पावसाच्या खंडामुळे शेतकरी बांधवांच्या शेतातील पिकांचे खूप मोठ्या प्रमाणत नुकसान झाले आहे. पाउस कधी पडेल या संदर्भात शेतकरी बांधवाना आतुरता लागलेली आहे.
पावसाअभावी शेतकऱ्यांची पिके कोमोजून चालली आहेत. मराठवाड्यासह महाराष्ट्रामध्ये अद्याप समाधानकारक पाऊस पडला नसल्याने शेतकऱ्यांच्या शेतातील विहिरी किंवा बोअरला अजून पाणीच आले नाही. ज्या शेतकरी बांधवांच्या शेतातील विहिरीत पाणी आहे ते संपण्याच्या मार्गावर आहे.
अशा परिस्थितीमध्ये एक आशादायक बाब अशी आहे आणि ती म्हणजे येत्या रविवारपासून म्हजेच ३ तारखेपासून पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामन तज्ञ पंजाब डख यांनी दिला आहे.
पुढील माहितीपण वाचा मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासह पाऊस पडणार पहा कृषी हवामान विभागाचा आताचा अंदाज
रविवारपासून पावसास सुरुवात
3 तारखेपासून महाराष्ट्रामध्ये पाउस पडणार असल्याने शेतकरी बांधवामध्ये आनंदाचे वातावरण तयार झाले आहे. शेतकरी बांधवानी मोठ्या मेहनतीने आपल्या शेतातील पिके थोड्याशा पाण्यावर जगविली आहेत.
सध्या तर सगळीकडे तर दुष्काळसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. अशामध्ये पिकांबरोबरीने गुरांचा पाण्याचा प्रश्न देखील खूप मोठ्या प्रमाणत सतावत आहे.
पंजाब डख यांनी जरी 3 ऑक्टोबर २०२३ रोजी पाउस पडणार असल्याचा अंदाज व्यक्त केला तरी कुठेतरी शंकेची पाल चुकचुकते आहे कि जर पावसाचा अंदाज चुकला तर.
पाऊस पडेल पण या भागात
पंजाब यांनी एक व्हिडीओ सोशल माध्यमांवर अपलोड करून रविवारी म्हणजेज दिनांक 3 ऑक्टोबर पासून पाऊस पडेल असा अंदाज जरी व्यक्त केला असला तरी कोणत्या भागात पाऊस पडेल आणि कोणत्या भागात पाऊस पडणार नाही या बाबत शेतकरी बांधवाना उत्सुकता लागलेली आहे.
3 सप्टेंबर ते 25 सप्टेंबर 2023 दरम्यान बंगालच्या सागरामध्ये चक्रीवादळ तयार होणार असून याचा परिणाम म्हणजे म्ह्राष्ट्रामध्ये पाऊस पडणार असल्याचे मत हवामान तज्ञ पंजाब डख यांनी केले आहे.
पुढील काही दिवसात महाराष्ट्रामध्ये जोरदार पाऊस पडणार असून पिकांना जीवदान मिळणार असल्याने शेतकरी बांधवानी घाबरून जावू नये असे मत पंजाब डख यांनी व्यक्त केले आहे.
खालील भागात पडेल पाऊस
- पूर्व विदर्भ
- पश्चिम विदर्भ
- मराठवाडा
- दक्षिण महाराष्ट्र
- पश्चिम महाराष्ट्र
- कोकण पट्टी
- मुंबई पुणे
- उत्तर महाराष्ट्र
वरील भागात पाऊस पडणार असल्याचे मत हवामान तज्ञ पंजाब डख यांनी दिला आहे. या अंदाजामुळे शेतकरी बांधवांमध्ये आशेचा किरण निर्माण झाला आहे.
शेतातील पिकांनी पार माना टाकल्या असून आता जर पाऊस आला नाही झालेल्या पिकांच्या नुकसानीची भरपाई मिळविण्यासाठी कमीत कमी शेतकरी बांधवानी आपल्या शेतातील झालेल्या नुकसानीची क्रॉप इन्सुरन्स मोबाईल app द्वारे त्याची कंपनीस सूचना द्यावी.