कलाकार मानधन योजना अर्ज pdf मध्ये उपलब्ध डाउनलोड करा

कलाकार मानधन योजना अर्ज pdf मध्ये उपलब्ध डाउनलोड करा

आजच्या लेखामध्ये कलाकार मानधन योजना आणि त्या संदर्भातील pdf अर्ज कसा सादर करावा या संदर्भात आपण माहिती घेणार आहोत. कलाकार मानधन योजना अर्ज डाउनलोड करण्यासाठी या लेखाच्या सर्वात शेवटी लिंक दिलेली आहे त्यावर क्लिक करून हा अर्ज pdf मध्ये तुम्ही डाउनलोड करू शकता. महाराष्ट्रातील ५६ हजार कलावंतांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मदत जाहीर केलेली आहे. लॉकडाऊनच्या काळामध्ये सांस्कृतिक क्षेत्राला खूप मोठा फटका बसला आहे. कोरोनाच्या काळात लॉकडाऊनमुळे काम नसल्याने राज्यातील कलावंताची आर्थिकस्थिती ढासळली होती याच बाबीचा विचार करून सांस्कृतिक संचालनालयाच्या प्रस्तावावर महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब यांनी राज्यातील ५६ हजार कलावंताना मदत जाहीर केलेली आहे. ( कलाकार योजनेचा अर्ज कसा सदर करावा लागतो या संदर्भातील माहिती जाणून घेण्यासाठी खालील व्हिडीओ पहा )

अनेकजण कलाकार मानधन योजनेपासून वंचित

मित्रांनो ग्रामीण भागातील कलावंताचा विचार जर केला तर बरेच कलाकार असे आहेत कि ज्यांनी अजूनही त्यांची नोंदणी केलेली नाही आणि त्यामुळे ते कलाकार मानधन योजना लाभापासून वंचित आहेत. तुम्ही जर कलाकार असाल आणि नोंदणी करू इच्छित असाल तर त्या संदर्भातील माहिती देखील या या ठिकाणी घेणार आहोत. शिवाय या योजनेचा लाभ घेण्यासाठी कोणकोणती कागदपत्रे लागणार आहेत कोणत्या व्यक्ती पात्र आहेत अर्ज कोठून घ्यायचा, कोठे सादर करायचा या विषयी सविस्तर माहिती या ठिकाणी जाणून घेणार आहोत.

कलाकार नोंदणी ऑनलाईन सुरु करण्याची शक्यता

राज्यातील कलाकारांची नोंदणी जिल्हास्तरावर करण्यात येत असली तरी देखील सांस्कृतिक कार्य संचालनालयाने ऑनलाईन कलाकार नोंदणी कशी सुरु करता येईल याबाबत प्रयत्न करावेत अशा सूचना सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांनी कलाकारांच्या झालेल्या बैठकीत दिली आहे. कलाकार मानधन योजना महाराष्ट्र योजनेसाठी समाज कल्याण कार्यालयात भेट देऊन सविस्तर माहिती घ्या.

कलाकार मानधन योजना

कलाकार मानधन योजनेसाठी लागणारी कागदपत्रे

  • रेशनिंग कार्ड झेरॉक्स
  • आधार कार्ड
  • शाळा सोडल्याचा दाखला
  • रहिवासी दाखला
  • बँक पासबुक
  • पति पत्नीचा फोटो जर पत्नी नसेल तर स्वःताचा फोटो
  • तहसीलदार.उत्पन्नाचा दाखला (उत्पन्न 40.000/- च्या आत)
  • कलेचा प्रकार उदा.किर्तनकार,प्रवचन,भजणी, भारुड, लोकगीत,वादक,गायक
  • सन 2010 च्या आतील कलेचे पुरावे.उदा.कार्यक्रम पत्रिका,पुरस्कार चिन्ह,सत्काराचे फोटो इ.
  • शिफारस पत्र
  • सरकारी लाभ मिळत नसल्याचे नोटिस 100/- रु.च्या स्टॅम्प पेपरवर लेखी.    
  • वयाची अट किमान 50 वर्षे
  • सर्व कागदपत्रांच्या प्रत्येकी 3 छायांकित सत्यप्रत असावी.
  • पंचायत समिती समाज कल्याण खाते या विभागात कागद पत्रांची पूर्तता करून पोच घ्यावी

कलाकार मानधन योजनेचा अर्ज कसा सदर करावा लागतो ते बघा.

कलाकार मानधन योजनेचा अर्ज डाउनलोड करण्यासाठी खालील बटनावर क्लिक करा. सध्यातरी हि प्रोसेस ऑफलाईन आहे परंतु लवकरच या योजनेसाठी ऑनलाईन नोंदणी सुरु होऊ शकते.  कलाकार मानधन योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज कसा भरावा लागतो हे जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा. मित्रांनो खाली जो अर्ज दिलेला आहे त्या अर्जामधील काही फॉर्म्स सर्वांसाठी लागू आहेत. हा अर्ज भोकरदन पंचायत समितीसाठीचा आहे परंतु तुम्ही इतर तालुक्यातील असाल तर तुम्हाला कळेल कि हा अर्ज कसा असतो. काही बाबी जसे कि जिल्हा आणि तालुका एडीट करून तुम्ही हा संपूर्ण अर्ज तुमच्या तालुक्यासाठी वापरू शकता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *