आयुष्यमान कार्ड योजना 2025 : 16 ते 31 ऑगस्ट 2025 पर्यंत अभियान मिळणार 5 लाखांपर्यंत लाभ

आयुष्यमान कार्ड योजना 2025 : 16 ते 31 ऑगस्ट 2025 पर्यंत अभियान मिळणार 5 लाखांपर्यंत लाभ

भारत सरकार व महाराष्ट्र शासनाच्या वतीने आयुष्यमान कार्ड योजना 2025 अंतर्गत राज्यातील लाखो कुटुंबांना मोफत व दर्जेदार आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यात येत आहे.
ही योजना प्रत्यक्षात 3 मोठ्या योजनांचे एकत्रित रूप आहे –

  1. आयुष्मान भारत.
  2. प्रधानमंत्री जन आरोग्य योजना (PMJAY)
  3. महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना (MJPJAY)

आता या दोन्ही योजना एकत्र आणून राज्यातील प्रत्येक पात्र कुटुंबाला दरवर्षी ₹५ लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार मिळणार आहेत.

पुढील योजना पण पहा प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना

आयुष्यमान कार्ड योजना २०२५ चे प्रमुख फायदे

  • ५ लाखांपर्यंत मोफत उपचाराची सुविधा – प्रत्येक कुटुंबासाठी दरवर्षी.
  • १,३५६ प्रकारचे उपचार समाविष्ट – शस्त्रक्रिया, कर्करोग, हृदयविकार, मूत्रपिंड उपचार, अपघाती उपचार आदी.
  • २,३०० पेक्षा जास्त अंगीकृत रुग्णालये – शासकीय व खासगी दोन्ही प्रकारातील.
  • कॅशलेस उपचार – रुग्णालयात भरती होताना पैसे द्यावे लागत नाहीत.
  • ऑनलाइन नोंदणी व कार्ड निर्मिती – आधार कार्ड व मोबाईल क्रमांकाच्या आधारे सोपे प्रकरण.

आयुष्यमान वय वंदना योजना 2025

महाराष्ट्र शासनाने जेष्ठ नागरिकांसाठी विशेष उपक्रम सुरु केला आहे – आयुष्यमान वय वंदना योजना.

  • नागरिकांना मोफत आरोग्य सेवा.
  • ७० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत उपचार.

वय वंदना योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन शासनाच्या वतीने करण्यात आले आहे. त्यामुळे तुमच्या घरामध्ये कोणी वायोवृद्ध व्यक्ती असेल तर त्यांना या योजेनेची माहिती जरूर कळवा.

पुढील योजनेचा पण लाभ घ्या बांधकाम कामगार योजना महाराष्ट्र

आयुष्यमान कार्ड मिळविण्याची पद्धत

कार्ड बनवण्यासाठी शासनाने सोयीस्कर ठिकाणी सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. खालील व्हिडीओ पहा.

  • शासकीय कार्यालयीन मदत कक्ष
  • आशा सेविका व स्वस्त धान्य दुकाने
  • आपले सरकार सेवा केंद्र
  • अंगीकृत रुग्णालयातील आरोग्य मित्र

फक्त आधार कार्ड व मोबाईल क्रमांक सोबत घेऊन जा आणि तिथेच आयुष्यमान कार्ड तयार करून घ्या. काही अडचण आली तर १५५३८८ या वर फोन करून मदत मिळवू शकता.

मोहीम कालावधी (Special Drive)

आरोग्य विभागाने १६ ते ३१ ऑगस्ट २०२५ दरम्यान विशेष मोहीम जाहीर केली आहे.
या कालावधीत मोठ्या प्रमाणावर आयुष्यमान कार्ड व आयुष्यमान वय वंदना कार्ड तयार करून घेता येतील.

आयुष्यमान कार्ड डाउनलोड कसे केले जाते या संदर्भातील खालील व्हिडीओ पहा.

कोणते उपचार मिळू शकतात?

आयुष्यमान कार्ड योजना २०२५ मध्ये १,३५६ उपचारांचा समावेश आहे. त्यात –

  • हृदयविकाराची शस्त्रक्रिया.
  • कर्करोग उपचार.
  • डायलिसिस.
  • अपघातानंतर उपचार.
  • नेत्र तपासणी व शस्त्रक्रिया.
  • प्रसुती व स्त्रीरोग उपचार.
  • इतर गंभीर आजारांचे उपचार.

आयुष्यमान कार्ड योजना २०२५ का महत्वाची?

ग्रामीण भागात अनेक कुटुंबे आजारी पडल्यावर मोठ्या प्रमाणावर कर्ज काढतात किंवा उपचार न मिळाल्याने अडचणीत येतात.
ही योजना अशा सर्व कुटुंबांसाठी आशेचा किरण आहे कारण –

  • उपचारासाठी पैसे लागणार नाहीत.
  • शासकीय व खाजगी रुग्णालयात मोफत सुविधा.
  • रुग्णाला उपचारावर लक्ष केंद्रित करता येते.
  • आर्थिक सुरक्षितता वाढते.

निष्कर्ष

आयुष्यमान कार्ड योजना 2025 ही केवळ योजना नसून सामान्य माणसासाठी जीवनदायी ठरते आहे.
महाराष्ट्रातील प्रत्येक पात्र कुटुंबाने व जेष्ठ नागरिकांनी या योजनेतून लाभ घ्यावा.
आजच जवळच्या आपले सरकार सेवा केंद्र किंवा अंगीकृत रुग्णालयातील आरोग्य मित्राकडे जाऊन आपले आयुष्यमान कार्ड तयार करा आणि आपल्या कुटुंबाच्या आरोग्याची खात्री मिळवा.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न

आयुष्यमान कार्ड योजना २०२५ काय आहे?

ही योजना केंद्र सरकारची आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आणि राज्य सरकारची महात्मा फुले जनआरोग्य योजना एकत्र करून सुरू करण्यात आली आहे. याद्वारे प्रत्येक कुटुंबाला दरवर्षी ₹५ लाखांपर्यंत मोफत उपचार मिळतात.

या योजनेत कोणते उपचार मोफत मिळतात?

या योजनेत एकूण १,३५६ प्रकारचे उपचार समाविष्ट आहेत. त्यात हृदयविकार, कर्करोग, मूत्रपिंड डायलिसिस, अपघाती उपचार, डोळ्यांची शस्त्रक्रिया, प्रसुती आणि स्त्रीरोग उपचार आदी आहेत.

आयुष्यमान कार्ड कोणाला मिळू शकते?

महाराष्ट्रातील सर्व पात्र कुटुंबांना हे कार्ड मिळू शकते. आधार कार्ड व मोबाईल क्रमांक लिंक असणे आवश्यक आहे.

आयुष्यमान वयोवंदना योजना म्हणजे काय?

ही योजना राज्यातील जेष्ठ नागरिकांसाठी आहे. १७ वर्षांवरील सर्व नागरिकांना मोफत आरोग्य सेवा आणि ७० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना अतिरिक्त ₹५ लाख रुपयांचा लाभ मिळतो.

आयुष्यमान कार्ड कसे मिळेल?

जवळच्या शासकीय कार्यालयीन मदत कक्ष, आशा सेविका, स्वस्त धान्य दुकान, आपले सरकार सेवा केंद्र किंवा अंगीकृत रुग्णालयातील आरोग्य मित्राकडे जाऊन कार्ड तयार करून घेता येते.

या योजनेचा लाभ घेण्यासाठी पैसे द्यावे लागतात का?

नाही. ही योजना पूर्णपणे मोफत आहे. उपचारासाठी रुग्णालयात पैसे भरावे लागत नाहीत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *