जलतारा योजना प्रास्तव संदर्भात माहिती जाणून घेवूयात.
पावसाचे पाणी शेतातून वाहून जाण्याऐवजी ते जमिनीत मुरावे, भूजल पुनर्भरणाला मदत व्हावी आणि शेतकऱ्यांना संरक्षित सिंचनासाठी फायदा व्हावा या उद्देशाने जलतारा हे जलसंधारणाचे काम राबविले जाते.
रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून राज्यात जलतारा कामे घेण्यात आली असून आता विकसित भारत–रोजगार आणि आजीविका हमी मिशन ग्रामीण (VB-G RAM G) अंतर्गतही जलसुरक्षेशी संबंधित कामांना महत्त्व देण्यात आले आहे.
जलतारा कामासाठी 5 हजार रुपये अनुदान मिळते अशी माहिती शेतकऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात चर्चेत आहे. जलतारा कामासाठी प्रस्ताव कसा करायचा, प्रस्ताव कुठे सादर करायचा, कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत आणि जलतारा योजना प्रस्ताव PDF कुठून डाउनलोड करायचा याची माहिती या लेखातून जाणून घेऊया.
खालील योजनेचा पण लाभ घ्या
मोफत मोटार प्रशिक्षण – mofat driving training digital dg
जलतारा योजना म्हणजे काय?
शेतामध्ये पडणाऱ्या पावसाच्या पाण्याचा जास्तीत जास्त उपयोग करून ते जमिनीत मुरविण्यासाठी जलतारा म्हणजेच खड्डा तयार केला जातो. शेतातील पाण्याचा नैसर्गिक प्रवाह आणि उतार लक्षात घेऊन योग्य जागेची निवड करून जलतारा तयार केला जातो. यामुळे पावसाचे वाहून जाणारे पाणी जमिनीत मुरण्यास मदत होते.
भूजल पुनर्भरण, शेतातील ओलावा टिकविणे आणि परिसरातील पाण्याच्या उपलब्धतेमध्ये सुधारणा करण्याच्या दृष्टीने अशा जलसंधारण कामांचे महत्त्व आहे.
खालील माहिती पण महत्वाची आहे.
पिक कर्ज फाईल 2026: SBI पीक कर्जासाठी कोणती कागदपत्रे लागतात? संपूर्ण माहिती
जलतारा योजनेअंतर्गत 5 हजार रुपये अनुदान
जलतारा कामासाठी प्रति खड्डा 5,000 रुपये अनुदान असा उल्लेख पूर्वीच्या काही अधिकृत जिल्हा परिषद स्तरावरील माहितीत करण्यात आलेला आढळतो. मात्र येथे शेतकऱ्यांनी एक महत्त्वाची बाब लक्षात घेतली पाहिजे.
5,000 रुपये ही रक्कम प्रत्येक लाभार्थ्याच्या बँक खात्यात सरळ जमा होणारे निश्चित रोख अनुदान आहे, असा अर्थ काढू नये. जलतारा हे रोजगार हमीशी संबंधित काम असल्यामुळे प्रत्यक्ष मंजूर रक्कम, तांत्रिक अंदाजपत्रक आणि लागू मजुरी दर यांचा विचार केला जाऊ शकतो.
त्यामुळे हि रक्कम कमी जास्त होऊ शकते.
जलतारा योजना प्रस्ताव pdf डाउनलोड करा
जलतारा हे वैयक्तिक लाभाचे काम म्हणून प्रस्तावित करता येते. प्रस्तावामध्ये लाभार्थ्याची वैयक्तिक माहिती तसेच संबंधित शेतजमिनीची माहिती भरावी लागते.
खालील बटनावर क्लिक करून pdf मधील हा जलतारा योजनेचा प्रस्ताव मोफत डाउनलोड करून घ्या.
त्यामुळे ज्या शेतकऱ्याला आपल्या शेतात जलतारा अर्थात खड्डा खोदकाम करायचे आहे त्यांनी सगळ्यात आधी ग्रामपंचायतीशी संपर्क साधावा. संबंधित जमीन, रोजगार हमी अंतर्गत आवश्यक नोंदणी आणि इतर पात्रतेची पडताळणी स्थानिक स्तरावर करून घ्यावी.
जलतारा योजना प्रस्ताव करण्यासाठी सर्वप्रथम आपल्या गावातील ग्रामपंचायत कार्यालयात संपर्क साधणे योग्य राहील. ग्रामपंचायत स्तरावर आवश्यक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर प्रस्ताव पुढील मंजुरीसाठी संबंधित पंचायत समितीकडे पाठविला जातो.
एकूण 12 पानांचा असून त्यामध्ये अर्जापासून कागदपत्रांची तपासणी सूची, प्रतिज्ञापत्र, प्रमाणपत्र, स्थळदर्शक नकाशा,संबंधित नोंद आणि काम पूर्णत्व प्रमाणपत्रापर्यंत विविध नमुने आहेत.
अर्ज करण्यापूर्वी या गोष्टी नक्की तपासा
जलतारा कामासाठी अर्ज करण्यापूर्वी आपल्या ग्रामपंचायतीमध्ये कामाची मागणी नोंदविण्याची प्रक्रिया काय आहे, आपली जमीन आणि जॉब कार्डसंबंधी पात्रता पूर्ण होते का, प्रस्तावासोबत कोणती अद्ययावत कागदपत्रे आवश्यक आहेत आणि चालू वर्षासाठी जलताऱ्याचे मंजूर अंदाजपत्रक किती आहे, याची माहिती घ्या.
विशेषतः सोशल मीडिया किंवा जुन्या पोस्टमध्ये दिसणारी रक्कम अंतिम समजू नका. पंचायत समितीकडील चालू वर्षाचे अंदाजपत्रक किंवा अधिकृत मंजुरी हा अधिक विश्वासार्ह आधार ठरेल.
निष्कर्ष
शेतातील पावसाच्या पाण्याचे संवर्धन आणि भूजल पुनर्भरणाच्या दृष्टीने जलतारा काम शेतकऱ्यांसाठी उपयुक्त ठरू शकते. जलतारा कामासाठी प्रस्ताव सादर करण्याची स्वतंत्र प्रक्रिया असून ग्रामपंचायत ते पंचायत समिती या स्तरावर आवश्यक कागदपत्रे आणि मंजुरीची प्रक्रिया पूर्ण करावी लागते.
जलतारा योजना प्रस्ताव भरताना जमीन आणि लाभार्थ्याची माहिती अचूक देणे, आवश्यक कागदपत्रे जोडणे, स्थळाची माहिती देणे आणि प्रस्तावातील अटी समजून घेणे महत्त्वाचे आहे. तसेच ₹5,000 अनुदानाचा उल्लेख असला तरी चालू वर्षातील प्रत्यक्ष मंजूर रक्कम संबंधित पंचायत समितीकडून तपासून घेणे हिताचे राहील.
या लेखातील “जलतारा प्रस्ताव डाउनलोड करा” बटनावर क्लिक करा. ७ सेकंदांचा काउंटडाउन संपल्यानंतर Google Drive मधील PDF उघडेल. तेथील Download चिन्हावर क्लिक करून प्रस्ताव सेव्ह करा.
प्रस्ताव सादर करण्यासाठी आपल्या ग्रामपंचायतीशी संपर्क साधा. आवश्यक कागदपत्रे आणि पुढील प्रक्रियेची माहिती तेथून घ्या.
जमिनीची कागदपत्रे, ओळखपत्र, जॉब कार्ड, बँक खात्याची माहिती आणि प्रस्तावातील आवश्यक नमुने तयार ठेवा. अंतिम कागदपत्रांची यादी संबंधित ग्रामपंचायत किंवा पंचायत समितीकडून तपासा.
₹५,००० ही प्रत्येक लाभार्थ्याला मिळणारी निश्चित रक्कम समजू नये. चालू वर्षातील मंजूर अंदाजपत्रक आणि लागू निकषांनुसार रक्कम तपासण्यासाठी पंचायत समितीशी संपर्क साधा.

दादाराव गावंडे हे digitaldg.in चे संस्थापक असून 2018 पासून महाराष्ट्रातील सरकारी योजना, शेतकरी योजना, महिला योजना आणि बांधकाम कामगार विषयांवर माहितीपर लेखन करत आहेत. ते शासन निर्णय (GR) आणि अधिकृत माहितींवर आधारित अचूक व सोप्या भाषेत माहिती देण्यावर भर देतात. ग्रामीण भागातील नागरिकांपर्यंत सरकारी योजनांची योग्य माहिती पोहोचवणे हा त्यांच्या लेखनाचा मुख्य उद्देश आहे.