तुम्ही देखील मागेल त्याला सौर कृषी पंप योजना अंतर्गत ऑनलाईन अर्ज करत असाल आणि अर्ज करतांना land owners name या पर्यायामध्ये तुमचे अर्थात शेतकऱ्याचे नाव दिसत नसेल तर कोणता उपाय करावा जाणून घेवूयात या संदर्भातील सविस्तर माहिती.
मागेल त्याला सौर कृषी पंप योजना अंतर्गत अर्ज करतांना नाव न दिसण्याची जी समस्या येत आहे ती अगोदर समजून घेवूयात.
पूर्वी सौर कृषी पंप योजनेचा अर्ज करण्यासाठी वेगळे पोर्टल होते आता मागेल त्याला सौर कृषी पंप योजना नावाचे नवीन पोर्टल निर्माण करण्यात आले आहे.
यामुळे जुना देटा fetching होण्यासाठी थोडा वेळ लागत आहे. परंतु तुम्ही या संदर्भात महावितरण कार्यालयाशी संपर्क साधू शकता किंवा महावितरणच्या पोर्टलवर दिलेल्या टोल फ्री नंबरवर संपर्क साधू शकता.
सौर कृषी पंप योजनेसाठी अगदी मोबाईलवरून देखील करता येतो अर्ज. सविस्तर माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
मागेल त्याला सौर कृषी पंप योजना असा करा ऑनलाईन अर्ज मोबाईलद्वारे magel tyala saur krushi pump yojana
Land owners name not showing इमेलद्वारे साधा कंपनीशी संपर्क
मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेचा ऑनलाईन अर्ज करतांना अडचण आल्यास हि अडचण तुम्ही महावितरण कंपनीस इमेलद्वारे कळवू शकता जेणे करून तुमची समस्या सोडविण्यासाठी उपाय योजना होऊ शकते.
customercare@mahadiscom.in या इमेलवर मेल पाठवावा.
मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेचा अर्ज करतांना तुमचे नाव दिसत नसेल तर कोणत्या इमेलवर कसा मेल पाठवावा यासाठी खालील व्हिडीओ पहा.
वरील व्हिडीओ बघितल्यावर तुम्हाला कळले असेल कि कशाप्रकारे महावितरण कंपनीस अडचणीची सूचना देता येते.
टोल फ्री नंबरवर साधू शकता संपर्क
तुम्हाला जर इमेल करता येत नसेल तर मागेल त्याला सौर कृषी पंप योजना संदर्भातील अडचण कंपनीच्या टोल फ्री नंबरवर देखील सादर करू शकता.
1800-233-3435 व 1800-212-3435 या नंबरवर फोन करा.
अशा प्रकारे मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेचा ऑनलाईन अर्ज सादर करतांना तुम्हाला तुमचे नाव दिसत नसेल land owners name not showing तर तुम्ही महावितरण कंपनीस इमेल किंवा toll free नंबरवर call करू शकता.
मोबाईलद्वारे करता येतो सौर कृषी पंप योजनेसाठी अर्ज.
मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेचा अर्ज अगदी मोबाईलवरून देखील करता येतो. तुमच्याकडे laptop किंवा कॉम्प्युटर नसेल तर तुम्ही अगदी तुमच्या मोबाईलवरून देखील मागेल त्याला सौर कृषी पंप योजना अंतर्गत अर्ज करू शकता.
अर्ज कसा करावा कोणकोणती कागदपत्रे अपलोड करावीत हि आणि इतर महत्वाच्या माहितीसाठी खालील व्हिडीओ पहा.