जाणून घेवूयात बॅटरी संचलित फवारणी पंप Battery operated spray pump संदर्भात सविस्तर माहिती.
बॅटरी संचलित फवारणी पंप Battery operated spray pump अनुदानासाठी अर्ज कसा करावा हे जर तुम्हाला माहित नसेल तर या लेखाच्या सर्वात शेवटी एक व्हिडीओ देण्यात आला आहे. तो व्हिडीओ बघून देखील तुम्ही ऑनलाईन अर्ज करू शकता.
कपाशी, सोयाबीन इत्यादी पिकांवर औषध फवारणी करण्यासाठी शेतकरी बांधवाना फवारणी पंपाची आवश्यकता असते.
शेतीसाठी लागणाऱ्या निविष्ठा खरेदी करण्यासाठी अगोदरच शेतकरी बांधवांकडे पैसे नसतात परंतु औषध फवारणी करायची असेल तर पंप घ्यावाच लागतो.
खालील योजना पण कामाची आहे.
बांधकाम कामगार शिष्यवृत्तीसाठी कागदपत्रे लागतात pdf मध्ये डाउनलोड करून घ्या
बॅटरी संचलित फवारणी पंप मिळविण्यासाठी ऑनलाईन करावा लागेल अर्ज
जर फवारणी पंप नसेल तर ज्यांच्याकडे पंप आहे त्यांच्याकडून औषधांची फवारणी करून घ्यावी लागते यासाठी त्यांना पैसे द्यावे लागतात.
तुम्हाला स्वतः औषध फवारणी करायची असेल मात्र तुमच्याकडे औषध फवारणी करण्यासाठी पंप नसेल तर तुम्हाला आता शासकीय अनुदानावर बॅटरीवर चालणारा पंप मिळणार आहे.
बॅटरीवर चालणारा पंप अनुदानावर मिळविण्यासाठी अर्ज कसा करावा या संदर्भात आपण या ठिकाणी सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.
अनुदानावर मिळेल फवारणी पंप
बॅटरीवर चालणारा औषध फवारणी पंप खरेदी करायचा असेल तर मार्केटमध्ये यासाठी पैसे द्यावे लागतात. परंतु हाच औषध फवारणी पंप तुम्हाला शासकीय अनुदानावर मिळतो.
कापूस सोयाबीन व इतर तेलबिया आधारित पिक पद्धतीस चालना देवून शेतकऱ्याच्या उत्पन्नात वाढ करून कापूस सोयाबीन व इतर तेलबिया पिकातील मूल्यसाखळीस चालना देणे हा या योजनेचा उद्देश आहे.
या उद्देशाने राज्य पुरस्कृत एकात्मिक कापूस सोयाबीन आणि इतर तेलबिया उत्पादकता वाढ व मूल्यसाखळी विकासासाठी विशेष कृती योजना सन २०२२-२३ ते २०२४-२५ या तीन वर्षात राबविण्यात येत आहे.
शासकीय अनुदानावर औषध फवारणी पंप खरेदी करण्यासाठी तुम्हाला अगोदर ऑनलाईन अर्ज करावा लागतो. हा ऑनलाईन अर्ज कसा करावा लागतो या संदर्भात आपण या ठिकाणी सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.
लाडकी बहिण लाभार्थी यादी अशी करा डाउनलोड Ladki bahin labharthi list download
खालील व्हिडीओ पहा आणि त्या प्रमाणे करा अर्ज
औषध फवारणी करण्यासाठी अनेक पंप असतात परंतु बॅटरी संचलित फवारणी पंप असेल तर शेतामध्ये फवारणी करणे खूपच सोपे जाते.
बॅटरीवर चालणारा औषध फवारणी पंप खरेदी करण्यासाठी महाडीबीटी या वेबपोर्टलवर अर्ज करावा लागतो. केवळ महाडीबीटी या वेब पोर्टलवर अर्ज करा असे म्हणून चालणार नाही तर या संदर्भात तुम्हाला अगदी सविस्तर माहिती मिळावी यासाठी आम्ही बांधील आहोत.
याच बाबीचा विचार करून आम्ही बॅटरी संचलित फवारणी पंप ऑनलाईन अर्ज कसा करावा लागतो या संदर्भात सविस्तर माहितीचा व्हिडीओ खास तुमच्यासाठी बनविलेला आहे.
खालील बॅटरी संचलित फवारणी पंप ऑनलाईन अर्ज संदर्भातील व्हिडीओ पहा आणी त्या प्रमाणे अर्ज सादर करून द्या.
अशा पद्धतीने तुम्ही फवारणी पंप योजनेसाठी ऑनलाईन अर्ज सादर करू शकता.
Electric pamp
Rahuri, Brahamangaon bhand