मातंग तरुणांसाठी थेट कर्ज योजना 2023 अर्ज सुरु झाले आहेत. जाणून घेवूयात या संदर्भातील सविस्तर माहिती.
सामाजिक न्याय व विशेष सहाय विभागांच्या वतीने अनुसूचित जातीच्या प्रवर्गातील तरुणांना उद्योग व्यवसाय करण्यासाठी अनुदान उपलब्ध करून दिले जाते.
अनुदान मिळाल्यास असे तरुण त्यांच्या उद्योग व्यवसाय सुरु करू शकतील असा या अनुदानाचा उद्देश आहे.
तुम्ही जर अनुसूचित जात प्रवर्गातील असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे कारण तुम्हाला आता तुमचा स्वतःचा उद्योग व्यवसाय सरू करण्यासाठी कर्ज मिळणार आहे.
यासाठी अर्जदारास १० ऑक्टोबर २०२३ या तारखेच्या आत अर्ज सादर करावा लागणार आहे. जाणून घेवूयात या संदर्भातील सविस्तर माहिती या व्हिडीओ मध्ये त्यामुळे व्हिडीओ शेवटपर्यंत नक्की बघा.
थेट कर्ज योजना २५ हजारांएवजी आता मिळणार १ लाख रुपये कर्ज
थेट कर्ज योजना 2023 अंतर्गत मिळेल कर्ज
तुम्हाला माहित असेलच कि सामाजिक न्याय व विशेष सहाय विभागांतर्गत विविध योजना राबविल्या जातात.
या विभागाच्या वतीने अनुसूचित जातींच्या सामाजिक व आर्थिक विकासाकरिता होतकरू तरुणांना त्यांचा स्वतःचा स्वयंरोजगार उपलब्ध व्हावा या उद्देशाने वैयक्तिक अर्जदारांना उद्योग अथवा व्यवसाय करण्यासाठी कर्ज उपलब्ध करून दिले जाते. तुम्ही जर मातंग समाजातील तरुण असाल तर तुम्हाला उद्योग व्यवसाय करण्यासाठी कर्ज मिळू शकते.
मुंबई शहर व उपनगरातील अनुसूचित जातीमधील मातंग पोटजातीतील अर्जदारांनी १० ऑक्टोबर २०२३ पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे आर्थिक विकास महामंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.
अनुसूचित जाती प्रवर्गामध्ये अनेक प्रकार येतात यामधील मांग, मातंग, मिनी मादिंग, दानखणी मांग, मांग महाशी, मदारी, राधेमां, मांग गारुडी, मांग गारोडी, मदारी मादगी या १२ पोटजातीतील हे तरुण या योजने अंतर्गत थेट कर्ज योजनेसाठी अर्ज करू शकतात.
किती मिळेल कर्ज
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे आर्थिक विकास महामंडळाच्या वतीने थेट कर्ज योजना अंतर्गत एक लाख रुपये कर्ज उपलब्ध मिळते याद्वारे होतकरू तरुण त्यांचा व्यवसाय सुरु करू शकतात.
अर्ज करण्यासाठी पत्ता असा आहे.
जिल्हा कार्यालय मुंबई शहर-उपनगर, गृहनिर्माण भवन, कलानगर, तळमजला, या ठिकाणी अर्जदारांनी त्यांचा अर्ज व मूळ कागदपत्रासह स्वत: साक्षांकित करून अर्ज सादर सादर करणे गरजेचे आहे.
या संदर्भात तुम्हाला अधिक माहिती हवी असेल तर ०२२- २६५९११२४ या नंबरवर संपर्क साधा किंवा rmslasdcbandra@gmail.com यावर इमेलद्वारे देखील अर्जदार संपर्क साधू शकतात.
थेट कर्ज योजना 2023 संदर्भातील अधिकृत माहितीसाठी येथे क्लिक करा.
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे आर्थिक विकास महामंडळाच्या वतीने थेट कर्ज योजना अंतर्गत १ लाख रुपयांचे कर्ज उपलब्ध करून दिले जाते.
अनुसूचित जाती मधील मातंग समजतील तरुण या योजनेचा लाभ घेवू शकतात.
योजनेचा लाभ घेण्यासाठी म्हणजेच थेट कर्ज योजना अंतर्गत १ लाख रुपयांचे कर्ज मिळविण्यासाठी अर्ज कोठे करावा या संदर्भातील सविस्तर माहिती या लेखामध्ये दिलेली आहे.
त्यासाठी हा लेख संपूर्ण वाचा माहिती अधिक चांगल्या पद्धतीने समजावी यासाठी व्हिडीओ देखील देण्यात आलेला आहे तो व्हिडीओ देखील पहा.