शेती विषयक लेख, शेतकरी बंधुंनो आतला गाभा हिरवा ठेवा

शेती विषयक लेख, शेतकरी बंधुंनो आतला गाभा हिरवा ठेवा

Motivation या सदरामध्ये विविध प्रेरणादायी शेती विषयक लेख शेतकरी बांधवाना वाचण्यास मिळणार आहे. शेती योजनेच्या माहितीसोबतच प्रेरणादायी शेती विषयक लेख शेतकरी बांधवाना वाचायला मिळावेत या हेतूने हे सदर सुरु करत आहोत. शेतकरी म्हटला कि अनंत अडचणीचा डोंगर असे चित्र डोळ्यासमोर उभे राहते. कमी पाऊस झाला तरी नुकसान व जास्त पाऊस झाला तरी नुकसान होत असते. बियाणे, खते व इतर निविष्ठा खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांकडे पैसा उपलब्ध होत नाही. त्यामुळे इच्छा नसतांना देखील शेतकऱ्यांस खाजगी सावकारांचा उंबरठा झिजवावा लागतो. यामुळे अनेक शेतकरी बांधवांच्या मनात नकारात्मक विचार येतात आणि मग त्यातून आत्महत्या करण्याचा शेवटचा पर्याय शेतकरी बांधव पत्करतात.

या शेती विषयक लेख संदर्भात तुमच्या प्रतिक्रिया कळवा

शेतकरी आत्महत्यांचे टोकांचे पाऊल उचलतात ते तो भित्रा आहे म्हणून नाही. संकटांचा सामना करण्याची शक्ती त्यामध्ये नाही म्हणून नाही. तो निराश असतो कारण त्याने अपार मेहनत करून घामातून पिकविलेल्या मालाचे कवडीमोल भावाने व्यापाऱ्यांकडून खरेदी होताना हतबल होऊन बघतो. शेतकरी मुळातच धाडसी, साहसी आणि मेहनती असतो. संकटाचा सामना करण्याचे बाळकडू त्याला घरातच मिळालेले असते. शेतकऱ्याच्या मालास चांगला भाव मिळावा एवढी माफक अपेक्षा शेतकऱ्यांची असते.

शेती विषयक लेख

शेती सोडून शहरात नोकरीसाठी शेतकरी तरुणांचा ओघ.

आपल्या शेतकरी बापाला येत असलेल्या या समस्या बघून शेतकऱ्याचा मुलाला शेतीमध्ये स्वारस्यच उरत नाही. शेतकऱ्याला हि वाटते कि आपल्या मुलांनी शिक्षण घेवून शहरामाध्येच नोकरी करावी. आपले आयुष्य सुखासमाधाने जगावे अर्थात यामध्ये चुकीचे काहीही नाही पण सगळ्याच शेतकरी बांधवांनी आपापली मुलांना शिक्षण घेवून शहरात पाठविली तर या काळ्या आईची सेवा करायची कुणी? हा मोठा प्रश्न या ठिकाणी निर्माण होतांना दिसतो आहे.   

शहरामध्ये स्थायिक होण्याचे ग्रामीण तरुणांचे स्वप्न

शहरातील मोठमोठ्या उंच इमारती, गुळगुळीत रस्त्यावरून चकचकीत धावणाऱ्या गाड्या, भरजरी वस्त्र घातलेले महिला व पुरुष, बोली भाषा, राहणीमान हे सर्व बघून आपणही असे जीवन जगावे असे ग्रामीण भागातील अनेक तरुणांचे स्वप्न असते. शेतीकरी शेतीमध्ये राबराब राबून पैसे गोळा करून आपल्या मुलांना शहरत पाठवितात आणि आता आपला मुलगा काहीतरी करेल हि अपेक्षा उराशी बाळगतात.

नोकरीपेक्षा शेतीव्यवसायामध्ये उत्तम करिअर घडू शकते.

मराठी मध्ये एक म्हण आहे गुलामीच्या सोन्याचा मह्लापेक्षा स्वतःची हक्काची झोपडी बरी. शेतकऱ्यांच्या मुलांनी उच्चशिक्षित होऊन शिक्षित होऊन चांगली नोकरी मिळविली तर उत्तमच परंतु जर शहरामध्ये नोकरी नसेल तर शेतीमध्ये देखील चांगले करिअर घडू शकते. आपल्या शिक्षणाचा उपयोग शेतीत केल्यास नक्कीच शेती फायद्याची होईल यात शंका नाही. कितीही मोठी नोकरी असू द्या शेवटी नोकरी ती नोकरीच असते. पिंजरा सोन्याचा जरी असला तरी तो पिंजराच असतो त्यामुळे केवळ नोकरीच पाहिजे हे मानसिकता बदलून पिकांचा, उत्पादित मालांच्या मार्केटचा आणि भौगोलिक परिस्थितीचा विचार करून शेती केल्यास शेतीमध्ये हमखास यश मिळू शकते. शेतीमध्ये तरुणांनी करिअर घडवावे हा या शेती विषयक लेख मधला मुख्य उद्देश आहे.

अनेक शेतकरी तरुणांचे शेतीव्यवसायामध्ये यश.

अनेक तरुण शेतकऱ्यांनी आधुनिक पद्धतीने शेती करून शेती यशस्वी होऊ शकते याचा दाखला दिलेला आहे. वर्तमान पत्र व टीव्हीवर आपण त्यासंदर्भातील बातम्या देखील बघत असतो. माती परीक्षण, योग्य बियाणे, प्रमाणित खतांची मात्रा, बाजारपेठ या सर्व बाबींचा विचार करून शेती केल्यास शेती हमखास फायद्याची होऊ शकते.

शेतीपूरक व्यवसाय काळजी गरज त्यासाठी हा शेती विषयक लेख

शेती करत असतांना केवळ शेतीच्या भरवशावर राहून चालत नाही. शेळी पालन व्यवसाय, कुक्कुटपालन, दुग्धव्यवसाय असे शेतीपूरक व्यवसाय केल्यास शेती नक्कीच फायद्याची होऊ शकते. शेतीमध्ये काही प्रमाणात तोटा जरी आला तर या जोडधंद्यामुळे तग धरण्यास शेतकऱ्यांस मदत मिळू शकते. शेळीपालन योजना असेल किंवा कुक्कुटपालन योजना असेल नाहीतर दुग्धव्यवसाय योजना असेल  या सर्व योजनांसाठी शासकीय स्तरावरून शेतकरी अनुदान योजना राबविल्या जातात त्या योजनांचा शेतकरी बांधवांनी लाभ घेतला पाहिजे.

विविध शेतकरी अनुदान योजनेची माहिती मिळवा मोफत

शासनाच्या वतीने शेळी पालन, कुक्कुटपालन, दुग्धव्यवसाय व इतर शासकीय योजना जरी राबविल्या जात असल्या तरी या योजनांची काही शेतकरी बांधवांना अद्यापही मिळत नसण्याची शक्यता आहे. त्यामुळे बरेच शेतकरी या योजनांपासून वंचित राहू शकतात. या सर्व योजनांची मोफत माहिती देण्याचे काम डिजिटल डीजी युट्युब चॅनल त्याचप्रमाणे शेतकरी योजना महाराष्ट्र या फेसबुक ग्रुपवर सुरु आहे. शेतकरी योजना संदर्भातील विविध योजनेच्या माहितीसाठी शेतकरी बांधव व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये देखील सहभागी होऊ शकतात त्यासाठी येथे क्लिक करा.

शेतकरी बांधवांनो आशावादी व्हा. आतला गाभा हिरवागार ठेवा.

मित्रांनो कितीही संकटे येवू द्या. कितीही वादळे येवू द्या मात्र हीमत कधीही हारू नका. माणूस कितीही शक्तिशाली असला आणि त्यामध्ये हिमंत नसेल तर त्या माणसाकडून कोणतेही मोठे कार्य होऊ शकत नाही. तुमच्या अवती भवती कितीही उदास, उजाड किंवा नकारात्मक वातावरण असले तरी तुमच्या अंतर्मनात मात्र कायमची हिरवळ असायला हवी कारण माणसाला बाह्य शक्तीपेक्षा आतल्या कमजोरीमुळेच जास्त नुकसान होते. हा शेती विषयक लेख तुम्हाला कसा वाटला ते कमेंट्स करून जरूर कळवा. आणखी शेती विषयक लेख वाचण्यासाठी digitaldg.in या वेबसाईटवरील मोटिव्हेशन या सदराला भेट देत राहा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *