बांधकाम कामगार संसार बाटली GR पहा
या लेखामध्ये सर्वात शेवटी शासनाच्या GR ची लिंक दिली आहे त्यावर क्लिक करून संसार बाटली जी आर डाउनलोड करा.
तुम्हाला संसार बाटली म्हणजेच संसार कीट मिळाली पण त्यामध्ये किती भांडे आहेत कोणती भांडे असायला पाहिजे हे तुम्हाला माहित आहे का? नसेल तर हा लेख खास तुमच्यासाठी आहे. शासकीय स्तरावरून बांधकाम कामगारांना विविध योजनांचा लाभ दिला जातो.
परंतु बऱ्याच बांधकाम कामगारांना या संदर्भात माहिती नसण्याची शक्यता असते. शासनाकडून किती लाभ दिला जातो आणि प्रत्यक्ष लाभार्थींना किती पदरात पडतो हा प्रश्न अनुत्तरीतच राहतो.
त्यामुळे आपल्या बांधकाम कामगार बांधवाना या संदर्भातील सखोल माहिती असावी यासाठी बांधकाम कामगार संसार बाटली जीआर Bandhkam kamgar sansar batli GR ची लिंक या लेखात देण्यात आली असून त्यावर क्लिक करून तुम्ही हा GR डाउनलोड करू शकता.
बांधकाम कामगारांना शासनाकडून गृहपयोगी वस्तू संच मिळत आहे ज्याला ग्रामीण भागामध्ये सरळ भाषेमध्ये संसार बाटली किंवा संसार किट म्हणून संबोधले जात आहे. गृहपयोगी वस्तू संचामध्ये मिळणाऱ्या ज्या वस्तू आहेत त्या खालीलप्रमाणे आहेत.
बांधकाम कामगार संसार बाटली कामगारांना मिळणाऱ्या वस्तू खालीलप्रमाणे आहे
ताट.
वाट्या.
पाण्याचे ग्लास.
पातेले.
भात वाटप करण्यासाठी मोठा चमचा.
1.5 लिटर्स क्षमता असलेला पाण्याचा जग.
मसाल्याचे डब्बे.
परात.
स्टेनलेसस्टीलचे 5 लिटर्सचे प्रेशर कुकर.
स्टीलची कढई.
मोठी स्टीलची टाकी.
इत्यादी वस्तूंचा या संसार बाटलीमध्ये समावेश करण्यात आला आहे.
बांधकाम कामगार संसार बाटली जीआर डाउनलोड करा
अनेक मित्रांनी मला या बांधकाम कामगार संसार बाटली संदर्भातील जीआर bandhkam kamgar sansar batli GR ची मागणी केली होती. त्यामुळे शासनाचा हा गृहपयोगी वस्तू संच योजनेचा जी आर मी तुमच्यासाठी शोधून काढलेला आहे.
बांधकाम कामगारांना गृहपयोगी वस्तूची हि जी योजना आहे ती कशी राबविली जाणार आहे किती भांडे मिळणार आहे. या संदर्भातील सविस्तर माहिती या शासनाच्या bandhkam kamgar GR जीआरमध्ये उपलब्ध करून देण्यात आली आहे.
वरील लिंकवर क्लिक करून हा जीआर सविस्तर वाचून घ्या. यामध्ये शासनाकडून सूचित करण्यात आले आहे कि बांधकाम कामगारांना कोणत्या वस्तू मिळणार आहेत आणि त्याची संख्या किती आहे.
कामगार भांडे वाटप योजना बंद झाली.ज्यांना भांडे नाही मिळाले त्यांचे काय होणार अधिक माहितीसाठी खालील लिंकवर टच करा.
बांधकाम कामगार भांडे योजना वाटप कधी चालू होणार या संदर्भातील सविस्तर माहितीसाठी येथे क्लिक करा.
बांधकाम कामगारांना मिळतो अनेक योजनांचा लाभ
केवळ संसार बाटलीच नव्हे तर इतरही विविध योजनांचा लाभ बांधकाम कामगारांना मिळतो. जसे कि बांधकाम कामगारांच्या मुलींना लग्नासाठी ५१ हजार रुपयांचे आर्थिक सहाय्य, मुलांना शिष्यवृत्ती, बांधकाम कामगारांसाठी घरकुल योजना हि आणि इतर विविध योजनांचा लाभ शासनाच्या वतीने दिला जातो.
या सर्व योजनांचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला तुमची बांधकाम कामगार नोंदणी करणे गरजेचे आहे. तुम्ही जर तुमची बांधकाम कामगार नोंदणी केली नसेल तर लगेच करून घ्या.
बांधकाम कामगार नोंदणी कशी केली जाते या संदर्भातील व्हिडीओसह इतर महत्वाची माहिती जाणून घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
बांधकाम कामगार नोंदणी 1 रुपयात ऑनलाईन पद्धतीने पहा प्रत्यक्ष उदाहरण bandhkam kamgar yojana