Download digitally signed satbara डिजिटल सातबारा
मित्रांनो digitally signed satbara कसा काढावा या संदर्भात आज आपण जाऊन घेणार आहोत. satbara digital signature कसा असतो त्यासाठी रजिस्टर कसे करावे लागते त्यानंतर लोगिन आयडी कसा मिळवावा लागतो हि सर्व प्रक्रिया आज आपण जाऊन घेणार आहोत. एकदा का तुम्हाला digital signature satbara मिळाला तर तुम्हाला हा online satbara सर्व शासकीय कामासाठी वापरता येवू शकतो अशी सूचना डिजिटल सातबारा उतारा यावर दिलेली आहे. ऑनलाईन सातबारा सुविधेमुळे अनेक शेतकऱ्यांची धावपळ वाचली आहे. बँकेचे कर्ज असो किंवा इतर शासकीय कामे असोत शेतकऱ्यांना सातबारा आवश्यक असतो आणि तो मिळविण्यासाठी त्यांना महा ई सेवा केंद्र, सेतू सुविधा केंद्र किंवा तलाठी ऑफिस यांच्याकडे रांग लावून उभे राहावे लागते. शेतकऱ्यांची हि असुविधा टाळण्यासाठी आता केवळ पंधरा रुपये भरून शेतकरी डिजिटल 7 12 डाउनलोड करू शकतात.
डिजिटल सातबारा विषयी थोडक्यात माहिती
या लेखामध्ये digitally signed satbara कसा काढावा या संदर्भात आपण पूर्ण माहिती घेणार आहोतच परंतु त्या अगोदर जुने हस्तलिखित सातबारा कसा असतो तो कोठे काढावा हे देखील शेतकऱ्यांना माहिती असणे खूपच महत्वाचे आहे. मित्रांनो जमिनीचा सातबारा म्हणजे शेतकऱ्यांच्या अगदी जिव्हाळ्याचा विषय आहे. शासकीय योजनेसाठी 7 12 उतारा खूप महत्वाचा असतो, शिवाय इतरही कामासाठी सातबारा उतारा खूप महत्वाचा असतो पूर्वी सातबारा उतारा हा हस्तलिखित मिळत असे आजही जुना हस्तलिखित सातबारा नक्कल तहसील कार्यालयात मिळू शकते. आजच्या काळात सर्व सातबारा प्रक्रिया ऑनलाइन आहे आणि त्याच विषयावर आपण आज जाणून घेणार आहोत परंतु तरी तेखील कधी कधी शेतकऱ्यांना 7/12 दुरुस्तीसाठी तहसील कार्यालयात 7/12 दुरुस्ती अर्ज करावा लागतो तर जुने हस्तलिखित सातबारा किंवा जुने फेरफार कसे काढावे हे शेतकऱ्यांना माहित नसते. जुने हस्तलिखित सातबारा सर्व दस्ताऐवज तहसील कार्यालयात उपलब्ध असतात. जुना सातबारा किंवा जुने फेरफार अर्ज कसा करावा या संदर्भात थोडक्यात जाणून घेवूयात.
जुन्या हस्तलिखित सातबाऱ्याचा नमुना व अर्ज डाउनलोड करा
डिजिटल सातबारा मध्ये काही चूक झाली असेल आणि ती चूक दुरुस्त करण्यासाठी किंवा असे म्हणूयात सातबारा नाव दुरुस्ती करायची असेल तर त्यासाठी शेतकऱ्यांना तहसील कार्यालयामध्ये एक अर्ज करावा लागतो तो अर्ज तुम्हाला तहसील कार्यालयात जमा करावा लागतो. थोडेफार शुल्क भरून तुम्हाला तुमचा जुना हस्तलिखित सातबारा मिळतो आणि हा सातबारा मिळाल्यावर तुम्ही तलाठी यांच्याकडे नाव दुरुस्ती असेल किंवा सातबाऱ्यावर चूक झाली असेल तर ती सुधारण्यासाठी अर्ज करू शकता. जुना सातबारा मिळविण्यासाठी लागणारा अर्ज, जुन्या हस्तलिखित सातबाऱ्याचा नमुना व हा अर्ज ऑनलाइन कसा करावा या संदर्भात खालील लिंकवर क्लिक करून तुम्ही फॉर्म डाउनलोड करू शकता आणि व्हिडीओ बघू शकता.
जुना हस्तलिखित सातबारा मिळविण्यासाठी करावयाचा अर्ज ( डाउनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा )
जुना-सातबारा-व-फेरफार-मिळविण्यासाठी-नमुना-अर्ज.pdf (896 downloads )जुना हस्तलिखित सातबारा नमुना बघण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा
हस्त-लिखित-जुना-सातबारा.pdf (940 downloads )सातबारा ऑनलाईन दुरुस्तीसाठी अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी खालील व्हिडीओ बघा.
असा डाउनलोड करा डिजिटल सातबारा
चला तर मित्रांनो आता 7 12 उतारा महाराष्ट्र 2020 या विषयी जाणून घेवूयात. digitally signed satbara कसा शोधायचा यासाठी 7 12 utara online website कोणती असते हि सर्व माहिती आज आपण एक एक करत घेणार आहोत. सगळ्यात अगोदर तुमच्या कॉम्युटरमध्ये किंवा मोबाईलमध्ये टाईप करा digital satbara किंवा डायरेक्ट या वेबसाईटवर जाण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा https://digitalsatbara.mahabhumi.gov.in/dslr
त्यानंतर या ठिकाणी लोगिन आयडी व पासवर्ड टाकून लोगिन करायचे आहे. जर तुमच्याकडे लोगिन आयडी व पासवर्ड नसेल तर तुम्हाला या ठिकाणी रजिस्ट्रेशन करावे लागेल त्यासाठी या ठिकाणी रजिस्ट्रेशन बटन असेल त्यावर क्लिक करून तुमचे रजिस्ट्रेशन करून घ्या. रजिस्ट्रेशन केल्यानंतर तुम्हाला लोगिन आयडी व पासवर्ड मिळेल तो टाकून व्यवस्थित लोगिन केल्यानंतर तुम्हाला तुमचा जिल्हा तालुका तुमच्या शेताचा सर्व्हे नंबर म्हणजेच गट न. इत्यादी माहिती टाकली लागणार आहे त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला तीन पर्याय दिसतील हिरव्या रंगामध्ये रीचार्ज अकाउंट लाल रंगामध्ये रीसेट अकाउंट व निळ्या रंगामध्ये डाऊनलोड असे पर्याय दिसतील ( चित्र पहा )
डाउनलोड या निळ्या रंगाच्या बटनावर क्लिक करा आणि तुमचा digitally signed satbara डाउनलोड करून घ्या.. ह्या डिजिटल सातबारा वर QR code असतो आणि हा सातबारा सर्व शासकीय कामासाठी ग्राह्य धरले जातात अशी सूचना यावर दिली आहे.
डिजिटल सातबारा नमुना कसा असतो ते जाणून घ्या. डिजिटल सातबारा डाउनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा
डिजिटल-सातबारा.pdf (1584 downloads )महाराष्ट्र शासनातर्फे शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबविल्या जातात परंतु अद्यापहि बऱ्याच शेतकऱ्यांना अजूनही याविषयी संपूर्ण माहिती नाही. महाराष्ट्र राज्य व केंद्र शासनाच्या विविध योजनेच्या मोफत माहितीसाठी आमच्या चॅनलला भेट द्या यासाठी येथे क्लिक करा