जाणून घ्या कि तुमच्या मोबाईल e shram card download कसे करावे. खाली दिलेल्या पद्धतीचा अवलंब करून तुम्ही तुमचे e shram card registration करू शकता व ते डाउनलोडहि करू शकता.
तुम्ही जर गवंडी कामगार असाल, मिस्त्री असाल, घरकाम करत असाल, गाडीचे चालक असाल किंवा तुम्ही कोणतेही श्रमाचे काम करत असाल तर तुम्हाला ई श्रम कार्ड विषयी जाणून घेणे महत्वाचे आहे. ई श्रम कार्ड तुमच्या मोबाईलवर कशा प्रकारे डाउनलोड करू शकता या संदर्भातील खालील व्हिडीओ पहा.
सविस्तर माहितीचा खालील व्हिडीओ पहा
e shram card registration करण्याची पद्धत जाणून घ्या.
- तुमच्या मोबाईलमधील वेबब्राउजरच्या सर्च बार मध्ये ई श्रम पोर्टल असे टाईप करा किंवा https://register.eshram.gov.in/#/user/self हा वेब adress टाका किंवा येथे क्लिक करा.
- register.eshram.gov.in हि वेबसाईट ओपन झाल्यावर वेबसाईटला थोडे खाली स्क्रोल करा.
- नोंदणी करण्यासाठी कोणकोणत्या बाबी या ठिकाणी तुम्हाला लागणार आहेत त्या विषयी या वेबसाईटवर माहिती दिलेली असेल ती वाचून घ्या.
- self registration असा एक पर्याय तुम्हाला या ई श्रम वेबसाईटवर दिसेल त्या खाली तुमच्या आधारशी लिंक असलेला मोबाईल नंबर टाईप करा.
- कॅपचा कोड टाका.
- epfo आणि esic नसल्याच्या पर्यायाला टच करून सिलेक्ट करा.
- sent otp या बटनाला टच करा.
- तुमच्या नोंदणीकृत मोबाईलवर आलेला otp दिलेल्या चौकटीत टाका.
- आणि सबमिट या बटनाला टच करा.
- सबमिट केल्यानंतर आधार नंबर टाका आणि नियम व अट स्वीकारून सादर करा म्हणजेच सबमिट या बटनाला टच करा.
- जसेही सबमिट या बटनाला तुमची टच कराल त्यावेळी तुमच्या आधार कार्डशी लिंक असलेल्या मोबाईल नंबरवर एक otp येईल तो दिलेल्या चौकटीत टाका आणि validate या बटनाला टच करा.
- otp validate करताच तुम्ही ekyc दिसेल त्या खाली continue to other details असा पर्याय दिसेल त्या पर्यायाला टच करा.
ई श्रम कार्ड संदर्भातील इतर माहिती भरा.
- वयैक्तिक माहिती.
- शैक्षणिक माहिती.
- कौशल्य आणि हुद्दा.
- बँकेचे तपशील.
- भरलेल्या अर्जाची उजळणी करा. (preview of form)
- e shram card डाउनलोड करा.
- ई श्रम कार्डवर चूक असेल तर ती दुरुस्त करा.
e shram card download संदर्भातील संपूर्ण माहितीचा व्हिडीओ बघा.
e shram card तुमच्या मोबाईलमध्ये कसे डाउनलोड करावे या संदर्भातील परिपूर्ण माहितीचा व्हिडीओ बघा आणि त्याप्रमाणे कृती करा. हा व्हिडीओ बघून तुम्ही तुमचे e shram card सहज तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड करू शकता. व्हिडीओ बघण्यासाठी येथे क्लिक करा.