शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी या दिवशी मिळणार 50000 रुपये. जाणून घेवूयात या बद्दल सविस्तर माहिती.
आधार प्रमाणीकरण देखील झाले. आता ५० हजार प्रोत्साहनपर योजनेचा लाभ कधी मिळेल याकडे आता सर्व शेतकरी बांधवांचे लक्ष लागलेले आहे.
तर शेतकरी बंधुंनो ५० हजार प्रोत्साहनपर लाभ शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये कधी जमा होणार आहे या संदर्भातील अधिकृत तारीख जाहीर करण्यात केलेली आहे.
दिनांक २० ऑक्टोबर २०२२ रोजी म्हणजेच अगदी दोन दिवसानंतर हि प्रोत्साहनपर लाभ रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यास सुरुवात केली जाणार आहे.
या संदर्भातील माहिती दस्तुरखुद्द सहकार मंत्री अतुल सावे यांनी दिली आहे.
महात्मा ज्योतीराव फुले शेतकरी कर्ज मुक्ती योजना अंतर्गत अल्प मुदतीच्या पीक कर्जाची नियमितपणे परत फेड करणाऱ्या शेतकरी बांधवाना 50 हजार रुपयांपर्यंत प्रोत्साहनपर लाभ येाजनेचा शुभारंभ लवकरच केला जाणार आहे.
पुढील माहिती पण वाचा सोयाबीन पिक नुकसान असा करा विमा कंपनीकडे 5 मिनिटात दावा
शेतकऱ्यांनाया दिवशी मिळणार 50000 रुपये.
दि. 20 ऑक्टोबर, 2022 रोजी सह्याद्री अतिथीगृह मुंबई येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. अशी माहिती सहकारमंत्री यांनी दिली.
५० हजार प्रोत्साहनपार लाभ योजनेचा लाभ देण्यासाठी सुमारे 7.15 लाख पात्र शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण करण्यात आलेले आहे.
नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर लाभ देण्यासाठी
सन 2017 – 18,
2018 – 19
सन 2019 – 20
अधिक माहितीसाठी खालील व्हिडीओ पहा
वरील कालावधी विचारात विचारात घेतला जाणार आहे. वरील ३ आर्थिक वर्षांपैकी कोणत्याही दोन आर्थिक वर्षांत पीक कर्जाची नियमित परतफेड केलेल्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ दिला जाणार आहे.
आतापर्यंत सुमारे 7. 15 लाख पात्र शेतकरी बांधवांचे आधार प्रमाणीकरण करण्यात आलेले आहे.
५० हजार अनुदान यादी डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.
या योजनेसाठी खालीलप्रमाणे निकष निश्चित करण्यात आले आहेत
दि. 20 रोजीच्या कार्यक्रमात महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत अल्प मुदतीच्या पीक कर्जाची नियमितपणे परतफेड केल्याबदल निवडक पात्र शेतकरी बांधवांना प्रोत्साहन प्रमाणपत्र देखील देण्यात येणार आहे.
खालीलप्रमाणे निकष निश्चित करण्यात आले आहेत.
- कर्जमुक्तीचा लाभ देतांना वैयक्तिक शेतकरी हा निकष गृहित धरण्यात येणार आहे.
- या योजनेसाठी केवळ राष्ट्रीयकृत बँका, खाजगी बँका, ग्रामीण बँका, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका व विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांनी (बँकांकडून कर्ज घेऊन किंवा स्वनिधीतून) शेतकऱ्यांना दिलेले अल्पमुदत पीक कर्ज विचारात घेण्यात येणार आहे.
- सन 2019 वर्षामध्ये राज्यात झालेल्या अतिवृष्टी व महापुरामुळे नुकसान झाल्याने नैसर्गिक आपत्ती अंतर्गत कर्जमाफीचा लाभ मिळालेले शेतकरीसुद्धा सदर योजनेस पात्र असतील.
- तसेच एखाद्या शेतकऱ्यांचा मृत्यू झाला असेल तर त्यांच्या वारसांनी कर्जाची परतफेड केली असल्यास वारससुद्धा प्रोत्साहनपर योजनेच्या लाभास पात्र असतील.
खालील प्रमाणे असेल ५० हजार प्रोत्साहनपर लाभ योजनेची कार्यपद्धती.
- योजनेच्या निकषांची पूर्तता केलेल्या शेतकरी बांधवांच्या कर्जखात्यांची सविस्तर माहिती राष्ट्रीयकृत बँका, खाजगी बँका, ग्रामीण बँका तसेच जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक यांच्या वतीने योजनेच्या वेबसाईटवर अपलोड करण्यात आलेली आहे.
- सदर प्राप्त झालेल्या याद्यांचे संगणकीय संस्करण करण्यात येणार आहे. त्यानंतर पात्र लाभार्थीं शेतकऱ्यांची यादी निर्गमित करण्याची कार्यवाही शासन पातळीवर करण्यात येईल.
- पात्र लाभार्थ्यांच्या याद्या विशिष्ट क्रमांकासह संबंधित बँकेस तसेच विविध कार्यकारी सहकारी सोसायटी येथे उपलब्ध करण्यात येतील.
- सदर यादीमधील संबंधित शेतकऱ्यांच्या नावासमोरच्या विशिष्ट क्रमांकाची नोंद घेऊन शेतकऱ्यांनी बँक कर्ज पासबुक व आधार कार्ड घेऊन बँकेच्या शाखेमध्ये अथवा आपले सरकार सेवा केंद्रामध्ये आधार प्रमाणीकरण करुन घेणे गरजचे आहे.
- शेतकऱ्यांच्या किंवा कर्ज खातेदारांच्या आधार प्रमाणीकरणानंतर संबंधीत शेतकऱ्यांच्या बचत खात्यावर प्रोत्साहनपर योजनेचा लाभ निर्गमित करण्यात येईल.
तर अशा पद्धतीने आता लवकरच शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये ५० हजार प्रोत्साहनपर लाभ जमा होण्यास होणार आहे. यामुळे शेतकरी बांधवांची दिवाळी आनंदात जाणार आहे एवढे मात्र नक्की. कोणत्या दिवशी मिळणार 50000 रुपये या संदर्भात माहिती जाणून घेतली आहे. हा लेख तुम्हाला कसा वाटला त्या बद्दल प्रतिक्रिया द्या.
अधिकृत माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.