दहीहंडी पथकातील गोविंदासाठी आनंदाची बातमी आहे कारण आता इतर खेळाडूप्रमाणे दहीहंडी पथकातील खेळाडूंना देखील शासकीय नोकरीत सामावून घेण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलेले आहे.
एनएससीआय डोम वरळी येथे देशातील १ ली प्रो गोविंदा लीग २०२३ या या स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले.
राष्ट्रीय किंवा अंतरराष्ट्रीय खेळातील यशस्वी खेळाडूंना शासकीय सेवेत सामावून घेतले जाते आता अशाच प्रकारची संधी दहीहंडी या खेळातील खेळाडूंना प्राप्त झाली आहे.
गोविंदाना मिळू शकते संधी
दहीहंडी या खेळतील खेळाडूंना शासनाकडून या आधीच विमा सुरक्षा देण्यात आलेली आहे. त्यामुळे अर्थातच दहीहंडी खेळातील खेळाडूंना शासकीय नोकरी मिळण्याची शक्यता निर्माण झालेली आहे.
शासनाने 50 हजार गोविंदांना विमा सुरक्षा दिलेली आहे. या संदर्भात 50 हजार नोंदणी देखील पूर्ण झाली आहे.
हि नोंदणी अधिक वाढलेली असती परंतु अनेक गोविंदांना नोंदणी करता आली नाही त्यामुळे शासनाने आणखी 25 हजार गोविंदांच्या विमा कवचाला तत्काळ मंजुरी दिली आहे. शासनाने ७५ हजार गोविंदांना विमा संरक्षण दिले आहे.
गोविंदाना शासकीय नोकरीत सामावून घेण्यासाठी शासन प्रयत्नशील
गोविंदाना शासकीय नोकरीत सामावून घेण्यासाठी शासन प्रयत्नशील
राज्यातील सर्व नागरिकांनी आता गणेशोत्सव, नवरात्री असे सन उत्साहात साजरा करावेत. पूर्वीचे सर्व निर्बंध आता काढून टाकले आहेत.
राज्यातील परंपरा सण, उत्सव, एकता, बंधूभाव निर्माण करण्यासाठी महत्त्वाचे असतात. प्रो कबड्डीसारखे प्रो गोविंदासाठी अभिनेते अभिषेक बच्चन यांनी काम करावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
दहीहंडी स्पर्धा राष्ट्रीय पातळीवर घेण्यासाठी देखील प्रयत्न करण्यात येणार असल्याने गोविंदाना आता चांगले दिवस येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
दहीहंडी उत्सव ग्रामीण भामध्ये देखील मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. परंतु या खेळाकडे यापूर्वी गांभीर्याने बघितले गेले नाही परिणामी या खेळाकडे दुर्लक्ष झाले.