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी ₹6000 आर्थिक मदत दिली जाते.
ज्यांच्या नावावर शेती जमीन आहे असे लहान व सीमांत शेतकरी, तसेच वडिलांच्या/आईच्या नावावरून वारसाहक्काने जमीन मिळालेल्या शेतकऱ्यांना पीएम किसान नवीन रजिस्ट्रेशन करता येते.
होय. जमीन वारसाने मिळाली असल्यास तुम्ही पीएम किसान नवीन रजिस्ट्रेशन करू शकता. मात्र यासाठी Previous Owner Details आणि मृत्यू प्रमाणपत्र आवश्यक आहे.
होय. नवीन तसेच जुन्या लाभार्थ्यांसाठी e-KYC पूर्णपणे अनिवार्य आहे. e-KYC न केल्यास अर्ज अपूर्ण मानला जातो आणि हप्ता मिळत नाही.
जमीन ज्यांच्याकडून मिळाली आहे (उदा. वडील/आई), त्या व्यक्तीचे नाव आणि आधार क्रमांक देणे म्हणजे Previous Owner Details. नवीन नियमांनुसार हे ऑथेंटिकेशन अनिवार्य आहे.
जर ऑथेंटिकेशन फेल झाले तर:
नाव व आधार क्रमांक अचूक आहेत का ते तपासा
आधार अपडेट असल्याची खात्री करा
जवळच्या CSC सेंटरला भेट द्या
ऑथेंटिकेशन यशस्वी झाल्याशिवाय अर्ज पुढे जात नाही.
pmkisan.gov.in या अधिकृत वेबसाइटवर जाऊन “New Farmer Registration” या पर्यायातून ऑनलाईन अर्ज करता येतो.
आधार कार्ड (मोबाईल लिंक असणे आवश्यक)
७/१२ उतारा
८-अ उतारा
Previous Owner आधार कार्ड
मृत्यू प्रमाणपत्र (लागू असल्यास)
अर्ज मंजूर झाल्यानंतर आणि e-KYC पूर्ण झाल्यावर पुढील हप्त्यात ₹2000 थेट बँक खात्यात जमा होतात.
e-KYC करण्याचे दोन मार्ग आहेत:
1️⃣ CSC सेंटरवर बायोमेट्रिक e-KYC
2️⃣ PM Kisan Mobile App द्वारे फेस ऑथेंटिकेशन (मोफत)
अर्ज रिजेक्ट होण्याची प्रमुख कारणे:
e-KYC पूर्ण न करणे
Previous Owner Details न भरणे
चुकीचा जमीन तपशील
आधार-बँक खाते लिंक नसणे
नाही. एका कुटुंबातील केवळ एका पात्र शेतकऱ्यालाच पीएम किसान योजनेचा लाभ दिला जातो.
pmkisan.gov.in वर “Beneficiary Status” या पर्यायातून आधार किंवा मोबाईल नंबर टाकून अर्जाची स्थिती तपासता येते.