जिल्हा परिषद योजना
मित्रांनो नमस्कार, तुम्हाला माहितच आहे कि जिल्हा परिषद योजनाअंतर्गत महिला व बाल कल्याण विभागातर्फे विविध योजना सुरु आहेत आणि त्या योजनांचा लाभ घेण्यासाठी ऑनलाइन अर्ज भरणे सुरु आहेत.
या जिल्हा परिषद योजनापैकी पिठाच्या गिरणीसाठी ऑनलाइन अर्ज कसा करावा या संदर्भात मी या अगोदरच एक व्हिडीओ बनविलेला आहे.
जिल्हा परिषद योजना अंतर्गत मुलींसाठी सायकल योजनेचा अर्ज.
मित्रांनो, जिल्हा परिषद योजनासाठी ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया तुम्ही बघितलीच असेल पण तुम्हाला माहित आहे का कि ह्या योजनेसाठी कोणकोणती कागदपत्रे लागतात.
जिल्हा परिषद योजना साठी ऑनलाईन अर्ज करण्याआगोदर या अर्जासाठी कोणकोणती कागदपत्रे किंवा प्रमाणपत्रे लागतात व कोणकोणत्या अटी आहेत त्या संबधी जाणून घेवूयात.
लागणारी कागदपत्रे
- तलाठी किंवा ग्रामसेवक यांचे रहिवासी प्रमाणपत्र
- तहसीलदार किंवा तलाठी यांचे उत्पन्नाचे प्रमाणपत्र
- राहत्या गावापासून शाळेचे अंतर २ किमी पेक्षा जास्त असल्याबाबतचे मुख्याध्यापकाचे प्रमाणपत्र
- दारिद्र्यरेषेचे प्रमाणपत्र
- यापूर्वी योजनेचा लाभ न घेतल्याचे ग्राम पंचायतीचे प्रमाणपत्र
- सायकल विक्री किंवा हस्तांतर न करण्याचे पालकाचे हमीपत्र
- आधार लिंक बँक पासबुकची छायांकित प्रत
- आधार कार्डची छायांकित प्रत
लाभार्थी निवडीसाठी नियम, अटी व शर्ती
- या योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थिनी इयत्ता ५ वी ते १२ वीच्या वर्गात शिक्षण घेणारी व ग्रामीण भागातील रहिवासी असावी.
- लाभार्थी राहत असलेले गाव व शिकत असलेल्या शाळेचे अंतर २ किमी पेक्षा जास्त नसावे.
- लाभार्थी हा दारिद्र्य रेषेखालील असल्यास प्राधान्य देण्यात येईल.
- लाभार्य्याच्या कुटुंबाचे सर्व मार्गाने मिळून होणारे सर्व वार्षिक उत्पन्न ५०००० पेक्षा जास्त नसावे
- १० टक्के रक्कम भरणे बाबतचे हमीपत्र
- लाभार्थीची निवड करण्याचे संपूर्ण अधिकार महिला व बाल कल्याण समितीस राहील
- अपूर्ण किंवा नामंजूर प्रस्ताव बाबत पत्रकाद्वारे कळविण्याची जबाबदारी समितीवर राहणार नाही.
शेतकरी योजना महाराष्ट्र व जिल्हा परिषद योजनाची माहिती तुमच्या मोबाईलवर मिळवा
मित्रांनो अनेकजन आम्हाला तुमच्या WhatsApp ग्रुपमध्ये सामील करा म्हणून विनंती करत आहेत WhatsApp ग्रुपमध्ये सदस्य add करण्यास मर्यादा आहेत.
त्यामुळे आम्ही टेलिग्रामवर Digital DG हा ग्रुप बनविलेला आहे.
आमच्या टेलिग्राम ग्रुपवर आम्ही विविध शासकीय योजनांची माहिती देत असतो ती माहिती तुम्हालाही अगदी मोफत मिळू शकते आणि त्यामुळे तुम्हालाही एखाद्या योजनेचा लाभ घेण्यास मदत मिळू शकते त्यासाठी आमचा टेलिग्राम ग्रुप लगेच जॉईन करा
जिल्हा परिषद मुलींसाठी सायकल योजना
चला तर आता जाणून घेवूयात कि जिल्हा परिषद योजना अंतर्गत मुलींना शाळेत जाण्यासाठी सायकल या योजनेसाठी ऑनलाइन अर्ज कसा करावा लागतो त्याची प्रोसेस कशी असते.
अर्ज प्रोसेस
तुमच्या मोबाईलमधील किंवा कॉम्प्युटरमधील सर्च बारमध्ये टाईप करा जालना zp योजना.
जिल्हा परिषद योजना साठी ऑनलाइन कसा करावा या संदर्भातील pdf फाइल डाउनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
zilla-parishad-yojana-online-application-guide.pdf (4885 downloads )- महिला व बालकल्याण विभाग, पशुसंवर्धन विभाग, समाजकल्याण विभाग, कृषी विभाग असे विभाग दिसत आहेत यापैकी महिला व बालकल्याण विभाग या लिंकवर क्लिक करा.
- ग्रामीण भागातील मुलींना शाळेत जाण्यासाठी सायकल पुरविणे या योजनेकरिता करावयचा अर्जाचा नमुना २०२० २०२१ या लिंक समोरील हिरव्या रंगाच्या अर्ज करा या हिरव्या रंगाच्या लिंकवर क्लिक करा.
- पात्रता तपासण्यासाठी चौकटीमध्ये तुमचा आधार नंबर टाका
- सबमिट या बटनावर क्लिक करा.
- You are eligible to used this Scheme benefite असा संदेश दिसल्यास ओके या बटनावर क्लिक करा आणि पुढे जा.
- महिला व बालकल्याण विभाग – अर्ज चरण १ अंतर्गत ग्रामीण भागातील मुलींसाठी शाळेत जाण्यासाठी सायकल पुरविणे या योजनेकरिता करावयचा अर्जाचा नमुना २०२० २०२१ हि योजना निवडा.
- अर्ज पहा या बटनावर क्लिक करा.
- अर्ज ओपन होईल त्या अर्जामध्ये जी माहिती विचारली आहे ती माहिती या ठिकाणी भर.
- submit या बटनावर क्लिक करा
- सर्व माहिती व्यवस्थित भरल्याची खात्री करा.
- सबमिट या बटनावर
- तुम्ही ऑनलाइन भरलेल्या अर्जाची pdfमध्ये प्रत दिसेल त्यावरील application ID नोंद करून घ्या.
- प्रिंट या बटनावर क्लिक करा आणि या अर्जाची प्रिंट काढून घ्या..प्रिंट काढल्यानंतर हि प्रत एकात्मिक बालविकास प्रकल्प कार्यालयात सादर करा.
- अर्ज सादर केल्यानंतर तुमच्या अर्जाची साध्य स्थिती जाणून घेण्यासाठी परत http://jalnazpyojna.in/ZPJalna/ या वेबसाईटवर ज.
- तुम्ही सादर केलेल्या अर्जाची सद्यस्थिती तपासण्यासाठी स्थिती तपासा हा पर्याय दिसेल त्यामध्ये application ID नंबर टाका आणि सबमिट करा….जसे हि तुम्ही सबमिट कराल या ठिकाणी तुम्हाला तुमच्या अर्जाची स्थिती दिसेल.
मुलींसाठी सायकल योजना एवजी दुसऱ्या योजनेसाठी तुम्हाला फॉर्म भरायचा असेल तर या ठिकाणी दुसऱ्याही योजनांचे अर्ज उपलब्ध आहेत.
जसे कि पिठाची गिरणी.
महिलांसाठी पिको फॉल मशीन.
घटस्पोटीत किंवा परीतक्त्या महिलांसाठी घरकुल योजना.
७ वी ते १२ वी पास मुलींसाठी संगणक प्रशिक्षण योजना इत्यादी योजना उपलब्ध आहेत.