पिक नुकसान भरपाई GR आला एवढे मिळणार प्रती हेक्टरी अनुदान.

पिक नुकसान भरपाई GR आला एवढे मिळणार प्रती हेक्टरी अनुदान.

आनंदाची बातमी वाढीव दराने नवीन पिक नुकसान भरपाई GR आला. जून ते ऑक्टोबर २०२१ या कालावधीमध्ये महाराष्ट्रातील अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांचे अतिवृष्टी व पुरामुळे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. जून ते ऑक्टोबर या महिन्यामध्ये अतिवृष्टीमुळे नदी व नाल्यांना खूप मोठा पूर आलेला होता. या पुराचे पाणी अगदी शेतामध्ये जाणून पूर्णच्या पूर्ण शेत वाहून गेल्याच्या अनेक बातम्या त्यावेळी बघावयास मिळाल्या होत्या. ( पिक नुकसान भरपाईचा व्हिडीओ बघण्यासाठी येथे टच करा.)

हे पण वाचा पिक नुकसान भरपाईसाठी १० हजार कोटीची घोषणा

तुमच्या मोबाईलवर पिक नुकसान भरपाई GR म्हणजेच शासन निर्णय बघा.

जून ते ऑक्टोबर २०२१ या कालावधी शेतकऱ्यांच्या पिकांचे अतिवृष्टी व पुरामुळे झालेल्या पिक नुकसान मदत मिळणार आहे आणि या संदर्भातील जी. आर. म्हणजेच शासन निर्णय देखील प्रकाशित करण्यात आलेला आहे. जून ते ऑक्टोबर २०२१ पर्यंत महाराष्ट्र राज्यातील विविध जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीमुळे तसेच पुरामुळे झालेल्या शेत पिकांच्या नुकसानीसाठी बाधित शेतकऱ्यांना वाढीव दराने मदत देण्याबाबतचा शासन निर्णय नुकताच म्हणजेच दिनांक २१ ऑक्टोबर २०२१ रोजी महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत वेबसाईटवर प्रकाशित करण्यात आलेला आहे.

सर्व शासकीय योजनांची माहिती मिळवा अगदी तुमच्या मोबाईलवर. आमच्या whatsapp group मध्ये सहभागी व्हा.

पिक नुकसान भरपाई GR संदर्भातील संपूर्ण माहिती जाणून घ्या.

हा शासन निर्णय कसा आहे, नेमकी किती मदत शेतकऱ्यांना मिळणार आहे. बागायत पिकांच्या नुकसानीसाठी किती निधी मिळणार आहे तर जिरायत पिकांच्या झालेल्या नुकसानीसाठी किती निधी मिळणार आहे या संदर्भातील संपूर्ण माहिती अगदी तपशीलवारपणे आपण लेखामध्ये बघणार आहोत.

टेलीग्राम ग्रुपमध्ये मोफत जॉईन व्हा आणि शासकीय योजनासंदर्भात अपडेट मिळवा.

पिक नुकसान भरपाई GR नुसार खालील प्रमाणे मिळणार अनुदान

अ.क्र.तपशीलSDRF प्रचलित दरवाढीव दर.
जिरायत पिक.६८०० रुपये प्रती हेक्टर २ हेक्टर मर्यादा.१०००० रुपये प्रती हेक्टर २ हेक्टर मर्यादा.
बागायत पिक.१३५०० रुपये प्रती हेक्टर २ हेक्टर मर्यादा.१५००० रुपये प्रती हेक्टर २ हेक्टर मर्यादा.
बहुवार्षिक पिक.१८००० रुपये प्रती हेक्टर २ हेक्टर मर्यादा.२५ ००० रुपये प्रती हेक्टर २ हेक्टर मर्यादा.

आमच्या फेसबुक ग्रुपची लिंक

लाभार्थ्यांच्या याद्या लागणार जिल्ह्याच्या वेबसाईटवर

जे शेतकरी पिक नुकसान भरपाईसाठी पात्र आहेत त्यांच्या याद्या प्रत्येक जिल्ह्याच्या वेबसाईटवर प्रकाशित करण्यात येणार आहेत. तसेच लाभार्थ्यांची यादी व मदतीचा तपशील केंद्र शासनाच्या ndmis.mha.gov.in या वेबसाईटवर देखील बघता येणार आहेत. त्यामुळे जर तुम्ही पिक नुकसान भरपाईसाठी पात्र असाल तर नक्की या वेबसाईटवर तुमचे नाव चेक करा.

पिक नुकसान भरपाई GR

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *