लाडकी बहिण ekyc 2025 संदर्भात आपण या लेखामध्ये संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. ज्या पात्र महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना अंतर्गत महिन्याला १५०० रुपये मिळतात अशा महिलांना आता त्यांच्या आधारची ई केवायसी करणे बंधनकारक करण्यात आले आहे.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना अंतर्गत अनेक अपात्र महिलांनी लाभ घेतल्याचे शासनाच्या निदर्शनास आले आहे. याच बाबीचे महत्व लक्षात घेवून आता शासनाने पात्र महिलांना ekyc बंधनकारक केली आहे.
हि इकेवायसी कशी केली जाते या संदर्भातील सविस्तर माहिती आपण आजच्या लेखामध्ये जाणून घेणार आहोत.
पुढील माहिती पण वाचा लाडकी बहिण योजना
लाडकी बहिण योजना eKYC 2025 का आवश्यक आहे?
शासनाच्या या योजनेत मोठ्या प्रमाणावर महिला लाभार्थी सहभागी आहेत. त्यांची खरी ओळख पटवून अनुदान योग्य व्यक्तींपर्यंत पोहोचावे हा मुख्य उद्देश आहे. eKYC प्रक्रियेमुळे –
- बनावट अर्जदारांना आळा बसेल.
- पात्र महिलांना खात्रीशीर लाभ मिळेल.
- आर्थिक व्यवहार पारदर्शक राहतील.
म्हणूनच लाडकी बहिण योजना पडताळणी 2025 मध्ये आधार इकेवायसी ही आवश्यक पायरी करण्यात आली आहे. या संदर्भात शासनाचा नवीन जी आर आलेला आहे.
पुढील योजनेचा पण लाभ घ्या भांडे योजना ऑनलाईन अर्ज
लाडकी बहिण योजना eKYC 2025 कशी करायची?
ज्या महिला लाडकी बहिण योजनेसाठी पात्र आहेत अशा महिलांना दरवर्षी जून महिन्यामध्ये आधार इकेवायसी करणे बंधनकारक करण्यात आले आहे.
चालू आर्थिक वर्षामध्ये ज्या दिवशी जी आर निर्गमित करण्यात आला त्या दिवसापासून म्हणजेच दिनांक १८ सप्टेंबर २०२५ पासून २ महिन्याच्या आत हि ekyc करणे बंधनकारक आहे.
eKYC करण्यासाठी खालील पद्धतीचा अवलंब करा.
- मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
- मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेचे ekyc करण्यासाठी येथे क्लिक करा अशी लिंक सुरुवातीलाच दिसेल त्यावर क्लिक करा.
- लाभार्थीचा आधार नंबर दिलेल्या चौकटीत टाका. कॅपचा कोड टाका
- आधार लिंक मोबाईलवर आलेला दिलेल्या चौकटीत टाका.
आधार इकेवायसी करण्याची संपूर्ण प्रोसेस कशी असणार आहे या संदर्भातील फ्लो चार्ट खालील व्हिडीओमध्ये दिलेला आहे तो नक्की बघा.
व्हिडीओमध्ये संगीतल्या नुसार तुमची इकेवायसी करून घ्या.
लाडकी बहिण योजना eKYC 2025 – महत्त्वाचे मुद्दे
- हा निर्णय शासनाच्या अधिकृत GR मध्ये नमूद करण्यात आला आहे.
- ऑनलाइन eKYC प्रक्रिया सोपी आणि जलद आहे.
- गावपातळीवर किंवा महा-ई-सेवा केंद्रामार्फतही मदत मिळू शकते.
- eKYC शिवाय कोणत्याही लाभार्थीला अनुदानाचा लाभ मिळणार नाही.
निष्कर्ष
लाडकी बहिण योजना eKYC 2025 ही प्रक्रिया सर्व पात्र महिलांसाठी अत्यावश्यक आहे. शासनाकडून दरमहा मिळणाऱ्या १५०० रुपयांच्या अनुदानाचा लाभ सतत सुरू ठेवण्यासाठी आजच आपली इकेवायसी प्रक्रिया पूर्ण करा.
तुमच्या जवळच्या महा-ई-सेवा केंद्रात किंवा शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन ही प्रक्रिया काही मिनिटांत करता येईल.
प्रक्रियेचा मुख्य उद्देश म्हणजे बनावट व गैरपात्र लाभार्थी टाळणे. आधार पडताळणीमुळे शासनाला खात्री होते की लाभार्थी खरी व्यक्ती आहे आणि तिचे बँक खाते योग्य आहे. त्यामुळे शासनाचे पैसे थेट योग्य लाभार्थ्यांच्या खात्यात पोहोचतात आणि पारदर्शकता वाढते.
प्रथम शासनाच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या.
मुखपृष्ठावर दिसणाऱ्या “eKYC” या बॅनरवर क्लिक करा.
आपला आधार क्रमांक टाका आणि मोबाईलवर आलेल्या OTP द्वारे पडताळणी करा.
मोबाईल क्रमांक आधारशी लिंक असणे आवश्यक आहे.
पडताळणी यशस्वी झाल्यावर स्क्रीनवर इकेवायसी यशस्वी असा संदेश दिसेल आणि मोबाईलवर SMS येईल.
आधार कार्ड (UIDAI द्वारे जारी)
मोबाईल क्रमांक (आधारशी लिंक केलेला)
शासनाच्या ताज्या GR नुसार, जर लाभार्थी महिलांनी वेळेत लाडकी बहिण योजना eKYC 2025 केली नाही, तर त्यांना पुढील महिन्यापासून मिळणारे ₹1500 अनुदान थांबणार आहे. त्यामुळे प्रत्येक पात्र महिलेसाठी eKYC प्रक्रिया पूर्ण करणे अत्यावश्यक आहे.