जाणून घेवूयात धुमस मशीन अर्थात Tamping rammer machine संदर्भात सविस्तर माहिती.
ग्रामीण भागात देखील व्यवसाय करून चांगला रोजगार मिळविता येवू शकतो फक्त तरुणांकडे व्यावसायिक दृष्टीकोन असायला हवा.
बेरोजगार तरुणांसाठी रोजगार उपलब्ध करायचा असेल तर त्यासाठी नवनवीन व्यवसाय शोधावे लागतात. ग्रामीण भागात देखील रोजगारांच्या नवनवीन संधी निर्माण करून काम मिळविता येते.
आज आपण धुमस मशीन अर्थात Tamping rammer machine विषयी माहिती जाणून घेणार आहोत.
या व्यवसायामध्ये कमी गुंतवणुकीमध्ये ठीकठाक नफा कमविता येतो.
धुमस मशीनला ग्रामीण भागामध्ये मोठी मागणी
सध्या ग्रामीण भागामध्ये खूप मोठ्या प्रमाणात बांधकाम सुरु आहे. अशावेळी बेरोजगार तरुणांनी धुमस मशीन घेवून व्यवसाय केला तर रोजगार मिळू शकतो.
ज्या ठिकाणी बांधकाम सुरु आहेत अशा ठिकाणी संपर्क साधल्यास किंवा मिस्त्री कंत्राटदार यांच्याशी देखील संपर्क साधून काम मिळविता येते.
ग्रामीण भागामध्ये छोटे घर बांधकाम केले जाते किंवा गुरांसाठी शेड केले जाते अशावेळी पारपिट मध्ये मुरूम टाकला जातो ज्याला ग्रामीण भागामध्ये भरती भरणे असे देखील म्हटले जाते.
किती येतो खर्च
मार्केटमध्ये वेगवेगळ्या कंपनीचे धुमस मशीन अर्थात Tamping rammer machine उपलब्ध आहेत. या मशीनची किंमत सर्वसाधारणपणे ३० ते ७० हजार रुपयापर्यंत असू शकते.
ग्रामीण भागामध्ये प्रती तास ३०० ते ४०० रुपयाप्रमाणे दर आकारला जावू शकतो काही ठिकाणी ब्रासनुसार देखील दर आकारला जातो.
ज्या ठिकाणी बांधकाम सुरु असते त्या ठिकाणी भरती भरणे गरजेचे असते अशावेळी या मशीनची मागणी वाढून रोजगार मिळू शकतो.
पाया भरणी करण्यापूर्वी माती घट्ट करणे
ज्या पद्धतीने रोडचे काम करतांना रोलर फिरवून त्यावरील सोलिंग आणि मुरूम घट्ट केला जातो त्याच पद्धतीने घराचा पाया फाउंडेशन देखील मुरूम टाकून घट्ट करावे लागते. अशावेळी हे धुमस मशीन खूप कामी येते.
याचमुळे ग्रामीण भागात या मशीनला खूप मोठी मागणी आहे.
घराचा पाया (Foundation) टाकण्यापूर्वी माती सैल असते.
Tamping Rammer मशीनने ती माती घट्ट दाबली (Compact) जाते, त्यामुळे
- पाया मजबूत बसतो
- पुढे बसणे (Settlement) कमी होते
- भेगा पडण्याचा धोका कमी होतो
प्लिंथ फिलिंग (Plinth Filling)
पाया झाल्यानंतर आतमध्ये मुरूम किंवा माती भरली जाते.
ही माती लेयरनुसार टाकून Rammer ने दाबली जाते, जेणेकरून
- फ्लोअर खाली बसणार नाही
- टाईल्स किंवा फरशीला तडे जाणार नाहीत.
अरुंद जागेत काम
Roller मशीन मोठ्या जागेसाठी असते, पण प्रत्येक ठिकाणी हे मशीन वापरता येत नाही त्यामुळे धुमस मशीनला खूप मागणी असते.
- अरुंद प्लॉट
- भिंतीजवळची जागा
- लहान खड्डे
या ठिकाणी Tamping Rammer खूप उपयुक्त ठरते.
धुमस मशीन कसे काम करते?
ही मशीन खालील भागावर जोरदार उडी (Jumping Action) मारत माती दाबते.
ती वर-खाली वेगाने उडत राहते आणि त्यामुळे माती घट्ट होते. हे धुमस मशीन पेट्रोलवर चालते. अगदी कमी खर्चात जास्त काम करते. काही ठिकाणी तासाने तर काही ठिकाणी ब्रासनुसार पैसे आकारले जातात
का महत्त्वाचे आहे धुमस मशीन?
जर माती योग्यरीत्या घट्ट केली नाही तर:
- घर बसते
- भेगा पडतात
- फरशी खचते
म्हणून पायाभरणीपूर्वी आणि भराव करताना Tamping Rammer वापरणे अत्यंत आवश्यक आहे.
आमच्या फेसबुक पेजला फॉलो करा.
धुमस मशीन खरेदी करण्यासाठी ३० हजार रुपयांपासून ते ७० हजार रुपयांपर्यंत खर्च येतो.
ज्या ठिकाणी घरबांधकाम सुरु आहे अशा घर मालकांना संपर्क साधने किंवा मिस्त्री व कंत्राटदार यांच्याशी संपर्क साधणे
काहीजण प्रत्येक तासाला दर आकारतात तर काही जण ब्रासनुसार दर आकारात. २०० ते तीनशे रुपये प्रती तास किंवा ५०० ते ६०० रुपये ब्रास या पद्धतीने दर ठरतात.