सोलर पंप योजना अर्थात सौर चलित पंप योजना संबधी अधिक माहिती जाणून घेवूयात. सोलर पंप योजनेसाठी अर्थात सौर उर्जा चलीत पंपासाठी ऑनलाईन अर्ज सुरु झालेले आहेत.
हा अर्ज कसा करावा लागतो या संदर्भात आपण या लेखामध्ये माहिती घेणार आहोत. या योजनेसाठी कोणते शेतकरी पात्र आहेत, कोणकोणती कागदपत्रे आवश्यक आहेत. त्याचप्रमाणे कोणत्या वेबसाईटवर हा अर्ज करावा लागणार आहे त्यासंबधी अगदी तपशीलवारपणे माहिती आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत.
( सोलर पंप योजनेसाठी ऑनलाईन अर्ज कसा करावा या संदर्भातील व्हिडीओ या लेखाच्या सर्वात शेवटी दिलेला आहे तो व्हिडीओ बघून तुम्ही तुमचा अर्ज सादर करू शकता. )
शेतकरी बांधवांसाठी सोलर पंप योजना गरजेची.
शेती करत असतांना शेतीव्यवसायासाठी वीज वेळेवर उपलब्ध होणे खूपच महत्वाचे आहे. शेतीसाठी वीज नसेल तर तुमच्या विहिरीमध्ये कितीही पाणी असूद्या त्याला महत्व राहत नाही.
शेतकरी बांधवांना जी वीज उपलब्ध केली जाते रात्री आणि दिवसा अशा पद्धतीने दिली जाते. रात्रीच्या वेळी शेतकरी बांधवांना अंधारामध्ये जीवाची पर्वा न करता शेताला पाणी देण्यासाठी जावे लागते.
त्यामुळे शेतीसाठी सौर कृषी पंप असणे खूपच महत्वाचे आहे. सौर कृषी पंप उपलब्ध झाल्यास शेतीसाठी दिवसा पाणी देणे शक्य होते. त्यामुळे तुम्हाल जर सौर कृषी पंप योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर लगेच अर्ज करून घ्या.
( हा पण लेख वाचा शेळी मेंढी व गाईसाठी मिळणार जास्त अनुदान )
योजनेसाठी लाभार्थ्याची पात्रता आणि लागणारी कागदपत्रे.
सोलर पंप योजनेसाठी म्हणजेच कृषी पंप योजनेसाठी अर्ज कसा करावा लागतो शिवाय ऑनलाइन सोलर पंप रजिस्ट्रेशन कसे करावे हि सर्व माहिती खाली दिलेली आहे ती सविस्तरपणे वाचून घ्या आणि योजनेसाठी अर्ज करा.
या लेखाच्या सर्वात शेवटी या योजनेसाठी अर्जदाराची पात्रता व कागदपत्रे या संदर्भातील एक pdf दिलेली आहे ती डाउनलोड करून घ्या.
( हा पण लेख वाचा उद्योग करण्यासाठी मिळणार १० लाखापर्यंत )
असा करा या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज
सोलर पंप योजना ऑनलाईन अर्ज करण्यासाठी खालील पद्धतीने एक एक करत क्रियांचे अनुकरण केल्यास तुम्ही तुमचा ऑनलाईन अर्ज सादर करू शकता.
लॉगीन करण्याची पद्धत.
- कॉम्प्युटरच्या ब्राउजरमध्ये mahadbt farmer login हा कीवर्ड टाईप करा.
- https://mahadbtmahait.gov.in/Farmer/Login/Login या लिंकवर क्लिक करा.
- महाडीबीटी शेतकरी वेबसाईट ओपन होईल. ऑनलाईन अर्ज करण्यासाठी या ठिकाणी दोन पर्याय दिसतील १)वापरकर्ता आयडी २)आधार क्रमांक
- वापरकर्ता आयडी या लिंकवर क्लिक करून तुमचा वापरकर्ता आयडी, पासवर्ड व कॅपचा कोड टाकून लॉगीन करायचे आहे.
- वापरकर्ता आयडी व पासवर्ड विसरला असाल तर आधार क्रमांक या पर्यायावर क्लिक करून बायोमेट्रिक पद्धतीने या ठिकाणी तुम्ही लॉगीन करू शकता.
- तुमच्याकडे वापरकर्ता आयडी व पासवर्ड नसेल किंवा तुमचा आधार नंबरचे रजिस्ट्रेशन झाले नसेल तर नवीन नोंदणी करून घ्या.
- महाडीबीटी पोर्टलवर नवीन नोंदणी कशी करावी हे जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.
यशस्वीपणे लॉगीन झाल्यावर पुढील क्रिया.
- अर्ज करा या निळ्या रंगाच्या बटनावर क्लिक करा.
- या ठिकाणी तुम्हाला अनेक पर्याय दिसतील त्यापैकी अनुसूचित जाती व जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांसाठी विशेष योजना या पर्यायासमोरील बाबी निवडा या बटनावर क्लिक करा.
- बाबी निवडा या बटनावर क्लिक करताच पुढील प्रमाणे एक सूचना दिसेल “अनुसूचित जाती व जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांसाठी विशेष योजना या घटकांतर्गत विविध बाबींना अर्थसहाय्य देण्यात येत आहे. यापैकी आपल्या पसंतीची प्रत्येक बाब स्वतंत्रपणे निवडावी व त्याच्याशी संबंधित तपशील नमूद करावा आणि शेवटी आपण निवडलेल्या सर्व बाबींचा अर्जात समावेश करावा.” हि सूचना वाचून झाल्यावर ओके या बटनावर क्लिक करा. या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी नवीन नोंदणी कशी करावी हे जाणून घेण्यासाठी खालील लिंकला टच करा.
सोलर पंप योजना अर्ज भरण्यास सुरुवात करा.
- अनुसूचित जाती जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांसाठी विशेष योजनेचा अर्ज स्क्रीनवर दिसेल त्यामध्ये पुढील प्रमाणे माहिती टाका १) तालुका २) गाव किंवा शहर ३) सर्वेक्षण क्रमांक किंवा गट क्रमांक ४)
- मुख्य घटक या पर्यायाखाली अनुसूचित जाती जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांसाठी विशेष हा पर्याय निवडा
- घटक निवडा या पर्यायाखाली दिलेल्या चौकटीमध्ये सौर उर्जा चाळीत पंप हा पर्याय निवडा
- सोलर पंपासाठी महावितरणकडून निवड झालेली असेल तर होय या बटनावर क्लिक करा नसेल तर नाही या बटनावर क्लिक करा.
- कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकारण योजनेंतर्गत आपणास शासनाने जमीन वाटप केली आहे का ? असेल तर होय या बटनावर क्लिक करा नसेल तर नाही या बटनावर क्लिक करा.
- सन २०२१ नंतर अर्जदारास तिसरे अपत्य झाले असेल तर होय या पर्यायाला क्लिक करा नसेल तर नाही या पर्यायाला क्लिक करा.
- मी पूर्व संमतीशिवाय कोणत्याही बाबीची खरेदी/बांधकाम/खोदकाम/ करणार नाही आणि पूर्वसंमतीशिवाय केलेल्या कामासाठी मी अनुदानास पात्र राहणार नाही याची मला जाणीव आहे या सुचने पुढील चौकटीत टिक करा.
- वरील सर्व माहिती अचूक भरल्यानंतर जतन करा या बटनावर क्लिक करा.
- आपणास या घटकांतर्गत उपलब्ध असलेल्या अन्य बाबीचा लाभ घ्यायचा आहे का अशी सूचना दिसेल अजून योजना समाविष्ट करायचा असतील तर yes या बटनावर क्लिक करा किंवा समाविष्ट करायचा नसतील तर no या बटनावर क्लिक करा.
महाडीबीटी पोर्टलवर नवीन नोंदणी कशी करावी हे जाणून घेण्यासाठी येथे टच करा.
सोलर पंप योजनेसाठी प्राधान्यक्रमांक निवडा
- अर्ज सादर करा या बटनावर क्लिक करा
- जसे हि तुम्ही अर्ज करा या बटनावर क्लिक कराल त्यावेळी पुढील संदेश तुम्हाला दिसेल कृपया खात्री करा की आपण आपल्या पसंतीच्या सर्व मुख्य घटकांमधून सर्व घटक निवडले आहेत. एकदा आपण अर्ज सादर केल्यानंतर, आपण त्या अर्जात इतर घटक जोडू शकत नाही. आपण या अर्जात अधिक घटक जोडू इच्छित असल्यास कृपया ‘मेनू वर जा‘ बटणावर क्लिक करा किंवा ‘अर्ज सादर करा‘ बटणावर क्लिक करून अर्ज सादर करा. हि सूचना वाचल्यानंतर ओके या बटनावर क्लिक करा.
- पहा या बटनावर क्लिक करा.
- जसे हि तुम्ही पहा या बटनावर क्लिक कराल त्यावेळी तुम्ही ज्या योजनांसाठी अर्ज केलेला आहे त्या सर्व योजनांची यादी या ठिकाणी दिसेल. त्यापैकी १,२,३ या प्रकारे प्राधान्यक्रम निवडा.
- या योजनेसाठी अटी व शर्थी पुढील चौकटीत टिक करा
- अर्ज सादर करा या बटनावर क्लिक करा.
सोलर पंप योजना ऑनलाईन अर्जासाठी पेमेंट करण्याची पद्धत.
- अर्ज सादर करा या बटनावर क्लिक करताच या पेमेंट पेजवर तुम्ही याल.
- पेमेंटचे तपशील वाचून घ्या.
- मेक पेमेंट या बटनावर क्लिक करा.
- पेमेंट करण्यासाठी महा ऑनलाईन सेवेचे पर्याय निवडा
- अर्जदाराने पेमेंट करण्यासाठी उपलब्ध असलेल्या पर्यायापैकी एक पर्याय निवडा
- तुमचे पेमेंट यशस्वी झाल्याची खात्री करा.
- पेमेंटच्या पावतीची प्रिंट काढा किंवा pdf मध्ये सेव्ह करा.
सोलर पंप योजनेचा ऑनलाईन अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी खालील व्हिडीओ पहा
तुम्ही केलेल्या ऑनलाईन अर्जाची स्थिती तपासा
- वेबसाईटच्या मुख्य मुखप्रुष्ठवर या
- स्क्रीनवरील डाव्या बाजूला दिसत असलेल्या अनेक पर्यायापैकी मी अर्ज केलेल्या बाबी या पर्यायावर क्लिक करा.
- पेमेंट पेंडिंग, छाननी अंतर्गत अर्ज, मंजूर अर्ज, नाकारलेले अर्ज असे चार पर्याय तुम्हाला दिसतील
- अर्जाची सद्यस्थिती जाणून घेण्यासठी छाननी अंतर्गत अर्ज या पर्यायावर क्लिक करा.
- तुम्ही केलेल्या अर्जाची सद्यस्थिती या ठिकाणी तुम्ही बघू शकता.
- अर्जाची पोहोच पावती डाउनलोड करण्यासठी डाउनलोड पोहोच पावती या पर्यायावर क्लिक करा.
- तुमच्या अर्जाची पावती डाउनलोड करून घ्या किंवा प्रिंट काढून घ्या.
विविध शासकीय योजनांची माहिती एका क्लिकवर मिळावा.
शेतकरी बंधुंनो या ठिकाणी अगदी सविस्तरपणे सोलर पंप योजना ऑनलाईन प्रक्रिया समजावून घेतलेली आहे. शासनाच्या वतीने अनेक शासकीय योजना सुरु असतात त्या योजनांची माहिती मिळविण्यासाठी आमच्या फेसबुक ग्रुप Whatsapp Group व टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील व्हा. विविध शासकीय योजनांचे ऑनलाईन अर्ज कसे भरावेत हे जाणून घेण्यासाठी आमचे डिजिटल डीजी युट्युब चॅनल सबस्क्राईब करा.
होय. महाडीबीटी शेतकरी पोर्टलवर सौर कृषी पंप योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करता येतो.
महाडीबीटी पोर्टलवर सौर कृषी पंप योजनेसाठी ऑनलाईन अर्ज कसा करावा या संदर्भात या लेखामध्ये सविस्तर माहिती दिलेली आहे. शिवाय एक व्हिडीओ देखील उपलब्ध करून देण्यात आलेला आहे ज्यामुळे ऑनलाईन अर्ज करणे अगदी सोपे होऊन जाते.
महाडीबीटी वेब पोर्टलवर ऑनलाईन नोंदणी केल्यानंतर कोणत्याही योजनेसाठी नंतर अर्ज करता येतो. ऑनलाईन नोंदणी करण्यासाठी आधार कार्ड, बँक पासबुक, सातबारा, एकूण जमिनीचा दाखला. इत्यादी कागदपत्रे लागतात.