शेळी पालन कर्ज योजना राज्यस्तरीय व जिल्हा स्तरीय योजना

शेळी पालन कर्ज योजना राज्यस्तरीय व जिल्हा स्तरीय योजना

मित्रांनो शेळी पालन कर्ज योजना संदर्भात माहिती जाणून घेवूयात. शासनाच्या वतीने शेळी/मेंढी गट वाटप राज्यस्तरीय व जिल्हा स्तरीय योजना अंतर्गत लाभार्थ्यांना योजनेचा लाभ दिला जातो. तुम्ही जर शेळीपालन व्यवसाय करत असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. कारण आता तुम्हाला शेळी पालन कर्ज योजना साठी अनुदान मिळणार आहे.

नाविन्यपूर्ण योजना व पुण्यश्लोक अहिल्यादेवी महाराष्ट्र मेंढी व शेळी महामंडळ

नाविन्यपूर्ण योजना किंवा पुण्यश्लोक अहिल्यादेवी महाराष्ट्र मेंढी व शेळी महामंडळ यांचेकडून देखील हि योजना राबविली जाते. नाविन्य पूर्ण योजनेसाठी लागणारा अर्ज pdf अर्ज डाउनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा आणि अधिकची माहिती जाणून घ्या.

शेळी पालन कर्ज

शेळ्या व मेंढ्याचे सध्याचे सध्याचे बाजारमूल्य विचारात घेवून पूर्वीच्या किमतीत वाढ करण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतलेला आहे आणि या संदर्भातील जी.आर. म्हणजेच शासन निर्णय दिनांक २५ मे २०२१ रोजी महाराष्ट्र शासनच्या अधिकृत वेबसाईटवर उपलब्ध आहे किंवा खालील लिंकवर क्लिक करून देखील तुम्ही शेळी पालन कर्ज योजनेचा जी.आर. म्हणजेच शासन निर्णय बघू शकता.

शेळी व मेढी खरेदी दरवाढ संदर्भातील जी.आर. उपलब्ध

मित्रांनो शेळी मेंढीच्या वाढविलेल्या किमतीबाबतचा जी. आर. म्हणजेच शासन निर्णय आपण या ठिकाणी बघणार आहोत त्याचप्रमाणे शेळी मेंढी गटवाटपाच्या योजनेचे स्वरूप कसे असेल त्याचा अटी व शर्थी काय असतील, योजनेच्या अंमलबजावनीची कार्यपद्धती कशी असेल, जातीनिहाय कोणत्या समाजासाठी किती रक्कम भरावी लागेल, या संदर्भात देखील आपण माहिती जाणून घेणार आहोत. शेळी पालन कर्ज किंवा अनुदान संदर्भातील महाराष्ट्र शासन निर्णय डाउनलोड करून घ्या.

महाराष्ट्र शासन निर्णय

शेळी पालन व्यवसाय ग्रामीण भागात लोकप्रिय

मित्रांनो, नोकरी नसल्यामुळे मोठ्या प्रमाणात बेरोजगारी वाढलेली आहे. त्यामुळे अनेक तरुण उद्योग शेळी पालन व्यवसायाकडे वळतांना दिसत आहे. विशेषत: ग्रामीण भागातील तरुण खासकरून शेळी पालन व्यवसायाकडे वळतांना दिसत आहे याचे कारण असे आहे कि शेळी पालन व्यवसाय करण्यास गाई व म्हशी खरेदी करून दुग्धव्यवसाय करण्यापेक्षा अधिक सोपा वाटतो. शेळी पालन व्यवसाय यशस्वी करण्यासठी शासकीय शेळीपालन प्रशिक्षण देखील मिळते.

शेळीपालन व्यवसाय ग्रामीण भागामध्ये यशस्वी होऊ शकतो.

शेळीचे दुध आरोग्यवर्धक असून शेळीच्या मासास मोठ्या प्रमाणात मागणी असते त्यामुळे हा शेळी पालन व्यवसाय ग्रामीण भागात लोकप्रिय आहे आणि यासाठी आता अधिकचे शेळी पालन कर्ज मिळणार असल्यामुळे हा व्यवसाय करण्यास करण्यास आणखीनच मदत मिळणार आहे. शासनाच्या वतीने शेळी पालन व मेंढी पालन योजनेसाठी किती कर्ज मिळणार आहे त्या संदर्भात या ठिकाणी माहिती घेवूयात.

शेळी पालन कर्ज योजना किंवा शेळी/मेंढी गटवाटपाच्या योजनेचे स्वरूप.

शेळी/मेंढी गट वाटप राज्यस्तरीय व जिल्हा स्तरीय योजना अंतर्गत लाभार्थ्यांना स्थानिक भागात तग धरतील अशा १० शेळ्या व एक बोकड किंवा १० मेंढ्या एक १ नर मेंढा वाटप करण्यात येईल. १० शेळ्या अधिक एक बोकड व १० मेंढ्या अधिक १ नर मेंढा यांच्या किमतीचा चार्ट जी.आर.मध्ये म्हणजेच शासन निर्णयामध्ये दिलेला आहे. हा जी. आर. म्हणजेच शासन निर्णय बघण्यासाठी येथे क्लिक करा.

शेळी पालन कर्ज योजना

शेळी/मेंढी गटवाटप योजनेसाठी किती अनुदान मिळेल.

मित्रांनो आता या योजनेसाठी कोणत्या समाजासाठी किती अनुदान मिळेल ते या ठिकाणी जाणून घेवूयात. या योजनेसाठी खुल्या व इ.मा.व. प्रवर्गातील लाभार्थ्यांसाठी शासनाच्या वतीने ५० टक्के अनुदान मिळणार आहे. अनुसूचित जाती व जमाती प्रवर्गातील लाभार्थ्यांसाठी ७५ टक्के अनुदान या योजनेसाठी मिळणार आहे.

शेळी पालन कर्ज लाभार्थी निवडीचे प्राधान्यक्रम

या योजनेसाठी खालील प्रमाणे लाभार्थी निवडीचा प्राधान्यक्रम राबविण्यात येणार आहे.

योजनेसाठी लाभार्थ्यांची निवड झाल्यास खालील प्रमाणे कागदपत्रे तयार करावीत.

अशा प्रकारे कागदपत्रे लाभार्थ्याला तयार करावे लागणार आहे.

विविध शासकीय योजनेची माहिती मिळविण्यासाठी आमच्या ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

मित्रांनो, शेतकरी अनुदान योजना, कृषी विभाग योजनाशासकीय योजनेचा लाभ घेण्यासाठी लागणारी कागदपत्रे तसेच पिक कर्ज योजना ऑनलाईन अर्ज इतर विविध शासकीय योजनांची माहिती मिळविण्यासाठी डिजिटल डीजी युट्युब चॅनलला भेट द्या. आमचा फेसबुक ग्रुपटेलिग्राम ग्रुप जॉईन करा.

5 thoughts on “शेळी पालन कर्ज योजना राज्यस्तरीय व जिल्हा स्तरीय योजना

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *