सौरचलित नॅपसॅक फवारणी पंप 2025 यासाठी शासनाकडून अनुदान दिले जाते. अनेक शेतकरी बांधवानी यासाठी महाडीबीटी या वेबपोर्टलवर ऑनलाईन अर्ज सादर केलेला आहे. आता अनेकांना त्यांची या घटकासाठी निवड झाल्याचे संदेश येणे सुरु झालेले आहेत.
सौरचलित नॅपसॅक फवारणी पंप शेतीसाठी खूपच उपयोगी असून शेतातील पिकांवर औषध फवारणी करण्यासही याचा मोठ्या प्रमाणत उपयोग होऊ शकतो.
शिवाय या पंपावर सौर प्लेट बसवली असल्याने यासाठी कोणतीही चार्जिंग करण्याची गरज भासत नाही.
त्यामुळे अनेक शेतकरी सौरचलित नॅपसॅक फवारणी पंप योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करतांना दिसत आहे.
सौरचलित नॅपसॅक फवारणी पंप 100 टक्के अनुदानावर असा करा अर्ज solar knapsack spry pump
सौरचलित नॅपसॅक फवारणी पंप 2025 योजनेत निवड झाली असल्याचे येत आहेत संदेश
अनेक शेतकरी बांधवानी सौरचलित नॅपसॅक फवारणी पंप योजनेसाठी महाडीबीटी या शेतकरी पोर्टलवर ऑनलाईन अर्ज सादर केलेले आहेत.
आता अनेक शेतकऱ्यांची या योजनेसाठी निवड झाली असल्याने त्यांना संदेश येणे सुरु झालेले आहे.
संदेश खालीलप्रमाणे येत आहे.
आपली सौरचलित नॅपसॅक फवारणी पंप या घटकासाठी ऑनलाइन संगणक प्रणाली द्वारे निवड झाली आहे. योजनेच्या मार्गदर्शक सूचनानुसार सदर घटकासाठी आवश्यक कागदपत्रे महाडीबीटी पोर्टलवर लॉगिन करून आजपासून दहा दिवसांच्या आत अपलोड करावीत अन्यथा आपला अर्ज रद्द होईल.
तुम्ही देखील या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज सादर केला असेल तर १० दिवसाच्या आत ऑनलाईन कागदपत्रे सादर करणे गरजचे आहे.
किती मिळते अनुदान
सौरचलित नॅपसॅक फवारणी पंप योजनेसाठी महाराष्ट्र शासन कृषी विभागाकडून ५० टक्के अनुदान मिळते. काही वर्षापूर्वी हे पंप १०० टक्के अनुदानावर दिले जात होते.
आता मात्र या योजनेचा लाभ घेण्याचा असेल तर लाभार्थी हिस्सा म्हणून ५० अनुदान मिळणार आहे.
अनुदान मिळण्याची प्रोसेस खालीलप्रमाणे आहे.
- लाभार्थीला बाजारातून पंप खरेदी करावा लागेल.
- सौरचलित नॅपसॅक फवारणी पंप खरेदीचे पक्के बिल महाडीबीटी पोर्टलवर अपलोड करावे लागेल.
- कागदपत्रे आणि दरपत्रक तपासल्यानंतर १५ ते ३० दिवसाच्या आत लाभार्थीच्या आधार लिंक बँकेत अनुदानाचे पैसे जमा केले जाते.
कोणते कागदपत्रे करावी लागतील अपलोड
सौरचलित नॅपसॅक फवारणी पंप 2025 योजनेचा लाभ घेण्यासाठी निवड तर झाली आहे परंतु कोणकोणती कागदपत्रे अपलोड करावी लागणार आहेत याची माहिती अनेक शेतकरी बांधवाना नसण्याची शक्यता असते.
त्यामुळे योजनेचा लाभ घेण्यास उशीर होऊ शकतो. कागदपत्रे अपलोड करण्याचा संदेश आल्यापासून १० दिवसांच्या आत हि कागदपत्रे अपलोड करणे आवश्यक असते.
सौरचलित नॅपसॅक फवारणी पंप योजनेचा लाभ घेण्यासाठी अपलोड करावी लागणारी कागदपत्रे खालीलप्रमाणे आहेत.
- बँकेचे पासबुक.
- दरपत्रक
- वनपट्टाधारक लाभार्थीकरता प्रमाणपत्र (जर लागू असेल तर)
हि कागदपत्रे संदेश आल्यापासून १० दिवसाच्या आत महाडीबीटी शेतकरी पोर्टलवर अपलोड करणे आवश्यक आहे. नसता या योजनेचा लाभ घेण्यास अडचण येवू शकते.
कागदपत्रे अपलोड करण्याची प्रोसेस
- महाडीबीटी पोर्टलवर जा. शेतकरी आयडी टाकून लॉगीन करा.
- चलन अपलोड/डीपीआर/काम पूर्ण झाल्याचे प्रमाणपत्र या पर्यायावर क्लिक करा.
- त्यानंतर वैयक्तिक कागदपत्रे यावर क्लिक करा.
- कागदपत्रे अपलोड करा या पर्यायावर क्लिक करा.
- निवड करा या ऑप्शनवर क्लिक करा.
- पासबुक.
- दरपत्रक.
- वनपट्टाधारक लाभार्थीकरता प्रमाणपत्र (जर लागू असेल तर).
इत्यादी कागदपत्रे अपलोड करावी लागतात.
सौरचलित नॅपसॅक फवारणी पंप योजनेसाठी ऑनलाईन अर्ज सादर कसा करावा.
हे तर झाले सौरचलित नॅपसॅक फवारणी पंप योजनेचा लाभ घेण्यासाठी कागदपत्रे कशी अपलोड करावीत या संदर्भातील माहिती.
तुम्हाला जर या योजनेचा लाभ घेण्यासाठी नवीन ऑनलाईन अर्ज सादर करायचा असेल तर त्या संदर्भातील प्रोसेस कशी आहे या संदर्भातील सविस्तर माहितीसाठी आम्ही स्वतंत्र व्हिडीओ आणि इतर महत्वाची माहिती दिलेली आहे.
यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
वारंवार विचारले जाणारे प्रश्न.
ऑनलाईन अर्ज प्रक्रिया संदर्भात या लेखामध्ये माहिती देण्यात आली आहे. महाडीबीटी या वेबसाईटवर जावून कोणत्या प्रोसेस फॉलो कराव्या लागतात हे या ठिकाणी तुम्हाला कळेल.
सौरचलित नॅपसॅक फवारणी पंप योजनेसाठी निवड झालेल्या लाभार्थीला खालील कागदपत्रे ऑनलाईन पद्धतीने अपलोड करावी लागतात.
बँकेच्या पासबुकची छायांकित प्रत.
दरपत्रक.
वनपट्टाधारक लाभार्थीकरता प्रमाणपत्र.
फवारणी पंप योजनेचा लाभ घेण्यासाठी सुरुवातीला १०० टक्के अनुदान मिळत होते आता मात्र ५० हिस्सा लाभार्थीला भरावा लागतो.
लाभार्थी हा शेतकरी असला पाहिजे म्हणजेच त्यांच्या नावे जमीन असली पाहिजे. असे शेतकरी या योजनेसाठी पात्र असतात.