भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना swadhar yojana अंतर्गतअनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील विद्यार्थी या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करू शकतात. ज्या विद्यार्थांना परीक्षेमध्ये 60% पेक्षा जास्त गुण प्राप्त आहेत तेच या योजनेसाठी अर्ज करू शकतात.
हि योजना संपूर्ण महराष्ट्रात लागू आहे. जालना जिल्ह्यातील पात्र विद्यार्थ्यांनी 31 डिसेंबर पर्यंत त्यांचे अर्ज दाखल करावेत असे आवाहन करण्यात आले आहे.
अनुसूचित जमाती व नवबौद्ध प्रवर्गातील विद्यार्थी ज्यांना 60 टक्के पेक्षा जास्त गुण आहेत अशाच तरुणांना या डॉ बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना अंतर्गत लाभ मिळतो.
जाणून घ्या डॉ बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना संदर्भात संपूर्ण माहिती
राज्यांमध्ये दिवसेंदिवस व्यावसायिक व बिगर व्यावसायिक महाविद्यालयाची संख्या वाढत चालेली आहे. कॉलेजमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्याची संख्या जर बघितीली तर त्या तुलनेत वसतीगृहे कमी आहेत. यामुळे अनेक विद्यार्थ्यांना अडचणींचा सामना करावा लागतो.
वसतीगृहामध्ये प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांना शिक्षण घेत असतांना जागेची व्यवस्था स्वतः करण्यासाठी काही वार्षिक भत्ते शासनाकडून या विद्यार्थ्यांना देण्यात येतात.
आर्थिक स्वरुपात विद्यार्थांना देण्यात येणारे हे भत्ते DBT पोर्टलद्वारे म्हणजेच डायरेक्ट बेनिफिट ट्रान्स्फर प्रणालीद्वारे देण्यात येते.
बांधकाम कामगार शिष्यवृत्ती योजना मिळू शकेल १ लाखापर्यंत अनुदान.
अशी आहे स्वाधार योजना swadhar yojana
महाराष्ट्र राज्यातील मॅट्रिकोत्तर म्हणजेच इयत्ता अकरावी बारावी त्याचप्रमाणे पदवी, पदव्युत्तर पदवी शिक्षण घेण्यासाठी शासकीय वसतीगृहामध्ये प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक गरजा भागविण्यासाठी वर्षाकाठी काही आर्थिक अनुदान दिले जाते ते खालीलप्रमाणे आहे.
अ.क्र. | खर्चाची बाब | मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, पुणे पिंपरी चिंचवड नागपूर इत्यादी ठिकाणी उच्च शिक्षण घेत असलेला विद्यार्थी | क वर्ग महानगर पालिका क्षेत्रामध्ये उच्च शिक्षण घेत असलेला विद्यार्थी | इतर ठिकाणी उच्च शिक्षण घेणारा विद्यार्थी |
---|---|---|---|---|
1 | भोजन भत्ता | 32,000 | 28,000 | 25,000 |
2 | निवास भत्ता | 20,000 | 15,000 | 12,000 |
3 | निर्वाह भत्ता | 08,000 | 08,000 | 06,000 |
60,000 | 51,000 | 43,000 |
या व्यतिरिक्त विद्यार्थी जर अभियांत्रिकी शाखेतील असेल तर अशा विद्यार्थ्यांसाठी प्रतिवर्ष 5 हजार रुपये व इतर शाखेतील विद्यार्थी असेल तर त्यांच्यासाठी 2 हजार रुपये एवढी रक्कम शैक्षणिक साहित्यासाठी ठोक स्वरुपात दिली जाते.
खालील व्हिडीओ पहा
योजनेच्या अटी व नियम
स्वाधार योजनेच्या काही अटी आणि नियम आहेत ते खालील प्रमाणे.
अकरावी बारावी किंवा पदवी पदविका परीक्षेमध्ये 60 टक्के पेक्षा जास्त गुण असणे अनिवार्य आहे
अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी हि मार्यादा 50% असणार आहे.
किती विद्यार्थ्यांना योजनेचा लाभ द्यायचा याची संख्या निश्चित केलेली असते परंतु जास्त विद्यार्थ्यांचे अर्ज आले तर गुणवत्तेनुसार निवड करण्यात येते.
योजनेचे निकष अटी व शर्ती
योजनेचा लाभ मिळण्यासाठी विद्यार्थी अनुसूचित जाती व नवबौद्ध या प्रवर्गाचा असावा.
विद्यार्थ्याने जातीचा दाखला सादर करणे बंधनकारक असणार आहे.
विद्यार्थी महाराष्ट्राचा रहिवासी असावा.
विद्यार्थ्यांनी स्वतःचा आधार क्रमांक त्यांनी ज्या राष्ट्रीयकृत किंवा शेड्युल बँकेत खाते उघडलेले आहे त्या खात्याशी लिंक असणे गरजेचे आहे.
विद्यार्थ्यांच्या पालकाचे उत्पन्न अडीच लाख पेक्षा जास्त नसावे.
विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतलेली शैक्षणिक संस्था ज्या ठिकाणी अशा ठिकाणचा सदर विद्यार्थी रहिवासी नसावा.
विद्यार्थी इयत्ता अकरावी बारावी आणि त्यानंतरचे दोन वर्षापेक्षा कमी कालावधी नसलेल्या अभ्यासक्रमासाठी उच्च शिक्षण घेणार असावा यात अकरावीने बारावी मध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यास दहावी मध्ये किमान 60% गुण असणे अनिवार्य आहे.
इयत्ता बारावी नंतरच्या दोन वर्षाकरिता जास्त कालावधी असलेल्या पदविका किंवा पदवी अभ्यासक्रमास प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यास इयत्ता बारावी मध्ये 60% पेक्षा जास्त गुण असणे अनिवार्य आहे.
दोन वर्षापेक्षा कमी कालावधी नसणाऱ्या कोणत्याही मान्यता प्राप्त अभ्यासक्रमास प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यास योजनेचा लाभ घेण्यासाठी प्रत्येक वर्षी किमान 60% गुण किंवा त्यात त्या प्रमाणात ग्रेडेशन गुण असणे आवश्यक आहे.
स्वाधार योजनेसाठी महत्वाची कागदपत्रे.
इयत्ता बारावी नंतर पदविका पदवी अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेणारा अभ्यासक्रम हा दोन वर्षापेक्षा आणि पदवीनंतर पदवी तर पदवी किंवा पदविका अभ्यासक्रमाचा कालावधी ही दोन वर्षापेक्षा कमी नसावा
या योजनेमध्ये दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी 3 टक्के आरक्षण असणार आहे. दिव्यांग विद्यार्थ्यांना कमीत कमी 50% गुण असणे आवश्यक राहणार आहे.
योजनेसाठी लागणारी कागदपत्रे
जातीचा दाखला
महाराष्ट्राचा रहिवासी असल्याचा पुरावा यामध्ये रेशन कार्ड, निवडणूक ओळखपत्र, जन्मतारखेचा दाखला, शाळेची टी.सी. यापैकी एक सादर करावा.
आधार कार्डची छायांकित प्रत.
पासबुकच्या पहिल्या पृष्ठाची छायांकित प्रत किंवा बँक स्टेटमेंटची प्रत किंवा रद्द केलेला धनादेशाची छायांकित प्रत.
सर्व प्रती छायांकित असाव्यात ओरीजनलची आवश्यकता नाही
तहसीलदार समान दर्जा असलेल्या महसूल अधिकाऱ्याने दिलेले उत्पन्न प्रमाणपत्र.
विद्यार्थी दिव्यांग असल्यास त्याबाबतचे प्रमाणपत्र.
इयत्ता दहावी बारावी किंवा पदवी परीक्षेचे गुणपत्रक.
महाविद्यालयाचे बोनाफाईड सर्टिफिकेट.
विद्यार्थिनीचे लग्न झालेले असल्यास पतीच्या उत्पन्नाचा पुरावा.
बँक खाते आधार क्रमांकशी लिंक केल्या संदर्भातील पुरावा
विद्यार्थिनी कोणत्याही शासकीय वसती गृहात प्रवेश घेतला नसल्याबाबत शपथपत्र.
स्थानिक रहिवासी नसल्याबाबतचे प्रमाणपत्र
विद्यार्थी सध्या जिथे राहतो त्याबाबत पुरावा जसे कि खाजगी वसतीगृह, भाडे करारनामा,
महाविद्यालयाची उपस्थिती प्रमाणपत्र
सत्र परीक्षेच्या निकालाची प्रत
अर्जाचा नमुना डाउनलोड करा.
स्वाधार योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जाचा नमुना हवा असेल तर खालील लिंकवर क्लिक करा.
अर्जाचा नमुना डाउनलोड करा.