मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना mukhyamantri saur krushi vahini yojana अंतर्गत शेतकऱ्यांना दिवसा वीज उपलब्ध करून दिली जाणार आहे शिवाय शेतकऱ्यांना प्रती एकर ५० हजार रुपये भाडे देखील शासनाकडून मिळणार आहे.
या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज कसा करावा लागतो या संदर्भातील सविस्तर माहितीचा व्हिडीओ या लेखाच्या सर्वात शेवटी देण्यात आला आहे.
शासनाच्या अनेक कल्याणकारी योजना आहेत यातीलच एक योजना म्हणजे मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2.0 हि योजन होय.
14 जून 2017 मध्ये मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी हि योजना सुरु करण्यात आली होती. या योजना अंतर्गत योजनेचा लाभ घेण्यास अडचणी निर्माण झाल्याने या योजनेमध्ये सुधारणा करण्यात आली आणि आता नवीन मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी 2.0 हि योजना शासनाने लागू केली आहे.
मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी या योजनेचा उद्देश
शेतकरी बांधवांच्या कृषी पंपाना दिवसा वीज देणे हा या योजनेचा उद्देश आहे. दिवसा लाईट नसल्याने अनेकवेळा शेतकरी बांधवाना रात्रीच्या वेळी शेताला पाणी द्यावे लागते.
रात्रीच्या वेळी शेतीला पाणी देण्यासाठी गेल्याने अनेक शेतकऱ्यांना साप, विंचू, किंवा हिंस्र प्राण्याचा हल्ला असेल यामध्ये त्यांना आपला जीव देखील गमवावा लागला आहे.
याच बाबीचे महत्व लक्षात घेवून शासन आता मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी 2.0 या क्रांतीकरी अभियानातून शेतकऱ्यांना दिवसा वीज उपलब्ध करून देणार आहे.
मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी अंतर्गत कशी मिळणार दिवसा वीज
या योजना अंतर्गत 2025 पर्यंत शेतकऱ्यांना दिवसा अखंडित वीज मिळणार आहे. यासाठी शासन आता शेतकऱ्यांच्या शेतातच सोलर प्लांट उभारणार आहे. यासाठी शेतकऱ्यांना एकरी 50 हजार रुपये एवढे भाडे देखील देणार आहे.
म्हणजेच शेतीसाठी लागणारा विजेचा प्रश्न तर मिटेलच परंतु शेतकऱ्यांना अर्थिल लाभ देखील मिळणार आहे.
कोठे उभारला जाणार हा सोलर प्लांट
महावितरण उपकेंद्रापासून ५ किलोमीटर अंतराच्या आत शेतजमीन असणाऱ्या पडीक किंवा नापीक जमिनीवर हा सोलर प्लांट उभारला जाणार आहे.
ज्या शेतकऱ्यांकडे पडीक, नापीक किंवा मुरमाड जमीन असेल ज्या जमिनीमध्ये अगदीच कमी उत्पन्न निघते असे शेतकरी त्यांची जमीन या प्रकल्पासाठी भाड्याने देवू शकतात.
जमीनधारक म्हणजेच शेतकरी आणि महावितरणमध्ये करार करण्यात येईल आणि यानुसार प्रती एकर 50 हजार रुपये याप्रमाणे शेतकऱ्याला दरवर्षी भाडे देण्यात येईल.
या प्रकल्पातून निर्माण होणारी वीज शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
योजनेचे निकष
शेतकरी 3 एकरपासून 10 एकरवर हा सोलर प्लांट उभारला जावू शकतो.
महावितरण उपकेंद्रापासून 5 किलोमीटरच्या आत जमीन असणे आवश्यक आहे.
वार्षिक ५० हजार भाडे मिळणार शिवाय वार्षिक टक्के दरवाढ देखील मिळेल.
कोठे आणि कसा कराल अर्ज.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन अर्ज कसा करावा या संदर्भातील सविस्तर माहितीचा खालील व्हिडीओ पहा.
सौर कृषी वाहिनी 2.0 या योजना mukhyamantri saur krushi vahini yojana अंतर्गत 50 हजार प्रती महिना भाडे मिळविण्यासाठी ऑनलाईन अर्ज करावा लागणार आहे. खालील बटनावर क्लिक करून तुम्ही अर्ज सादर करू शकता.