सोयाबीन कापूस अनुदान इकेवायसी करा मोबाईलवरून soyabean kapus anudan ekyc संदर्भात जाणून घेवूयात सविस्तर माहिती.
सोयाबीन आणि कापूस या दोन पिकांना मागील वर्षी म्हणजेच २०२३ या आर्थिक वर्षामध्ये कमी भाव मिळाला असल्याने शासनाने या पिकांना विशेष आर्थिक सहाय्य अंतर्गत मदत करण्याचे जाहीर केले आहे.
ज्या शेतकऱ्यांनी मागील वर्षी म्हणजेच 2023 या वर्षामध्ये सोयाबीन व कापूस पिकांची लागवड केली होती त्या शेतकऱ्यांना 20 गुंठ्याला 1 हजार रुपये अशी सरसकट मदत जाहीर केलेली आहे.
हि मदत त्याच शेतकऱ्यांना मिळणार आहे ज्यांनी इ पिक पाहणी ॲपचा उपयोग करून त्यांच्या शेतातील पिकांची पाहणी केली आहे.
खालील माहिती पण कामाची आहे
बांधकाम कामगार शिष्यवृत्तीसाठी कागदपत्रे लागतात pdf मध्ये डाउनलोड करून घ्या
तुम्ही देखील मागील वर्षी तुमच्या शेतातील पिकांची इ पिक पाहणी केली असेल आणि तुम्ही या योजनेसाठी पात्र असेल तर लगेच तुम्ही सोयाबीन कापूस अनुदान इकेवायसी soyabean kapus anudan eKYC करून घ्या.
हि इकेवायसी तुम्ही अगदी तुमच्या मोबाईलवरून देखील करू शकता. कोठेही जाण्याची गरज नाही.
सोयाबीन कापूस अनुदान इकेवायसी अशी करा मोबाईलवरून
शेतकरी बांधवाना अनुदान हवे असेल तर सोयाबीन कापुस अनुदान इकेवायसी करणे गरजेचे आहे. हि इकेवायसी करण्याचे तीन प्रकार आहे ते समजावून घेवूयात.
1 ) शेतकऱ्यांच्या आधार नंबरला जर मोबाईल लिंक असेल तर शेतकरी स्वत: इकेवायसी करू शकतात. आधारला लिंक असलेल्या मोबाईल नंबरवर एक ओटीपी येतो हा OTP टाकून शेतकरी स्वतः स्वताची soyabean kapus anudan ekyc करू शकतात.
2 ) तुमच्या आधार कार्डला जर मोबाईल नंबर लिंक नसेल तर बायोमेट्रिक यंत्राच्या सहाय्याने देखील तुम्ही तुमची सोयाबीन कापूस अनुदान इ केवायसी करू शकता. यासाठी तुम्हाला जवळच्या सीएससी सेंटरवर जावे लागेल.
3 ) सर्वात शेवटचा पर्याय म्हणजे तुमच्या तालुक्यातील कृषी सहाय्यक यांच्याकडे जावून देखील तुम्ही तुमची soyabean kapus anudan ekyc करू शकता. कृषी सहाय्यक त्यांचा लॉगीन आयडी आणि पासवर्ड टाकून शेतकऱ्यांच्या otp च्या सहाय्यने हि सोयाबीन कापूस अनुदान इ केवायसी करू शकतात.
soyabean kapus anudan ekyc संदर्भातील खालील व्हिडीओ पहा
शेतकऱ्याला स्वतः ऑनलाईन पद्धतीने ekyc कशी करता येते हे प्रत्यक्ष जाणून घेण्यासाठी खालील व्हिडीओ पहा. या व्हिडीओमध्ये सांगितलेल्या पद्धतीने तुम्ही तुमची इ केवाय सी करू शकतात.
खालील योजनेचा पण लाभ घ्या.
बांधकाम कामगार भांडे योजनेसाठी करा अर्ज मिळेल 30 भांडे अर्ज pdf मध्ये डाउनलोड करा
शासनाच्या अर्थसहाय्य योजनेचा लाभ खालील प्रमाणे शेतकऱ्यांना मिळणार आहे
जमीन क्षेत्र 20 गुंठे – 1000 रुपये अनुदान.
40 गुंठे जमिनीसाठी – 2 हजार रुपये.
60 गुंठे जमिनीसाठी – 3 हजार रुपये.
80 गुंठे जमिनीसाठी – 4 हजार रुपये.
100 गुंठे म्हणजेच 1 हेक्टर जमिनीसाठी – 5 हजार रुपये.
वरील जमीन क्षेत्रावर सोयाबीन किंवा कापूस लागवड केल्याची इ पिक पाहणी ॲपद्वारे नोंद केलेली असावी.
अधिकृत माहितीसाठी येथे क्लिक करा.