ऑनलाईन पहा शेतीचा नकाशा: मोबाईलवर ५ मिनिटांत कळेल शेताचा बांध आणि रस्ता कुठे आहे

ऑनलाईन पहा शेतीचा नकाशा: मोबाईलवर ५ मिनिटांत कळेल शेताचा बांध आणि रस्ता कुठे आहे

तुम्हाला शेत जमिनीची काही समस्या असेल तर असा ऑनलाईन पहा शेतीचा नकाशा.

ग्रामीण भागात शेतीच्या बांधावरून होणारे वाद ही काही नवीन गोष्ट नाही. अनेकदा “हा रस्ता माझा आहे”, “तुझा बांध माझ्या शेतात आला आहे” किंवा “नाल्यापलीकडे तुझी जमीन नाही” अशा कारणांमुळे शेजारी शेजाऱ्यांचे वैरी होतात.

काही प्रकरणांमध्ये तर हे वाद कोर्टापर्यंत पोहोचतात आणि वर्षानुवर्षे पैसे व वेळ खर्च होतो.

परंतु आता तंत्रज्ञानामुळे ही समस्या मोठ्या प्रमाणात कमी होऊ शकते. कारण महाराष्ट्र शासनाने उपलब्ध करून दिलेल्या अधिकृत भू नकाशा प्रणालीमुळे तुम्ही घरबसल्या मोबाईलवर तुमच्या जमिनीचा नकाशा पाहू शकता.

त्यामुळे शेताचा बांध, सीमारेषा, शेत रस्ता आणि आसपासचे गट नंबर यांची अचूक माहिती काही मिनिटांत मिळते. जर तुम्हालाही “ऑनलाईन पहा शेतीचा नकाशा” ही प्रक्रिया समजून घ्यायची असेल, तर हा लेख शेवटपर्यंत नक्की वाचा.

खालील माहिती पण वाचा

पोकरा योजना विहीर पुनर्भरण ऑनलाईन अर्ज प्रोसेस 2026

शेताच्या बांधावरून वाद का होतात

पूर्वी बहुतांश शेतकऱ्यांकडे जमिनीचा अधिकृत नकाशा उपलब्ध नव्हता. त्यामुळे नैसर्गिक गोष्टींनाच सीमारेषा समजले जात असे.

उदाहरणार्थ:

नाला म्हणजेच शेताची सीमा

झाडांची ओळ म्हणजे बांध

पायवाट म्हणजे कायमस्वरूपी शेत रस्ता

दगड किंवा कुंपण म्हणजे हद्द

परंतु प्रत्यक्ष सरकारी नोंदींमध्ये परिस्थिती वेगळी असू शकते. त्यामुळे अनेकदा गैरसमज निर्माण होतात.

खालील योजनेचा पण लाभ घ्या.

पंचायत समिती परिसरात दिव्यांग व्यक्तींना व्यवसायासाठी जागामिळणार जागा

नाला म्हणजेच सीमा असते का?

अनेक शेतकरी असा समज करून घेतात की शेतातून जाणारा नाला म्हणजे दोन जमिनींमधील सीमा आहे. पण हे प्रत्येक वेळी खरे नसते.

समजा एखाद्या गट नंबरमधून पूर्ण नाला वाहत असेल. प्रत्यक्ष पाहताना असे वाटू शकते की नाल्याच्या पलीकडे दुसऱ्याची जमीन आहे. पण जेव्हा ऑनलाईन भू नकाशा पाहिला जातो, तेव्हा लक्षात येते की संपूर्ण नाला एकाच गट नंबरमध्ये आहे.

यामुळे अनेक मोठे वाद तात्काळ मिटू शकतात.

खालील योजनेसाठी पण अर्ज करा

ऑनलाईन शेतीचा नकाशा पाहण्याचे फायदे

आजच्या काळात मोबाईलवर जमीन नकाशा पाहण्याचे अनेक फायदे आहेत.

१) शेताचा बांध समजतो

तुमच्या जमिनीची नेमकी सीमा कोठपर्यंत आहे हे स्पष्ट होते.

२) शेत रस्ता कुठे आहे हे दिसते

शेतीसाठी अधिकृत रस्ता आहे का हे पाहता येते.

३) शेजारील गट नंबर समजतात

आजूबाजूच्या जमिनींची माहिती मिळते.

४) वाद कमी होतात

नकाशा समोर असल्याने चुकीच्या समजुती दूर होतात.

५) वेळ आणि पैसा वाचतो

भूमी अभिलेख कार्यालयात वारंवार जाण्याची गरज राहत नाही.

ऑनलाईन पहा शेतीचा नकाशा – अधिकृत वेबसाईट कोणती?

महाराष्ट्र शासनाची अधिकृत भू नकाशा वेबसाईट खालीलप्रमाणे आहे:

https://mahabhunakasha.mahabhumi.gov.in/27/index.html ही वेबसाईट शासनाची अधिकृत वेबसाईट आहे कारण तिच्या शेवटी .gov.in हे एक्सटेंशन आहे.

मोबाईलवर शेतीचा नकाशा कसा पाहावा?

आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे मोबाईलवर जमीन नकाशा कसा पाहायचा?

खालील प्रक्रिया फॉलो करा.

गुगलवर Bhu Nakasha Search करा

सर्वप्रथम मोबाईलमध्ये Google उघडा आणि ब्राउजरच्या सर्च बारमध्ये “Bhu Nakasha Maharashtra” किंवा “भू नकाशा” असे सर्च करा.

एक लिंक दिसेल त्यावर क्लिक करा.

यानंतर अधिकृत सरकारी वेबसाईट ओपन करा.

 Category निवडा

वेबसाईट उघडल्यानंतर दोन पर्याय दिसतील:

  • Rural (ग्रामीण)
  • Urban (शहरी)

ग्रामीण भागातील शेतीसाठी “Rural” हा पर्याय निवडा

जिल्हा, तालुका आणि गाव निवडा

आता क्रमाने:

  • District (जिल्हा)
  • Taluka (तालुका)
  • Village (गाव)

ही माहिती निवडा यामध्ये तुमचा जिल्हा तालुका आणि गाव व्यवस्थितपणे निवडा.

गट नंबर टाका

यानंतर तुमच्या शेताचा गट नंबर दिलेल्या चौकटीत (Gat Number) टाका.

उदाहरण:

  • गट नंबर ५६
  • गट नंबर १०२

आणि Search वर क्लिक करा.

Map Report वर क्लिक करा

आता तुम्ही जो शेतीचा गट नंबर टाकला होता त्यामधील सर्व शेतकऱ्यांची माहिती दिसेल. पेजला थोडे खाली स्क्रोल करा.

आता “Map Report” या पर्यायावर क्लिक करा. या पर्यायावर क्लिक करताच अजून दुसरे पेज ओपन होईल यामध्ये तुमच्या जमिनीचा संपूर्ण नकाशा असेल.

नकाशामध्ये कोणती माहिती दिसते?

ऑनलाईन भू नकाशामध्ये खालील माहिती दिसते:

  • गट नंबर
  • सीमारेषा
  • शेजारील जमीन
  • रस्ते
  • नाले
  • दिशा (North Direction)
  • जमीन आकार

यामुळे शेताची अचूक स्थिती समजते.

ऑनलाईन नकाशा आणि सरकारी मोजणी यात फरक काय?

ही गोष्ट समजून घेणे खूप महत्त्वाचे आहे.

ऑनलाईन नकाशा

शेत जमिनीची वाद टाळण्यासाठी ऑनलाईन नकाशा माहिती समजण्यासाठी उपयोगी असते. यामुळे तत्काळ शेत जमिनीच्या सीमा आणि दिशा कळते.

सरकारी मोजणी

ऑनलाईन नकाशावर दोन्ही शेतकऱ्यांचे समाधान झाले नाही तर भू अभिलेख कार्यालय येथे जमीन मोजणीचा अर्ज करावा लागतो. त्यानंतर अधिकारी येवून जमिनीचा सर्व्हे करतात. प्रत्यक्षात मोजणी करतात.

मोजणी केल्यानंतर स्पष्ठ होते कि कोणी कोणाच्या जमिनीवर अतिक्रमण केले आहे. याद्वारे ज्या शेतकऱ्याने अतिक्रमण केले आहे त्यांच्यावर कार्यवाही होऊ शकते. म्हणून गंभीर वाद असल्यास अधिकृत मोजणी करणे आवश्यक असते.

शेत रस्ता समजण्यासाठी भू नकाशा का महत्त्वाचा?

अनेक शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी रस्ता नसतो. काही वेळा शेजारच्या जमिनीतून जावे लागते. यामुळे भांडणे होतात.

भू नकाशामध्ये:

अधिकृत रस्ता.

पायवाट.

प्रवेश मार्ग.

यांची माहिती दिसू शकते.

म्हणून शेत रस्ता समजण्यासाठी हा नकाशा अत्यंत उपयुक्त ठरतो.

डिजिटल तंत्रज्ञानामुळे शेतकऱ्यांना मोठा फायदा

पूर्वी जमीन नकाशा मिळवण्यासाठी:

  • सरकारी कार्यालयात फेऱ्या माराव्या लागत.
  • वेळ खर्च होत असे.
  • पैसे खर्च होत.

पण आता मोबाईलवर काही मिनिटांत ही माहिती मिळते.

यामुळे:

  • पारदर्शकता वाढली.
  • वाद कमी होण्यास मदत झाली.
  • शेतकऱ्यांचा वेळ वाचला.

लेखाचा सारांश

आजच्या डिजिटल युगात प्रत्येक शेतकऱ्याने आपल्या जमिनीचा ऑनलाईन नकाशा एकदा तरी पाहायला हवा. कारण अनेकदा आपण ज्या गोष्टींना सीमा समजतो, त्या प्रत्यक्षात सरकारी नोंदींमध्ये वेगळ्याच असतात.

“ऑनलाईन पहा शेतीचा नकाशा” ही सुविधा केवळ माहितीपुरती नाही, तर भविष्यातील वाद टाळण्यासाठी एक महत्त्वाचे साधन आहे.

जर तुमच्या शेताच्या सीमांबाबत शंका असेल, शेत रस्त्यावर वाद असेल किंवा गट नंबरची अचूक माहिती हवी असेल, तर आजच मोबाईलवर भू नकाशा पाहून खात्री करा.

कारण योग्य माहितीच भविष्यातील मोठे वाद थांबवू शकते.

मोबाईलवर ऑनलाईन शेतीचा नकाशा कसा पाहावा?

मोबाईलमध्ये Google वर “Bhu Nakasha Maharashtra” सर्च करा. त्यानंतर अधिकृत सरकारी वेबसाईट उघडा. जिल्हा, तालुका, गाव आणि गट नंबर निवडल्यानंतर “Map Report” वर क्लिक केल्यास तुमच्या शेताचा नकाशा दिसतो.

ऑनलाईन नकाशावर शेताचा बांध दिसतो का?

होय. ऑनलाईन भू नकाशामध्ये जमिनीची सीमारेषा, गट नंबर आणि शेजारील जमीन स्पष्ट दिसते. त्यामुळे शेताचा बांध कोठे आहे हे समजण्यास मदत होते.

ऑनलाईन शेतीचा नकाशा पाहण्याचा सर्वात मोठा फायदा कोणता?

सर्वात मोठा फायदा म्हणजे सीमारेषा आणि शेत रस्त्याबाबत स्पष्टता मिळते. त्यामुळे शेजाऱ्यांमधील वाद कमी होण्यास मदत होते तसेच वेळ आणि पैशांची बचत होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *