डॉ. बाबासाहेब आंबेडकर जीवन प्रकाश योजना विषयी माहिती
आजच्या या लेखामध्ये आपण डॉ. बाबासाहेब आंबेडकर जीवन प्रकाश योजना संदर्भात माहिती जाणून घेणार आहोत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर जीवन प्रकाश योजना महाराष्ट्र शासनाच्या वतीने नवीन योजना सुरु करण्यात आलेली आहे.
सदरील योजना १४ एप्रिल २०२१ म्हणजेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती पासून सुरु करण्यात आली आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जीवन प्रकाश योजना संदर्भात माहितीचा खालील व्हिडीओ पहा.
जीवन प्रकाश योजना उद्देश dr. babasaheb ambedkar jeevan prakash yojana
तुम्हाला माहितच असेल कि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३० वी जयंती जगभरात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या जयंती निमित्त महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जाती असेल किंवा अनुसूचित जमाती असेल या समाजाचे जीवनमान प्रकाशित करण्याच्या उद्देशाने वीज जोडणी विशेष मोहीम १४ एप्रिल २०२१ ते ६ डिसेंबर २०२१ पर्यंत राबविण्याचा शासन निर्णय म्हणजेच GR काढण्यात आलेला आहे.
महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा
कोणकोणती कागदपत्रे लागणार डॉ. बाबासाहेब आंबेडकर जीवन प्रकाश योजनेसाठी
- ज्या व्यक्तींना या जीवन प्रकाश योजनेचा लाभ घ्यायचा असेल त्यांच्याकडे जातीचे प्रमाणपत्र आवश्यक असेल
- महावितरण कंपनीच्या विहित नमुन्यातील अर्ज, या अर्जासोबत आधार कार्ड, रहिवासी दाखला व इतर कागदपत्रांची छायांकित प्रत जोडावी लागेल.
- जो अर्जदार डॉ. बाबासाहेब आंबेडकर जीवन प्रकाश योजनासाठी अर्ज करू इच्छित असेल त्या अर्जदारांनी अर्ज केल्याच्या ठिकाणी यापूर्वीची महावितरण कंपनीची थकबाकी नसावी.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जीवन प्रकाश योजनेची कार्यपद्धती
- या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदारास ऑफलाईन किंवा ऑनलाईन अर्ज करावा लागेल.
- वीज मांडणीचा अहवाल अर्जासोबत जोडावा लागेल.
- अर्जदाराने महावितरण कंपनीकडे ५०० रुपये अनामत रक्कम जमा करावी, सदरील रक्कम ५ समान हफ्त्यामध्ये अर्जदार जमा करू शकतात.
- ज्या अर्जदारांच्या घरी वीज जोडणी नाही अशा अर्जदारांना अर्ज सादर केल्यानंतर १५ कार्यालयीन दिवसात वीज जोडणी मिळेल
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर जीवन प्रकाश योजना संदर्भात अर्जदाराची काही तक्रार असेल तर यासाठी एक वेब पोर्टल निर्माण करण्यात येईल.
- महावितरण वीज कंपनीद्वारे या योजनेची प्रसिद्धी करण्यात येईल जेणे करून पात्र लाभार्थींना या योजनेचा लाभ घेणे सोपे जाईल.
अनुसूचित जाती योजना महाराष्ट्र Anusuchit jati yojana Maharashtra.
महाराष्ट्रातील अनुसूचित जाती समाज योजना अंतर्गत असणारी हि एक योजना म्हणजेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर जीवन प्रकाश योजना होय dr. babasaheb ambedkar jeevan prakash yojana. तुम्हाला जर अनुसूचित जाती योजना ( Anusuchit jati yojana Maharashtra ) व इतर योजना संदर्भातील माहिती हवी असेल तर डिजिटल डीजी या युट्युब चॅनलला भेट द्या त्यासाठी येथे क्लिक करा.
मित्रांनो अशाप्रकारे तुम्ही डॉ. बाबासाहेब आंबेडकर जीवन प्रकाश योजनेचा लाभ घेऊ शकता. तुम्हाला जर डॉ. बाबासाहेब आंबेडकर जीवन प्रकाश योजना संदर्भात अधिक माहिती हवी असेल तर या योजनेचा शासन निर्णय म्हणजेच GR या ठिकाणी उपलब्ध आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जीवन प्रकाश योजनेच GR डाउनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
मित्रांनो शेतकरी बांधवांसाठी महाराष्ट्र शासनाच्या विविध योजना सुरु असतात त्या योजनांचा लाभ तुम्हाला घ्यावयाचा असेल तर तुम्हाला त्या योजनांची माहिती असणे आवश्यक आहे. आमच्या डिजिटल डीजी या युट्युब चॅनलवर विविध शासकीय योजनांच्या माहितीचे व्हिडीओज उपलब्ध आहेत ते व्हिडीओज बघून तुम्ही शासकीय योजनांचा लाभ घेवू शकता. आमच्या डिजिटल डीजी युट्युब चॅनलवर जाण्यासाठी येथे क्लिक करा.
शेतकरी अनुदान योजना लेख वाचा.
तुम्हाला जर मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना विषयी अधिक माहिती हवी असेल तर खालील लिंकवर क्लिक करा.
https://digitaldg.in/2020/09/28/maharashtra-solar-pump-yojana-online-application/
सिंचन विहिरीचा लाभ घेण्यासाठी मोफत प्रस्ताव हवा असेल तर खालील लिंकवर क्लिक करा.
https://digitaldg.in/2021/03/13/सिंचन-विहीर/
तुम्हाला विहीर असेल आणि त्यावर डीझेल पंप हवा असेल तर त्या संदर्भात योजनेसाठी ऑनलाईन अर्ज कसा करावा ते जाणून घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
https://digitaldg.in/2021/01/04/pvc-pipe-subsidy-in-maharashtra/
satbara online nighat nahi online payment hot nahi plz mahiti pahije