कर्ज वसुलीस स्थगिती शासनाचा नवीन जी आर, जाणून घेवूयात या संदर्भातील सविस्तर माहिती या लेखामध्ये.
शासनाच्या वतीने नोव्हेंबर २०२३ मध्ये ४० तालुक्यांमध्ये दुष्काळ घोषित करण्यात आला होता. या अनुषंगाने ज्या तालुक्यांमध्ये दुष्काळ घोषित करण्यात आला आहे.
त्या तालुक्यातील शेतकऱ्यांच्या कर्जाची वसुली करण्यास शासनाने स्थगिती दिली आहे या संदर्भातील शासन निर्णय नुकताच महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर निर्गमित करण्यात आला आहे.
महाराष्ट्र शासनाने राज्यातील १०२१ महसुली मंडळामध्ये पिक कर्जाचे पुनर्गठन करणे व शेतीशी निगडीत कर्जाच्या वसुलीस स्थगिती देण्याबाबतचा शासन निर्णय दिनांक २९ डिसेंबर २०२३ रोजी काढलेला आहे.
राज्यातील १०२१ महसुली मंडळामध्ये खरीप हंगामामध्ये म्हजेच जून ते सप्टेंबर २०२३ मध्ये सरासरी पावसाच्या प्रमाणापेक्षा ७५ टक्के कमी झाले होते. या मंडळातील शेतकऱ्यांना व ज्या ४० तालुक्यांमध्ये दुष्काळ घोषित करण्यात आला आहे त्या तालुक्यातील शेतकऱ्यांचे कर्ज वसुली करण्यास स्थगिती देण्यात आली आहे.
शिवाय या शेतकरी बांधवांच्या कर्जाचे पुनर्गठन देखील करण्यात येणार आहे.
कर्ज वसुलीस स्थगिती
या जी आर नुसार आता शेतीशी निगडीत कर्जाची वसुली स्थगित केली जाणार असून अल्पमुदतीच्या कर्जाचे मध्यम मुदत कर्जात रुपांतर केले जाणार आहे. त्यामुळे तुम्ही ज्या बँकेतून कर्ज घेतले असेल ती बँक आता तुमच्याकडे कर्ज वसुलीसाठी येणार नाही.
महाराष्ट्रामध्ये या वर्षी म्हणजेच खरीप हंगाम २०२३ मध्ये कमी पाऊस झाल्याने शेतकऱ्यांच्या शेतामध्ये जोमदार पिक आले नाही. यामुळे शेतकरी बांधवाने उत्पन्न घटले असून ज्या बँकेकडून पिक कर्ज घेतले होते ते आता कसे फेडायचे या विवंचनेत शेतकरी बांधव होते.
शासनाच्या या निर्णयामुळे शेतकरी बांधवाना दिलासा मिळणार आहे.
शेती व्यवसायाला जोड धंदा हवा
शासनाने कर्जाच्या वसुलीस स्थगिती जरी दिली असली तरी हा कायमस्वरूपी तोडगा असू शकत नाही. कधीतरी शेतकऱ्यांना घेतलेल्या कर्जाची वसुली करावीच लागणार आहे. शेतकऱ्यांचे संपूर्ण जीवनमान हे शेतीवर अवलंबून असल्याने जर नैसर्गिक संकटे आली तर शेतकरी बांधव अडचणीत येतात.
अशावेळी शेतीला जोड धंदा म्हणून दुग्ध व्यवसाय, शेळी पालन किंवा कुक्कुटपालन असे व्यवसाय केल्यास शेतकरी बांधवानी आर्थिक उन्नती होऊ शकते.
तुम्हाला जर शासकीय अनुदानावर गाई म्हशी किंवा शेळ्या हव्या असतील तर तुम्ही नाविन्यपूर्ण योजना अंतर्गत ५० टक्के किंवा ७५ टक्के अनुदानावर शेळ्या घेवू शकता व शेतीला पूरकव्यवसाय करू शकता.
होय या लेखामध्ये जी आर संदर्भातील लिंक दिलेली आहे त्यावर क्लिक करून तुम्ही संपूर्ण जी आर वाचू शकता.
नाही, ४० दुष्काळ घोषित तालुके व १०२१ दुष्काळसदृश्य महसुली मंडळे यातील शेतकऱ्यांसाठी हि योजना लागू असणार आहे.