औषध फवारणी पंप अनुदानावर मिळविण्यासाठी महाडीबीटी या वेबसाईटवर अर्ज करण्याचे आवाहन शासनाच्या वतीने करण्यात आलेले आहे.
परंतु हि वेबसाईट सध्या खूपच हँग होत असल्याने शेतकरी अगदी मेटाकुटीला आलेला आहे. फवारणी पंपासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख जवळ येत असल्याने आपला अर्ज सबमिट होतो कि नाही याची शेतकरी बांधवाना चिंता लागलेली आहे.
परंतु काळजी करण्याचे काही कारण नाही मी तुम्हाला अशी ट्रिक सांगणार आहे ज्यामुळे तुमचा अर्ज सबमिट होऊ शकेल आणि तुम्हाला फवारणी पंप शासकीय अनुदानावर मिळू शकेल.
त्यामुळे हि माहिती तुमच्यासाठी खूप महत्वाची ठरणार आहे.
फवारणी पंपासाठी अर्ज कसा करावा या संदर्भात या लेखामध्ये एक व्हिडीओ देखील देण्यात आला आहे. तो व्हिडीओ देखील नक्की पहा.
3 वेळा वाढविण्यात आली फवारणी पंपासाठी अर्ज करण्याची तारीख
महाडीबीटी वेबसाईटवर औषध फवारणी पंप योजनेसाठी करण्यात येणाऱ्या अर्जासाठी तीन वेळा तारीख वाढवून देण्यात आली आहे.
औषध फवारणी पंप योजनेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ६ ऑगस्ट होती हि तारीख वाढवून १४ ऑगस्ट करण्यात आली होती. तरी देखील वेबसाईट व्यवस्थित चालत नसल्याने अनेकांना अर्ज सादर करता आले नाही.
त्यामुळे परत एकदा हि तारीख वाढवून देण्यात आली आहे. आता अर्ज करण्याची शेवटची तारीख २६ ऑगस्ट हि देण्यात आली आहे.
या तारखेच्या आत जर तुम्ही औषध फवारणी पंप योजनेसाठी ऑनलाईन अर्ज केला तर तुम्हाला १०० टक्के अनुदानावर औषध फवारणी पंप मिळणार आहे.
खालील योजना पण पहा
महाडीबीटी वेबसाईट हँग होत असेल तर हि युक्ती वापरा
दिवसा औषध फवारणी पंप योजनेसाठी अर्ज करावयास गेल्यास महाडीबीटी वेबसाईट हँग होत असल्याचे अनेकांचे मत आहे. यामुळे त्यांचा अर्ज सबमिट होऊ शकला नाही असे संदेश अनेकांनी आम्हाला पाठविलेले आहेत.
परंतु तुम्ही जर रात्री १२ वाजेच्या दरम्यान हा अर्ज सादर करण्याचा प्रयत्न केला तर नक्कीच तुमचा अर्ज सादर होऊ शकतो.
रात्रीच्या बारा वाजता औषध फवारणी पंप योजनेसाठी अर्ज कसा सादर करावा लागतो या संदर्भातील सविस्तर माहितीचा लाइव्ह डेमो तयार करण्यात आला आहे. जेणे करून तुम्हाला देखील अशाच पद्दतीने अर्ज सादर करता येईल.
रात्री १२ वाजता अर्ज केल्यास होऊ शकतो सबमिट लाईव्ह डेमो पहा
अनेकदा माहिती सांगितल्यापेक्षा प्रत्यक्ष कृती असेल तर समजण्यास सोपे जाते त्यामुळे औषध फवारणी पंप योजनेचा खास एक व्हिडीओ तयार करण्यात आला आहे.
खालील औषध फवारणी पंपाचा लाइव्ह डेमो पहा
वरील व्हिडीओ बघितल्यानंतर तुमच्या लक्षात आले असेल कि या योजनेसाठी अर्ज कसा करावा लागतो. अगदी अशाच पद्धतीने तुम्ही देखील तुमचा अर्ज सादर करू शकता.
औषध फवारणी पंपासाठी अर्ज करण्याची पद्धत
गुगलसर्चमध्ये maha dbt farmer login असा कीवर्ड टाका.
त्यानंतर महाडीबीटी शेतकरी वेबसाईट वेबसाईट ओपन होईल. या ठिकाणी लॉगीन करण्याच्या दोन पद्धती आहेत.
युजर आयडी पासवर्ड व कॅपचा कोड टाकून तुम्ही लोगिन करू शकता किंवा सरळ आधार otp ने देखील तुम्ही लॉगीन करू शकता.
लोगिन केल्यावर अर्ज करा या लिंकवर क्लिक करा.
कृषी यांत्रिकीकरण या पर्यायासमोर दिसत असलेल्या बाबी निवडा या बटनावर क्लिक करून तुम्हाला अर्ज सादर करायचा आहे.
अर्जामध्ये सविस्तर माहिती सादर केल्यानंतर अर्ज जतन केल्यावर अर्ज सादर करा या बटनावर क्लिक करा.
पहा या बटनावर क्लिक करा.
योजनेचा प्राधान्य क्रमांक निवडा.
योजनेच्या अटी आणि शर्थी मान्य करणाऱ्या चौकटीवर टिक करा आणि अर्ज सादर करा.
नवीन असाल तर २३.६० रुपये पेमेंट करा
अर्ज सादर केल्यावर तुम्हाला २३.६० रुपये शुल्क भरावे लगणार आहे त्यासाठी make payment या बटनावर क्लिक करा.
पेमेंट गेटवे निवडा.
पेमेंट डिटेल वाचून घेतल्यावर प्रोसिड फोर पेमेंट या बटनावर क्लिक करा.
पेमेंट करत असतांना पेजला रिफ्रेश करू नका.
पेमेंट यशस्वी पूर्ण झाल्यावर हे पेज आपोआप रीडायरेक्ट होईल.
फवारणी पंप अर्जाची पावती कशी डाउनलोड करावी
पेमेंटची पावती प्रिंट करून घ्या तुमच्या कॉम्प्युटरला प्रिंटर जोडलेला नसेल तर हि पवती तुम्ही pdf मध्ये सेव्ह देखील करू शकता.
परत एकदा मेन पेजवर या.
कॉम्प्युटर स्क्रीनच्या डाव्या बाजूला असलेल्या मी अर्ज केलेल्या बाबी या बटनावर क्लिक करा.
छाननी अंतर्गत अर्ज या बटनावर क्लिक करा.
या ठिकाणी खाली दिशा दर्शविणारा बाण दिसेल त्यावर क्लिक करताच तुमच्या अर्जाची pdf पावती तुम्हाला दिसेल. कंट्रोल p कमांड देवून पावती प्रिंट करून घ्या किंवा सेव्ह as pdf करून घ्या.
अशा पद्धतीने तुम्ही महाडीबीटी वेबसाईटवर फवारणी पंपासाठी ऑनलाईन अर्ज करून द्या.
वेबसाईट सुरळीत सुरु झाली तर ठीक आहे नाहीतर परत hang होत असेल तर रात्री बारा वाजता अर्ज करण्याचा प्रयत्न केल्यास तुमचा अर्ज सबमिट होऊ शकतो.