पुरा मध्ये बस वाहून गेली बचाव कार्य सुरु एवढ्या व्यक्तींचा लागला शोध

पुरा मध्ये बस वाहून गेली बचाव कार्य सुरु एवढ्या व्यक्तींचा लागला शोध

पुरा मध्ये बस वाहून गेली त्यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. सध्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जोरदार पाऊस सुरु असून अनेक दुर्घटना घडल्याच्या बातम्या बघावयास मिळत आहेत. यवतमाळ जिल्ह्यातील दहेगावजवळ उमरखेडहून पुसदला जाणारी बस वाहून गेल्याचे एका चित्रफितीत दिसले होते. बस वाहत जात असतांना या बसमध्ये बस चालक व कंडक्टरसह एकूण सात व्यक्ती होत्या. त्यापैकी एकाचा मृत्यू झालेला असून तिघांना वाचविण्यात बचाव पथकांना यश आलेले आहे आणि तिघांचा शोध अध्याप सुरूच आहे.

WhatsApp Group मध्ये सामील व्हा आणि मोफत माहिती मिळवा.

पुरा मध्ये बस वाहून गेली या घटनेतून धडा घ्या.

मित्रांनो सध्या खूप मोठ्या प्रमाणात पाऊस सुरु असल्यामुळे नदी नाल्यांना पूर आलेला आहे. तुम्हाला कितीही काम असले तरी पुलावरून पाणी वाहत असेल तर अशा वेळी पूल ओलांडून जाऊ नका. कितीही घाई असली तरी जीवन हे एकदाच मिळते त्यामुळे कितीही अर्जंट काम असले तरी देखील असे धोके पत्करू नका. यवतमाळ जिल्ह्यातील दहेगावजवळ उमरखेडहून पुसदला जाणारी बस पुरा मध्ये वाहून गेल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. या घटनेचा आपण धडा घ्यायला हवा.

पुरा मध्ये बस वाहून गेली

दुचाकी किंवा चारचाकी पुराच्या पाण्यामध्ये घालू नका.

तुम्ही दुचाकीवर असाल किंवा चारचाकीमध्ये असाल अशा वेळी जर प्रवासामध्ये तुम्हाला एखादी नदी आडवी लागली असेल आणि त्या पुलावरून पाणी वाहत असेल तर अशावेळी त्या पुलावरून किंवा त्या नदीच्या पत्रातून जाण्याचा प्रयत्न करू नका. दुचाकी किंवा चारचाकी अशा पुलावरून किंवा पात्रातून पुढे नेण्याचा प्रयत्न केला तर पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्यामुळे दुर्दैवी घटना घडू शकते. त्यामुळे असे धोके न पत्करलेले बरे.

पूरपरिस्थिती निर्माण झाली तर खालील खालील नियमांचे पालन करा.

  • पूरपरिस्थितीच्या माहितीसाठी रेडीओ किंवा टीव्ही ऐका परिस्थितीवर सतत लक्ष ठेवून राहा.
  • पूर परिस्थितीमध्ये उंचावर जावून थांबणे कधीही फायद्याचे ठरू शकते.
  • इलेक्ट्रॉनिक उपकरणांचे मुख्य बटने बंद करा. पाण्यात असाल किंवा ओले झालेले असाल तर विद्युत उपकरणांना स्पर्श करू नका.
  • वाहत्या पाण्यात चालू नका तुमचा तोल जाऊ शकतो.
  • जर तुमची गाडी पाण्याखाली गेलेली असेल तर ती तशीच राहू द्या मात्र तुम्ही सुरक्षित स्थळी धाव घ्या.
  • आपात्कालीन किट सोबत ठेवा
  • तुम्ही कोठे आहात हे तुमच्या मित्रांना आणि कुटुंबाला कळवा
  • शासकीय सूचनांचे पालन करा.
  • अफवा ऐकू नका आणि पसरवू नका.

विविध योजनेच्या माहितीसाठी डिजिटल डीजी युट्युब चॅनलला भेट द्या. सर्व शासकीय योजनांची माहिती तुमच्या मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या teligram group मध्ये जॉईन व्हा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *