एक जिल्हा एक उत्पादन योजनेसाठी निधी आला असा करा अर्ज

एक जिल्हा एक उत्पादन योजनेसाठी निधी आला असा करा अर्ज

प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना हि योजना एक जिल्हा एक उत्पादन या धर्तीवर २०२० ते २०२१ पासून पुढील ५ वर्षे राज्यात राबविली जाणार आहे. हि योजना प्रभावीपाने राबविण्यासंदर्भात सर्वसाधारण प्रवर्गासाठी १३,७३,४८,३७४ रुपये निधी वितरीत करण्याबाबतचा शासन निर्णय नुकताच महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत वेबसाईटवर प्रकाशित करण्यात आला आहे.

योजनेसंदर्भातील संपूर्ण माहिती

मित्रांनो प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना म्हणजेच एक जिल्हा एक उत्पादन योजना कशी आहे, कोणकोणत्या व्यक्ती यासाठी पात्र असणार आहेत, त्यासाठी ऑनलाईन अर्ज कसा करावा लागतो, कोणकोणती कागदपत्रे अपलोड करावी लागतात या संदर्भातील संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी बघणार आहोत.

जाणून घ्या या योजनेचा लाभ घेण्यासाठी कोठे आणि कसा अर्ज करावा. खालील बटनावर क्लिक करा.

जाणून घ्या या योजनेसाठी कोणत्या प्रवर्गासाठी किती निधी आला.

मित्रांनो तुम्ही बघू शकता या ठिकाणी एक जिल्हा एक उत्पादन या योजनेसाठी सर्वसाधारण प्रवर्ग, अनुसूचित जाती प्रवर्ग व अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी एकूण निधी २७,५७,७८,००० एवढ्या निधीच्या कार्यक्रमास खालील प्रमाणे प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे.

  • सर्वसाधारण प्रवर्ग         २२,३८,५५,१४६
  • अनुसूचित जाती प्रवर्ग    २,४६,८१,५५७
  • अनुसूचित जमाती प्रवर्ग   २,७२,४१,२९७
  • एकूण                  २७,५७,७८,०००

कोण आहेत पात्र या एक जिल्हा एक उत्पादन योजनेसाठी

या योजने संदर्भातील हा जी.आर संपूर्णपणे वाचून घ्या आणि या योजनेचा म्हणजेच प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेचा लाभ घ्या. योजनेचा लाभ घेण्यासाठी प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन करण्यात आलेलेल आहे आणि या संदर्भातील बातम्या विविध शासकीय वृत्तपत्रामध्ये प्रकाशित झालेल्या आहेत. या योजनेसाठी शेतकरी गट किंवा वैयक्तिक शेतकरी सुद्धा अर्ज करू शकतात. योजनेचा जी.आर.बघा.

एक जिल्हा एक उत्पादन जी.आर.

प्रधानमंत्री सुक्ष अन्न प्रक्रिया उद्योग योजनेचालाभ घेण्यासाठी लागणारी कागदपत्रे

  • आधार कार्ड
  • PAN कार्ड
  • मशीन/ साहीत्य कोटेशन/शेड इस्टीमेट, शीतगृह इस्टीमेट
  • बँक स्टेटमेंट 6 महिने मागील/ पासबुक झेरॉक्स
  • लायसन (FSSAI/pollution control)
  • बॅलन्स शीट मागील 3 वर्ष GST रिटर्न सहित
  • लोन स्टेटमेंट चालू/ मागील
  • शैक्षणिक पात्रता ( कमीत कमी ८ वर्ग)
  • लाईट बिल/ पाणी बिल/ लॅण्ड लाईन फोन बिल/ मतदान ओळख पत्र
  • जागेचे पत्र ( 8 अ  / 7/12 / भाडे करारनामा रजिस्टर)
  • प्रकल्प अहवाल
  • इतर आवश्यकतेनुसार कागदपत्रे

या योजना संदर्भातील संपूर्ण माहितीचे व्हिडीओज बघा

प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना म्हणजेच एक जिल्हा एक उत्पादन संदर्भात संपूर्ण माहितीचे दोन  व्हिडीओज बघा आणि जाणून घ्या या योजनेसंदर्भातील डीटेल्स माहिती. या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज कसा करावा, प्रकल्प अहवाल कसा आणि कोठून तयार करावा व या संदर्भातील इतर महत्वाच्या माहितीचे दोन व्हिडीओज डिजिटल डीजी या युट्युब चॅनलवर यापूर्वीच पब्लिश करण्यात आलेलेल आहेत. त्या व्हिडीओची लिंक खाली दिलेली आहे त्या लिंकवर क्लिक करून व्हिडीओ बघून घ्या. पहिला व्हिडीओ बघण्यासाठी येथे क्लिक करा. दुसरा व्हिडीओ बघण्यासाठी येथे क्लिक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *