शेतकरी बंधुंनो आजच्या लेखामध्ये सोलर पावर प्लांट संबधी माहिती जाणून घेवूयात. महाराष्ट्रामध्ये विविध जिल्ह्यातील विविध तालुक्यामध्ये एनटीपीसी विद्युत व्यापार निगम लिमिटेडच्या वतीने सोलर पावर प्लांट प्रोजेक्ट उभारण्यासंदर्भात अर्ज मागविण्यात आले आहेत. दैनिक लोकमतमध्ये या संदर्भातील जाहिरात देण्यात आलेली आहे ती जाहिरात डाउनलोड करण्याची लिंक या लेखाच्या सर्वात खाली देण्यात आलेली आहे. तुमच्या तालुक्यामध्ये कोणत्या ठिकाणी हे सोलर पावर प्लांट प्रोजेक्ट उभारले जाणार आहेत त्याची देखील तुम्ही माहिती घेऊ शकता त्या संदर्भातील pdf सुद्धा या ठिकाणी दिलेली आहे ती डाउनलोड करून घ्या.
फसव्या जाहिरातीपासून सावधान.
व्हॉट्सॲप ग्रुप, फेसबुक किंवा इतर समाजमाध्यमांवर मागील काही दिवसामध्ये शेतात टॉवर उभारा आणि मोठ्या प्रमाणात महिन्याकाठी भाडे मिळवा अशा आशयाच्या पोस्ट बघण्यास मिळाल्या होत्या आणि यामुळे अनेकांची फसवणूक देखील झाली होती. त्यामुळे एखादी योजना आली असेल तर ती कितपत खरी आहे याची खातर जमा करून घेतली पाहिजे त्यामुळे आपली फसवणूक होणार नाही. एनटीपीसी हि भारत सरकारची वेबसाईट आहे आणि एनटीपीसी विद्युत व्यापार निगम लिमिटेड हि कंपनी एनटीपीसी या कंपनीची सहाय्यक कंपनी आहे. तुम्ही जर तुमच्या जमिनीवर हा सोलर प्लांट उभारू इच्छित असाल तर तुम्हाला यासाठी भाडे मिळू शकते.
सोलर पावर प्लांट उभारण्यासंदर्भातील जाहिरात जाणून घेवूयात.
दिनांक ८ जून २०२१ च्या दैनिक लोकमत वृत्तपत्रामध्ये महाराष्ट्र राज्यामध्ये सोलर पॉवर प्लँट्सची उभारणी करण्याकरिता जमीन लीज/खरेदी करण्याकरिता स्वारस्य अभिव्यक्ती या मथळ्याखाली एक जाहिरात देण्यात आलेली आहे. सदरील दैनिक लोकमत मधील हि जाहिरात तुम्हाला हवी असेल तर खालील जाहिरात डाउनलोड करा या बटनावर क्लिक करून तुम्ही हि जाहिरात बघू शकता.
सोलर पावर प्लांट अर्ज प्रक्रिया
एनव्हीव्हीएन महाराष्ट्र राज्यामध्ये सोलर पावर प्लांट उभारणी करता जमीन भाडेतत्त्वावर घेण्यासाठी किंवा जमीन खरेदी करता इच्छुक पार्टीकडून स्वारस्य अभिव्यक्ती ई. ओ. आय. EOI (Expression of interest) मागवीत आहे. इच्छुक पर्तींनी त्यांचे अर्ज https://eprocurentpc.nic.in/ किंवा एनव्हीव्हीएन वेबसाईट http://nvvn.co.in/ वर उपलब्ध विस्तृत ईओआय नुसार आपले अर्ज सादर करावेत. ज्या व्यक्ती पात्र आहेत त्यांनी विस्तृत ईओआयच्या जोडपत्रानुसार आपले अर्ज केवळ इमेलद्वारे सॉफ्ट कॉपीमध्ये १७ जून २०२१ पर्यंत सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. इमेलचा पत्ता जाहिरातीमध्ये दिलेला आहे.
महत्वाच्या तारखा लक्षात ठेवा.
७ जून २०२१ रोजी ईओआय उघडण्यात आलेला आहे. ११ जून २०२१ ला स्पष्टीकरण किंवा विचारणा करण्याची शेवटची तारीख होती तर १७ जून २०२१ ला अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे आणि याच दिवशी अर्ज सुद्धा उघडले जातील. ईओआय ( EOI ) अर्ज डाउनलोड करण्यासाठी खलील बटनावर क्लिक करा.
जाणून घ्या तुमच्या तालुक्यात कोणत्या ठिकाणी उभारला जाणार हा सोलर पावर प्रोजेक्ट
महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यामध्ये सोलर पावर प्लांट प्रोजेक्ट उभारले जाणार आहेत. तुम्हाला हि जाणून घ्यावयाचे असेल कि सोलर प्लांट प्रोजेक्ट तुमच्या तालुक्यात नेमक्या कोणत्या ठिकाणी उभारला जाणार आहे तर त्या संदर्भातील pdf फाईल डाउनलोड करून घ्या त्यासाठी खालील बटनावर क्लिक करा. सौर कृषी पंप योजना संदर्भात माहिती घेण्यासाठी येथे क्लिक करा
विविध योजनांच्या माहितीसाठी आम्हाला फॉलो करा.
शेती संबधी विविध योजनांच्या माहितीसाठी डिजिटल डीजी फेसबुक पेजला लाईक करा, डिजिटल डीजी युट्युब चॅनलला सबस्क्राईब करा. विविध योजनांची माहिती तुमच्या मोबाईलवर मिळविण्यासाठी फेसबुक ग्रुप व टेलिग्राम ग्रुप जॉईन करण्यास विसरू नका.