अगदी काही मिनिटामध्ये e ferfar online तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये किंवा कॉम्पुटरमध्ये डाउनलोड करू शकता. e ferfar डाउनलोड करण्याची पद्धत कशी असते, पेमेंट ऑनलाईन कसे द्यावे लागते या संदर्भातील संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी बघणार आहोत.
e ferfar संदर्भातील लाईव्ह डेमो असलेला व्हिडीओ या लेखाच्या सर्वात शेवटी देण्यात आलेला आहे. तो व्हिडीओ बघा त्यामध्ये जी पद्दत सांगितलेली आहे त्या पद्दतीने तुम्ही तुमचा e ferfar डाउनलोड करू शकता.
शेतकरी आणि सातबारा हे बंधन अगदी अतूट आहे. शेतकरी बंधुंनो पूर्वी सातबारा असेल किंवा एकूण जमिनीचा दाखला असेल कि मग फेरफार असेल हि कागदपत्रे काढण्यासाठी तलाठी साहेब यांच्याकडे जावे लागत होते.
अर्थातच त्यावेळी तलाठी साहेबांचे कार्यालय तालुक्याच्या ठिकाणी असल्याने शेतकरी बांधवाना तालुक्याच्या ठिकाणी गेल्याशिवाय पर्याय नव्हता.
e ferfar डाउनलोड करा तुमच्या मोबाईलवर.
तालुक्याच्या ठिकाणी जायचे म्हंटले कि शेतीची सर्व कामे सोडून द्यावी लागत होती. यामध्ये शेतकऱ्यांच्या वेळ आणि पैसा खर्च होत होता.
मात्र जसजसा जमाना डिजिटल होत गेला तसतसे जमिनीचे दस्ता ऐवज देखील डिजिटल होत गेले. आता सातबारा असो कि मग एकूण जमिनीचा दाखला असो किंवा e pherphar असो शेतकरी अगदी त्यांच्या मोबाईलवरून हि सर्व कागदपत्रे डाउनलोड करू शकतात.
केवळ पंधरा रुपयामध्ये डिजिटल सातबारा कसा काढावा हे जाणून घ्यायचे असेल तर त्या संदर्भातील व्हिडीओ आणि इतर माहिती आम्ही यापूर्वीच दिलेली आहे. खालील लिंकवर क्लिक करा आणि जाणून घ्या डिजिटल सातबारा कसा डाउनलोड केला जातो.
असा करा डिजिटल सातबारा डाउनलोड.
आज या ठिकाणी आपण जाणून घेणार आहोत कि e ferfar online कसे डाउनलोड कसा करावा लागतो. e ferfar डाउनलोड करण्यासाठी शेतकरी त्यांच्या मोबाईलचा किंवा कॉम्पुटरचा उपयोग करू शकतात.
e ferfar online संदर्भात या लेखाच्या सर्वात शेवटी व्हिडीओ दिलेला आहे तो देखील पहा.
e ferfar संदर्भातील माहिती खालील पद्धतीचा अवलंब करा.
- गुगलमध्ये digital satbara असा कीवर्ड सर्च करा .
- वरील कीवर्ड सर्च केल्यानंतर महाभूमी अभिलेख यांची Digitally signed satbara login अशी लिंक दिसेल त्यावर क्लिक करा.
- आपला सातबारा हि महाभूमी अभिलेखची वेबसाईट ओपन होईल.
- या ठिकाणी तुम्हाला तुमचा युजर आयडी, पासवर्ड व कॅपचा कोड टाकून लॉगीन करायचे आहे.
- तुमच्याकडे जर युजर आयडी आणि पासवर्ड नसेल तर मात्र तुम्हाला नवीन नोंदणी करावी लागणार आहे.
- नोंदणी केल्यावर तुम्हाला तुमचा युजर आयडी आणि पासवर्ड मिळेल तो टाकून लॉगीन व्हा.
- भविष्यामध्ये हा पासवर्ड किंवा युजर आयडी तुमच्याकडे नसेल किंवा तुमच्याकडून हरवला तर तुम्ही मोबाईल otp द्वारे लॉगीन करू शकता यासाठी तुम्हाला OTP based लॉगीन या पर्यायावर क्लिक करायचे आहे.
- एकदा का तुम्ही लॉगीन झालात कि मग नेव्हिगेशन बारमध्ये तुम्हाला विविध्फ पर्याय दिसतील. नेव्हिगेशन बार तुम्हाला समजायला अवघड जात असेल तर आपण त्याला पट्टी म्हनुयात जेणे करून तुम्हाला समजायला सोपे जाईल.
- Digitally signed satbara व Digitally signed 8 A असा पर्याय तुम्हाला दिसेल. यासोबतच तुम्हाला Digitally signed e ferfar असा पर्याय दिसेल त्यावर क्लिक करा.
इ फेरफार डाउनलोड करण्यासाठी करावे लागेल पेमेंट.
तुम्ही लगेच हा e ferfar डाउनलोड करू शकत नाहीत. अगोदर तुम्हाला तुमच्या खात्यामध्ये पुरेशी रक्कम असणे गरजेचे आहे. त्यासाठी रिचार्ज अकाऊंट असा पर्याय दिसेल त्यावर क्लिक करा.
पैसे क्रेडीट करण्यासाठी विविध पर्याय या ठिकाणी उपलब्ध आहेत जसे कि upi, नेट बँकिंग व इतर. कोणत्याही एका पर्यायाचा वापर करून पैसे जमा करा. एक सातबारा, आठ अ किंवा फेरफार डाउनलोड करण्यासाठी १५ रुपये एवढा चार्ज केला जातो.
इ फेरफार डाउनलोड करण्याची पद्धत.
- e ferfar या पर्यायावर क्लिक करा.
- जिल्हा निवडा.
- तालुका निवडा.
- गाव निवडा.
- फेरफार नंबर भरा. ( फेरफार नंबर सातबाऱ्यावर नावाच्या पुढे कंसात दिलेला असतो.)
- सर्वात शेवटी डाउनलोड या बटनावर क्लिक करा.
इ फेरफार कसा काढावा या संदर्भातील खालील व्हिडीओ पहा
जसे हि तुम्ही डाउनलोड या पर्यायावर क्लिक कराल त्यावेळी हा e ferfar तुमच्या कॉम्प्युटर किंवा मोबाईलमध्ये डाउनलोड झालेला असेल.
हा e ferfar डिजिटल असल्यामुळे यावर कोणत्याही स्वाक्षरीची गरज नसते. तर अशा पद्धतीने आपण या ठिकाणी जाणून घेतलेले आहे कि e ferfar online डाउनलोड कसा करावा.