विहीर पुनर्भरण करा रोजगार हमी योजना मधून.

विहीर पुनर्भरण करा रोजगार हमी योजना मधून.

विहीर पुनर्भरण करा पाणी पातळी निश्चित वाढू शकते

मित्रांनो महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजना अंतर्गत तुम्ही तुमच्या शेतातील विहिरींचे पुनर्भरण करू शकता इंग्रजीमध्ये याला recharge well असेही म्हणतात. विहिरीच्या पाणी पातळीमध्ये वाढ व्हाव्ही यासाठी विहिरींचे पुनर्भरण केले जाते आणि हाच उद्देश विहीर पुनर्भरण करणे या मागचा असतो.

शेतीला पाणी देण्याचे मुख्य साधन म्हणजेच विहीर (percolation well)

शेती करत असतांना त्यासाठी पाणी असणे खूप महत्वाचे असते. शेती आता प्रगत झाली असून शेतीला पाण्यासाठी विविध स्त्रोतांचा पर्याय निर्माण होत आहे.

जसे कि शेततळे, विहीर, कुपनलिका, पाटाचे पाणी हे आणि इतर पर्याय सध्या शेतीला पाणी देण्यासाठी वापरले जातात. विहीर(percolation well) हा खात्रीचा पर्याय अनेक शेतकरी वापरतात.

ज्या शेतकरी बांधवांकडे शेती आहे त्यांच्या शेतात बहुधा विहीर असतेच. काही विहिरींना चांगले पाणी असते तर काहीना कमी पाणी असते.

विहिरीची पाणी पातळी वाढविण्यासाठी विहीर पुनर्भरण करणे आवश्यक. (recharge well)

ज्या शेतकऱ्यांच्या विहिरींना कमी पाणी आहे अशा विहिरींची पाणी पातळी वाढविण्यासाठी विहीर पुनर्भरण (well recharge) केल्यास फायदा होऊ शकतो. बऱ्याच शेतकऱ्यांच्या विहिरींना आडवे बोअर किंवा पुरेसे खोलीकरण करून सुद्धा मुबलक पाणी मिळत नाही अशा शेतकऱ्यांनी जर त्यांच्या शेतातील विहिरींचे पुनर्भरण केले तर विहिरीच्या पाणी पातळीमध्ये वाढ होण्याची शक्यात असते.

महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजना अंतर्गत विहिरींचे पुनर्भरण.

शेतकरी बंधुंनो विहीर पुनर्भरण करण्याचे जरी विहिरीच्या पाणी पातळीमध्ये वाढ होत असली तरी हि थोडी खर्चिक बाब असल्याने शेतकरी यासाठी आखडता हात घेण्याची शक्याता असते.

परंतु आता काळजी करण्यचे कारण नाही, कारण आता महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजना अंतर्गत विहिरींचे पुनर्भरण करता येऊ शकते. विहिरीचे पुनर्भरण करण्यासाठी योग्य प्रस्ताव तुम्हाला तुमच्या गावातील ग्रामसेवकाकडे किंवा रोजगार हमी योजनेच्या अधिकारी यांच्याकडे सादर करावा लागतो.

विहीर पुनर्भरण प्रस्ताव pdf मध्ये डाउनलोड करा.

मित्रांनो विहीर पुनर्भरण संदर्भातील संपूर्ण प्रस्ताव या ठिकाणी तुम्हाला pdf स्वरूपामध्ये उपलब्ध करून देण्यात येत आहे. खालील प्रस्ताव डाउनलोड करा या बटनावर क्लिक करून किंवा मोबाईल असेल तर टच करून हा विहीर पुनर्भरण प्रस्ताव तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये किंवा कॉम्प्युटरमध्ये डाउनलोड करू शकता.

recharge well proposal pdf

महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेच्या अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी येथे क्लिक .

विहीर पुनर्भरण प्रस्ताव संदर्भात सूचना.

गाव तालुका आणि जिल्हा हे रकाने कोरे ठेवलेले आहेत त्यामध्ये तुम्ही तुमचे गाव तुमचा तालुका आणि जिल्हा टाकून तो सादर करू शकता. यामध्ये तुमच्या तालुक्यानुसार कमी किंवा जास्त कागदपत्रे लागू शकतात किंवा तुमच्या तालुक्यानुसार थोडाफार बदल असण्याची सुद्धा शक्यता नाकारता येत नाही.

आमच्याशी सोशल मिडीयावर कनेक्ट व्हा.

शासकीय योजनांची  माहिती तुम्हाला मिळवी यासाठी आम्हाला खालील सोशल मिडिया प्लॅटफॉर्म्सवर फॉलो करा.

फेसबुक ग्रुपमध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा.

टेलिग्राम चॅनल जॉईन करा येथे क्लिक करा

फेसबुक पेज लाईक करा  येथे क्लिक करा.

शासकीय योजना संदर्भातील लेख वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

नवीन ट्रॅक्टर आमचा डिझेल तुमचे योजना संदर्भातील माहिती जाणून घ्या.

https://digitaldg.in/2021/04/17/ट्रॅक्टर-आमचा-डिझेल-तुमच/

‎तुमच्याकडे  शेततळे असेल तर शेततळे कागद अनुदान योजना विषयी अधिक माहिती जाणून घ्या.

https://digitaldg.in/2021/04/11/शेततळे-कागद-अनुदान-योजना/

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *