सौर कृषी पंप योजना सर्वसाधारण गटाच्या लाभार्थ्यांना मिळणार लाभ.

सौर कृषी पंप योजना सर्वसाधारण गटाच्या लाभार्थ्यांना मिळणार लाभ.

मित्रांनो सौर कृषी पंप योजनेचा लाभ मिळवून घेण्यासाठी बरेच शेतकरी उत्सुक दिसत आहेत. लोड शेडींगमुळे गरजेच्या वेळी पिकांना पाणी देता येत नाही त्यामुळे शेतकऱ्यांची हि अडचण लक्षात घेवून शेतीला दिवसा पाणी देण्यासाठी मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना अंतर्गत शेतकर्यांना सौर कृषी पंप योजनेचा लाभ दिला जात आहे. ( पुढील लेख पण वाचा शेळी गट वाटप योजना या जिल्ह्यामध्ये सुरु जाणून घ्या कसा करावा अर्ज ) खालील व्हिडीओ पहा

या योजने अंतर्गत ७५ हजार नग वाटपाचे उद्दिष्ट.

पहिल्या टप्प्यात २५ हजार नग सौर कृषी पंप आस्थापित करण्यात आलेले आहेत. दुसऱ्या व तिसऱ्या एकत्रित टप्प्यात ७५ हजार नग सौर कृषीपंप आस्थापित केले जाणार आहेत. मित्रांनो या संदर्भातील जी. आर. म्हणजेच शासन निर्णय नुकताच दिनांक १२ जुलै २०२१ रोजी महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत वेबसाईटवर प्रकाशित करण्यात आलेला आहे.  सौर कृषी पंप योजना जी. आर. संदर्भात अधिक माहिती जाणून घेवूयात. ( हा लेख पण वाचा शेळी पालन व्यवसाय करण्यासाठी मिळणार कर्ज )

अनेक शेतकरी बांधव या योजनेसाठी उत्सुक.

मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजनेसाठी अनेक शेतकरी बांधवांनी अर्ज केलेले आहेत आणि काही करण्यास इच्छुक आहेत. सर्वसाधारण गटांच्या लाभार्थ्यांकारिता राज्यशासनाच्या अर्थसंकल्पीय अनुदानातून १० टक्के देण्यात येणार आहे. सौर कृषी पंप योजनासाठी सर्वसामान्य घटकाच्या लाभार्थ्यांना शासन हिश्यापोटी २०२१-२२ मध्ये अनुदान वितरीत करण्याबाबतचा शासन निर्णय नुकताच महाराष्ट्र शासनच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आला आहे. ( हा लेख पण वाचा शेळी गट वाटप लाभार्थी यादी पहा. )

आतापर्यंत सौर कृषी पंप योजना अंतर्गत 25000 सौर कृषी पंप स्थापित.

राज्यशासनाच्या मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजनेअंतर्गत टप्प्याटप्प्याने एक लक्ष सौर कृषी पंप स्थापित करण्याचे नियोजित आहे. पहिल्या टप्प्यात 25000 सौर कृषी पंप स्थापित करण्यात आले असून, दुसर्‍या व तिसर्‍या एकत्रित टप्प्यात 75 हजार नग सौर कृषी पंप स्थापित करण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आलेले आहे. सर्वसाधारण गटाच्या लाभार्थ्यांना राज्य शासनाच्या अर्थसंकल्पीय अनुदानातून दहा टक्के हिस्सा देण्यात येणार आहे. दहा टक्के लाभार्थी हिस्सा व उर्वरित 80 टक्के महावितरण कडील ॲक्रो खात्यात वाढीव वीज विक्रीतील करांमधून परस्पर जमा होणाऱ्या रकमेतून अदा करण्यात येणार आहे.

46 कोटी 54 लाख निधी वितरीत करण्याचा शासन निर्णय.

सौर कृषी पंप योजनेसाठी सर्वसाधारण गटाच्या लाभार्थ्याच्या हिश्यापोटी रुपये 46 कोटी 54 लाख रक्कम अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित प्रकाशगड मुंबई यांना वितरित करण्यास शासनाची मंजुरी देण्यात येत असून सदर निधी त्यांना उपलब्ध करून देण्यात येत आहे. या संदर्भातला शासन निर्णय नुकताच महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत वेबसाईटवर प्रकाशित करण्यात आलेला आहे.

सौर कृषी पंप योजना

विविध योजनेच्या माहितीसाठी आमच्याशी जोडा.

विविध शासकीय योजनासंदर्भातील ऑनलाईन अर्ज कसे भरावेत या माहितीसाठी डिजिटल डीजी युट्युब चॅनलला भेट द्या. शेतकरी अनुदान योजनेची माहिती लगेच तुमच्या मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या WhatsApp Group मध्ये सामील व्हा. आमच्या टेलिग्राम चॅनलला भेट द्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *