शेतकरी कर्जमाफीसाठी लागणारी कागदपत्रे –  बँकेत जमा करा

शेतकरी कर्जमाफीसाठी लागणारी कागदपत्रे – बँकेत जमा करा

जाणून घेवूयात शेतकरी कर्जमाफीसाठी लागणारी कागदपत्रे कोणकोणती आहेत.

राज्य शासनाच्या कर्जमाफी योजनेच्या अंमलबजावणीत वेग आणण्यासाठी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका, कार्यकारी सेवा सोसायट्या आणि संबंधित विभागांनी तयारी अधिक कडक केली आहे. यासाठी शेतकऱ्यांची अद्ययावत माहिती वेळेत उपलब्ध होणे अत्यावश्यक आहे.

त्यामुळे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील प्रत्येक कर्जदार शेतकऱ्याने शेतकरी कर्जमाफीसाठी लागणारी कागदपत्रे तयार करून बँकेत जमा करावीत.

या मार्गदर्शक सूचनेनुसार आवश्यक कागदपत्रे सोसायटीमध्ये तातडीने जमा करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

आमच्या फेसबुक पेजला लाईक करा.

कधी मिळणार शेतकरी कर्जमाफी

शासनाने घोषित केलेल्या कर्जमाफी योजनेचा लाभ वेळेत शेतकऱ्यांपर्यंत पोहोचावा म्हणून जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून सर्व कर्जदारांची अचूक माहिती गोळा करणे सुरू आहे.

सहकार आयुक्त व निबंधक, पुणे यांच्या आदेशानुसार जिल्ह्यातील सर्व सेवा सोसायट्यांनी कर्जदार सभासदांची माहिती संकलन मोहीम जलद गतीने राबवावी असे निर्देश देण्यात आले आहेत.

या पार्श्वभूमीवर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांनी स्पष्ट केले आहे की, जर कागदपत्रे वेळेत जमा झाली नाहीत तर शेतकऱ्यांचा अर्ज शासनाकडे जाण्यात विलंब होऊ शकतो. म्हणूनच प्रत्येक शेतकऱ्याने निर्धारित कागदपत्रे योग्य स्वरूपात सादर करणे बंधनकारक आहे.

खालील योजनेचा पण लाभ घ्या बांधकाम कामगार कागदपत्रे

सेवा सोसायट्यांशी संपर्क का आवश्यक?

प्रत्येक गावातील सेवा सोसायटीचे गट सचिव हेच कर्जमाफी संबंधित कागदपत्रे आणि माहिती गोळा करण्यासाठी अधिकृत आहेत.

कागदपत्रे सोसायटीद्वारे बँकेकडे आणि नंतर शासनाच्या पोर्टलवर अपलोड केली जातात. त्यामुळे प्रक्रियेमध्ये कोणत्याही प्रकारचा विलंब किंवा चुका टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी थेट आपल्या सेवा सोसायटीशी संपर्क साधणे अधिक योग्य ठरते.

शेतकरी कर्जमाफीसाठी लागणारी कागदपत्रे

सविस्तर माहितीसाठी खालील व्हिडीओ पहा.

कर्जमाफीचा लाभ मिळवण्यासाठी शेतकऱ्यांनी खालील कागदपत्रांच्या झेरॉक्स प्रती अनिवार्यपणे सादर कराव्या:

1. जमीनविषयक कागदपत्रे

सातबारा उतारा (7/12)

जमीन धारकाचे योग्य नाव व माहिती असावी.

अद्ययावत असावा.

८-अ उतारा (8A)

  • शेती क्षेत्र व मालकी तपासण्यासाठी आवश्यक
  • ताज्या अपडेटसह सादर करावा

ओळख दस्तऐवज

ओळख दस्ताएवजमध्ये खालील कागदपत्रे सादर करावीत.

आधार कार्ड

  • मोबाईल क्रमांक लिंक असलेले.
  • स्पष्ट व वाचण्यायोग्य प्रत.

फार्मर आयडी (Farmer ID)

कर्जमाफी प्रक्रियेसाठी अत्यंत महत्त्वाचा दस्तऐवज

पॅन कार्ड

आर्थिक व्यवहार व व्यक्ती ओळख पटवण्यासाठी आवश्यक

बँक संबंधित कागदपत्रे

जाऊन घेवूयात बँक संबधित कागदपत्रांवीषयी सविस्तर माहिती.

राष्ट्रीयकृत किंवा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे पासबुक

खाते क्र. स्पष्ट दिसेल अशा स्वरूपात झेरॉक्स

स्वतःचे स्वतंत्र पासबुक असावे

खात्याशी लिंक असलेला मोबाईल नंबर

OTP पडताळणी व सरकारी संदेश मिळण्यासाठी आवश्यक

कागदपत्रे वेळेत जमा करणे का आवश्यक?

1. शासनाला माहिती वेळेत पाठवावी लागते

प्रत्येक जिल्ह्याने नियोजित तारखांमध्ये माहिती शासनाकडे अपलोड करणे आवश्यक असते. उशिर झाल्यास शेतकऱ्यांचे अर्ज पुढील टप्प्यात जाऊ शकत नाहीत.

2. चुकीची माहिती दिल्यास अर्ज नाकारला जाऊ शकतो

कागदपत्रातील नाव, जमीन तपशील किंवा खाते क्रमांक चुकीचे असल्यास कर्जमाफी मिळण्यात अडथळे येऊ शकतात.

3. सोसायटीला पडताळणीसाठी वेळ हवा

अधिकाधिक कर्जदारांची माहिती तपासणे हा वेळखाऊ process आहे; वेळेत कागदपत्रे मिळाली तर काम सुरळीत पार पडते.

कर्जमाफी योजनेचे अपेक्षित फायदे

  • थकीत किंवा चालू कर्जाची रक्कम शासनाकडून भरून दिली जाऊ शकते
  • शेतकऱ्यांचा आर्थिक बोजा कमी
  • नव्या कर्जासाठी पात्रता सुधारते
  • क्रेडिट हिस्टरी मजबूत होते
  • शेती नियोजन आणि गुंतवणूक सुलभ होते

निष्कर्ष

शासनाची कर्जमाफी योजना शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा आहे. या योजनेचा लाभ कोणताही अडथळा न येता मिळावा यासाठी शेतकरी कर्जमाफीसाठी लागणारी कागदपत्रे पूर्ण करून ती आपल्या सेवा सोसायटीमध्ये तात्काळ जमा करावीत, असे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक व प्रशासनाने आवाहन केले आहे.

कर्जमाफीसाठी कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत?

शेतकरी कर्जमाफीसाठी लागणारी कागदपत्रे अद्ययावत 7/12 उतारा, 8A उतारा, आधार कार्ड, फार्मर आयडी, पॅन कार्ड आणि बँक पासबुक अनिवार्य आहेत.

कर्जमाफीसाठी कागदपत्रे कुठे जमा करायची आहेत?

सर्व शेतकऱ्यांनी संबंधित कागदपत्रे आपल्या गावातील सेवा सहकारी सोसायटी किंवा गट सचिवांकडे जमा करणे बंधनकारक आहे.

कर्जमाफीसाठी सातबारा उतारा अपडेट असणे आवश्यक आहे का?

हो, कर्जमाफीसाठी ही कागदपत्रे तयार करा यामध्ये सातबारा आणि 8A उतारा अद्ययावत असणे अत्यावश्यक आहे, अन्यथा अर्ज प्रक्रियेत अडचण येऊ शकते.

आधार कार्ड मोबाईल नंबरशी लिंक असणे गरजेचे आहे का?

हो, कर्जमाफी प्रक्रियेत OTP पडताळणीसाठी आधार कार्ड मोबाईल नंबरशी लिंक असणे आवश्यक आहे.

कर्जमाफीसाठी बँक पासबुक कसे असावे?

पासबुक राष्ट्रीयकृत बँक किंवा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे असावे आणि ते कर्जमाफी प्रक्रियेसाठी स्वतंत्र असणे गरजेचे आहे.

कर्जमाफीसाठी फार्मर आयडी नसल्यास काय करावे?

फार्मर आयडी नसल्यास तुम्ही आपल्या गावातील कृषी कार्यालयात किंवा अधिकृत पोर्टलवर अर्ज करून तो तयार करून घेणे आवश्यक आहे.

कर्जमाफीचा लाभ कोणत्या शेतकऱ्यांना मिळतो?

कर्जमाफी योजनेचा लाभ चालू व थकीत कर्ज असलेल्या पात्र शेतकऱ्यांना शासनाच्या नियमांनुसार दिला जातो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *