आता शेतकऱ्यांना २ तासांत दोन लाखापर्यंत मिळणार पीक कर्ज पहा अर्ज कसा आणि कोठे करावा

आता शेतकऱ्यांना २ तासांत दोन लाखापर्यंत मिळणार पीक कर्ज पहा अर्ज कसा आणि कोठे करावा

२ तासांत पीक कर्ज मिळणार पहा संपूर्ण माहिती.

शेतकऱ्यांना पीक कर्ज मिळविण्यासाठी बँकेत चकरा माराव्या लागतात. बँकेत कागदपत्रे जमा करण्यासाठी कधी कधी तर अक्षरशः वैताग येतो.

कागदपत्रांची पूर्तता, सारख्या बँकेत भेटी देन यामुळे अनेकदा कर्ज मंजूर होण्यास वेळ लागतो. यामुळेच अनेकजण तर बँकेच्या कर्जापेक्षा खाजगी सावकाराकडून कर्ज घेणे पसंद करतात.

आता मात्र या सर्व गोष्टीला आळा बसणार आहे. यापुढे अगदी २ तासांत दोन लाख रुपयांपर्यत पिक कर्ज मंजूर होण्यासाठी ऑनलाईन व्यवस्था शासनाने उपलब्ध करून दिली आहे.

ही सुविधा सध्या महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यात पायलट प्रोजेक्ट म्हणून सुरू करण्यात आली असून, याबाबत सविस्तर माहिती जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिली आहे.

खालील माहिती पण वाचा

पीएम किसान सन्मान निधीचे थांबलेले हफ्ते पुन्हा सुरु होणार

जनसमर्थ पोर्टलद्वारे पीक कर्ज सुविधा

शेतकरी बांधवाना लवकरात लवकर पिक कर्ज मिळावे यासाठी शासनाने जनसमर्थ पोर्टल (https://www.jansamarth.in) सुरू केले आहे.

या पोर्टलच्या माध्यमातून आता शेतकऱ्यांना राष्ट्रीयकृत बँकांकडून पीक कर्जासाठी ऑनलाईन अर्ज करता येणार आहे. या सिस्टीममुळे शेतकरी बांधवाना यापुढे प्रत्यक्ष बँकेत जाण्याची गरज पडणार नाही. अर्ज प्रक्रिया पूर्णपणे डिजिटल असल्याने वेळ, पैसा आणि श्रम यांची मोठी बचत होणार आहे. २ तासांत पीक कर्ज मिळणार असल्याने शेतकरी बांधवाना याची मदत मिळणार आहे.

किसान क्रेडिट कार्डद्वारे – दोन लाखांपर्यंत पीक कर्ज

जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिलेल्या माहितीनुसार,
₹२,००,००० (दोन लाख) रुपयांच्या मर्यादेपर्यंत पीक कर्ज हे किसान क्रेडिट कार्ड (KCC) च्या माध्यमातून मिळू शकणार आहे.

या कर्ज प्रक्रियेमध्ये योग्य पात्रता असलेल्या शेतकऱ्यांचे अर्ज विनाकारण नाकारले जाणार नाहीत, तसेच कमीत कमी कालावधीत कर्ज मंजुरी मिळवून देण्याचा शासनाचा प्रयत्न आहे.

गाय म्हैस अर्ज सुरु झाले सोबत मिळणार कडबाकुट्टी यंत्र मुरघास सगळे ५० टक्के अनुदानावर

ऑनलाईन अर्जासाठी आवश्यक कागदपत्रे

जनसमर्थ पोर्टलवर पीक कर्जासाठी अर्ज करताना खालील कागदपत्रे असणे आवश्यक आहे:

  • शेतकरी आयडी (Farmer ID / Farm ID) – अनिवार्य
  • आधार कार्ड
  • आधारला लिंक असलेला मोबाईल नंबर
  • बँक पासबुक
  • पॅन कार्ड

ही सर्व कागदपत्रे डिजिटल स्वरूपात अपलोड करून अर्ज करता येतो.

पीक कर्जासाठी ऑनलाईन अर्ज कसा करावा?

शेतकरी खालील सोप्या टप्प्यांमध्ये ऑनलाईन अर्ज करू शकतात:

  1. https://www.jansamarth.in या संकेतस्थळावर भेट द्या.
  2. “Agriculture Loan / Kisan Credit Card” हा पर्याय निवडा.
  3. मोबाईलवर otp येईल तो व्हेरीफाय करा आणि मोबाईल नंबरद्वारे लॉगिन किंवा नोंदणी करा.
  4. इमेल आयडी असेल तर टाका नाहीतर सोडून द्या.
  5. Login झाल्यावर कृषी कर्ज – किसान क्रेडीट कार्ड हा पर्याय निवडा.
  6. स्थान प्रविष्ठ करा या रकान्यामध्ये महाराष्ट्र निवडा आणि District या रकान्यामध्ये तुमचा जिल्हा निवडा आणि पुढे जा एफ पर्यायावर क्लिक करा.
  7. चालू ठेवा या पर्यायावर क्लिक करा.
  8. Select your Bank या पर्यायामध्ये दिलेल्या यादीतील बँक निवडा.

सर्वात शेवटी काही सूचना येतील त्या वाचून घ्या आणि I agree या बटनावर क्लिक करा. त्यानंतर काही term and conditionदिसेल त्या पण वाचून घ्या. “सहमत आणि पुढे” या बटनावर क्लिक करताच आता तुम्हाला अर्जामध्ये माहिती भरण्यास सुरुवात करायची आहे.

8 स्टेप मध्ये सादर करावा लागेल अर्ज.

अर्ज सादर करतांना ८ पद्धतीने माहिती सादर करावी लागणार आहे ती खालील प्रमाणे.

  1. Recured documents (आवश्यक कागदपत्रे).
  2. Identity verification (ओळख पडताळणी).
  3. Bank Account Details (बँक तपशील).
  4. Personal details (वैयक्तिक माहिती).
  5. Financial details (आर्थिक माहिती).
  6. Land and other details (जमीन संदर्भातील माहिती).
  7. Application review details (अर्ज पडताळणी).
  8. Bank Selection (बँक निवडणे)

वरील 8 स्टेपमध्ये हा पिक कर्ज अर्ज सादर करावा लागणार आहे. योग्य माहिती व कागदपत्रे असल्यास काही प्रकरणांमध्ये २ तासांच्या आत कर्ज मंजुरी मिळण्याची शक्यता आहे.

कोणतेही शासकीय शुल्क नाही

या संपूर्ण ऑनलाईन अर्ज प्रक्रियेसाठी कोणतेही शासकीय शुल्क आकारले जाणार नाही. शेतकऱ्यांची फसवणूक होऊ नये यासाठी शासनाकडून स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत.

जिल्हा व तालुका प्रशासनाची विशेष मोहीम

या उपक्रमाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी जिल्हा व तालुका स्तरावर विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे.
या मोहिमेचे वेळापत्रक पुढील अधिकाऱ्यांच्या समन्वयाने ठरवले जाईल:

  • तहसीलदार
  • तालुका कृषी अधिकारी
  • जिल्हा अग्रणी बँक
  • तालुका बँक प्रतिनिधी

सेतू केंद्र व महा-ई-सेवा केंद्रांचा सहभाग

डिजिटल प्रक्रियेत अडचण येणाऱ्या शेतकऱ्यांसाठी सेतू केंद्र, महा-ई-सेवा केंद्र आणि ग्राहक सेवा केंद्रांचा सहभाग घेण्यात येणार आहे. येथे शेतकऱ्यांना अर्ज भरण्यासाठी आवश्यक मार्गदर्शन मिळेल.

जिल्हाधिकाऱ्यांचे शेतकऱ्यांना आवाहन

जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी सोलापूर जिल्ह्यातील पात्र व गरजू शेतकऱ्यांना आवाहन केले आहे की,
जनसमर्थ पोर्टलवर पीक कर्जासाठी ऑनलाईन अर्ज करून किसान क्रेडिट कार्ड सुविधा मिळवावी आणि या आधुनिक व पारदर्शक प्रणालीचा लाभ घ्यावा.

योजनेचा सारांश

जनसमर्थ पोर्टलमुळे पीक कर्ज प्रक्रिया अधिक सोप्या, जलद आणि पारदर्शक झाल्या आहेत. बँकांच्या फेऱ्या, विलंब आणि अनावश्यक अडथळे दूर होऊन शेतकऱ्यांना वेळेत आर्थिक मदत मिळणार आहे. शेतकऱ्यांना विनाविलंब पिक कर्ज मिळविण्यासाठी आता ऑनलाईन अर्ज सादर करता येणार आहे.

सोलापूर जिल्ह्यात यशस्वी ठरल्यास ही योजना भविष्यात संपूर्ण महाराष्ट्रात राबवली जाण्याची शक्यता आहे. अशा पद्धतीने २ तासांत पीक कर्ज मिळू शकणार असल्याने शेतकरी बांधवांसाठी फायदेशीर होणार आहे.

तासांत पीक कर्ज खरंच मिळणार आहे का?

होय. योग्य माहिती व कागदपत्रे असल्यास काही प्रकरणांमध्ये अवघ्या २ तासांत पीक कर्ज मंजूर होऊ शकते. मात्र अंतिम मंजुरी बँकेच्या पडताळणीवर अवलंबून असेल.

पीक कर्जासाठी ऑनलाईन अर्ज कुठे करायचा?

शेतकरी जनसमर्थ पोर्टल (https://www.jansamarth.in) या अधिकृत संकेतस्थळावर पीक कर्जासाठी ऑनलाईन अर्ज करू शकतात.

ही सुविधा संपूर्ण महाराष्ट्रासाठी आहे का?

सध्या ही योजना महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यात पायलट प्रोजेक्ट म्हणून राबवली जात आहे. यशस्वी झाल्यास पुढील टप्प्यात इतर जिल्ह्यांतही लागू होण्याची शक्यता आहे.

किती रकमेपर्यंत पीक कर्ज मिळू शकते?

या योजनेअंतर्गत ₹२,००,००० (दोन लाख) रुपयांपर्यंत पीक कर्ज मिळू शकते.

पीक कर्ज कोणत्या माध्यमातून दिले जाईल?

हे कर्ज किसान क्रेडिट कार्ड (KCC) च्या माध्यमातून दिले जाणार आहे.

ऑनलाईन अर्जासाठी कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत?

अर्ज करताना खालील कागदपत्रे आवश्यक आहेत:
शेतकरी आयडी (Farmer ID)
आधार कार्ड
आधारला लिंक असलेला मोबाईल नंबर
बँक पासबुक
पॅन कार्ड (असल्यास)

शेतकरी आयडी नसल्यास अर्ज करता येईल का?

नाही. पीक कर्जासाठी शेतकरी आयडी असणे बंधनकारक आहे. आयडी नसल्यास प्रथम शेतकरी आयडी काढावा लागेल.

या ऑनलाईन अर्जासाठी काही शुल्क लागते का?

नाही. या संपूर्ण प्रक्रियेसाठी कोणतेही शासकीय शुल्क आकारले जाणार नाही.

बँकेत प्रत्यक्ष जाण्याची गरज आहे का?

नाही. जनसमर्थ पोर्टलमुळे बँकेत जाण्याची आवश्यकता नाही. संपूर्ण प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने पूर्ण करता येते.

अर्ज करताना अडचण आल्यास कुठे मदत मिळेल?

अडचण असल्यास शेतकरी सेतू केंद्र, महा-ई-सेवा केंद्र किंवा ग्राहक सेवा केंद्रात जाऊन मदत घेऊ शकतात.

कर्ज अर्ज नाकारले जाण्याची शक्यता आहे का?

योग्य कागदपत्रे आणि पात्रता असल्यास विनाकारण कर्ज नाकारले जाणार नाही, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

या योजनेची माहिती कोणी दिली आहे?

या उपक्रमाची सविस्तर माहिती जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिली असून शेतकऱ्यांना जास्तीत जास्त लाभ घेण्याचे आवाहन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *