ताजी अपडेट्स महाराष्ट्रात दुष्काळ जाहीर. महाराष्ट्रातील ८ तालुक्यामध्ये महाराष्ट्र शासनाच्या वतीने दुष्काळ घोषित करण्यात येत आहे आणि या संदर्भातील शासन निर्णय देखील महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत वेबसाईटवर प्रकाशित करण्यत आलेला आहे. कोणत्या तालुक्यामध्ये दुष्काळ घोषित करण्यात आलेला आहे. दुष्काळग्रस्त तालुक्यांना कोणकोणत्या सवलती मिळणार आहेत. या संदर्भातील काढलेल्या जी आर मध्ये नेमकी कोणती माहिती देण्यात आली आहे. हि आणि इतर महत्वाची माहिती आपण आजच्या लेखामध्ये बघणार आहोत. या दुष्काळ संदर्भातील व्हिडीओ बघण्यासाठी येथे टच करा.
कर्जाचा ताण मिटला जाणून घ्या काय आहे कृषी कर्ज मित्र योजना
महाराष्ट्रात दुष्काळ जाहीर झाला केवळ ८ तालुक्यामध्ये.
2021 च्या खरीप हंगामध्ये महाराष्ट्र राज्यातील तालुक्यामध्ये दुष्काळ घोषित करण्यात आलेला आहे. खरीप २०२१ च्या परिस्थितीनुसार महाराष्ट्र राज्यातील ८ तालुक्यांमध्ये दुष्काळाची दुसरी कळ लागू झाली आहे. उल्हासनगर तालुक्यामध्ये पेरणीच झाली नसल्याने या तालुक्यामध्ये दुष्काळ घोषित करण्याची गरज नसल्याची बाब शासन निर्णयामध्ये दाखविण्यात आलेली आहे.
ही नवीन योजना शेतकऱ्यांच्या कामाची मातोश्री ग्राम समृद्धी शेत पाणंद रस्ते योजना
महाराष्ट्रात दुष्काळ जाहीर झाला या संदर्भातील जी आर बघा.
उर्वरित ७ तालुक्यांमध्ये शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांचे सर्वेक्षण करण्यात आले असून त्या सर्वेक्षण अहवालानुसार राज्यामधील ७ तालुक्यामध्ये दुष्काळ घोषित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. असा उल्लेख देखील दिनांक २८ ऑक्टोबर २०२१ रोजी प्रकाशित केलेल्या जी आर मध्ये केलेला आहे. हा शासन निर्णय म्हणजेच जी आर. महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत वेबसाईटवर प्रकाशित करण्यात आलेला आहे. हा जी आर बघण्यासाठी खालील बटनाला टच करा.
शेतकऱ्यांना खालीलप्रमाणे सुविधा मिळणार
राज्य शासनाने नंदूरबार तालुक्यामध्ये मध्यम स्वरूपाचा दुष्काळ जाहीर केलेला आहे. नंदूरबार तालुक्यामध्ये खालीलप्रमाणे सवलती लागू करण्यास शासनाने मान्यता दिली आहे.
- नंदूरबार तालुक्यामधील शेतकऱ्यांना जमीन महसूल न भरण्यास शासनाने सूट दिलेली आहे.
- तालुक्यातील शेतकऱ्यांच्या पिक कर्जाचे पुनर्गठन करण्यात येणार आहे.
- शेती संबधी कोणतेही कर्ज असेल तर त्या कर्जाच्या वसुलीस स्थगिती देण्यात आलेली आहे.
- कृषी पंपाचे बिल आता शेतकऱ्यांना सवलतीमध्ये भरता येईल म्हणजेच कृषी पंप बिलामध्ये ३३.५ टक्के सूट शेतकऱ्यांना मिळणार आहे.
- तालुक्यातील शालेय किंवा महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क माफ केले जाणार आहेत.
- ज्या ठिकाणी पाणी टंचाई असेल त्या ठिकाणी पिण्याच्या पाण्याचे टँकर्स शासनाच्या वतीने पुरविले जाणार आहेत.
- ज्या ठिकाणी टंचाई जाहीर झालेली आहे त्या भागातील शेतकऱ्यांच्या शेतातील कृषी पंपासाठी असलेली वीज खंडित केली जाणार नाही.
दुष्काळग्रस्त तालुका संदर्भातील इतर काही निकष..
- तालुक्यातील खातेदारांना कृषी विषयक मदतीसाठी निविष्ठा अनुदान अनुज्ञेय राहील.
- निविष्ठा अनुदान हे ३३ टक्केपेक्षा जास्त नुकसान झालेल्या आणि कोरडवाहू पिक उत्पादित केलेल्या खातेदारांना अनुज्ञेय राहील.
- 7/12 मधील पिकांच्या नोंदीच्या आधारे सन २०२१ च्या खरीप हंगामातील मदतीचे वाटप करण्यात येईल.
- पिक निहाय पैसेवारीच्या आधारे कोरडवाहू पिकांचे ३३ टक्के नुकसान ठरविण्यात येईल.
- कोरडवाहू पिकांना सुद्धा हि मदत मिळेल.
- शेतीनिहाय पंचानामे करुन बहुवार्षिक फळपिके त्याचप्रमाणे बागायती पिके यांचे ३३ टक्के पेक्षा जास्त नुकसान झाल्याची शहानिशा करण्यात येतील.
- 7/12 मधील नोंद हाच बहुवार्षिक फळपिके आणि बागायती पिकांचे नुकसान ठरविण्याचा निकष असेल.
- पंचनामा हाच नुकसानीची तीव्रता ठरविण्यासाठी निकष असेल.
- बहुवार्षिक फळपिके आणि बागायती पिकांची नोंद 7/12 वर असेल तरच हे पिके अनुदानासाठी पात्र असतील.
- ज्या तालुक्यामध्ये दुष्काळ घोषित करण्यात आलेला आहे त्या तालुक्यांमधील शाळांमध्ये मध्यान्ह भोजन योजना शाळेच्या सुट्टीच्या कालावधीत देखील राबवली जाईल.
- मध्यान्ह भोजन आणि एकात्मिक बालविकास योजनेअंतर्गत मुलांना पौष्टिक अन्न देण्यात येईल.