पिक विमा नुकसान भरपाई मिळणार का? जाणून घ्या  गौडबंगाल

पिक विमा नुकसान भरपाई मिळणार का? जाणून घ्या गौडबंगाल

खरचं कधी मिळणार हि पिक विमा नुकसान भरपाई. जाणून घेवूयात तपशीलवार माहिती. शेतकरी बंधुंनो शासनाच्या धोरणानुसार पिक विमा दिवाळीच्या मागे किंवा पुढे मिळेल असे वाटत होते परंतु आता हि बातमी वाचल्यानंतर मनामध्ये शंका निर्माण होत आहे कि खरच पिक विमा दिवाळी पर्यंत शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे किंवा नाही? ( या संदर्भातील व्हिडीओ बघण्यासाठी येथे क्लिक करा.

पिक नुकसान भरपाई किती GR बघा.

काय आहे सत्य पिक विमा नुकसान भरपाई २०२१ संदर्भात जाणून घ्या.

शेतकरी बांधव आज अगदी हलाकीच्या परिस्थितीमध्ये जीवन जगत आहे. एकतर शेतकऱ्यांचे पिकच मोठ्या अडचणीनांचा सामना करून अर्ध्यापर्यंत हाती येते. अर्धे’ पिक जरी हातामध्ये आले तरी एकमेव शेतकरीच असा आहे जो अर्धे पिक हातामध्ये आले तरी खुश होतात. शेतकऱ्यांच्या पिकाला योग्य भाव मिळाल्यास कुठेतरी न्याय मिळाला आहे अशी एक भावना निर्माण होऊ शकते परंतु केवळ महाराष्ट्रामध्येच नव्हे तर संपूर्ण भारतामध्ये शेतकऱ्यांच्या मालाला अजूनही योग्य भाव मिळत नाही.

शासकीय योजनांची माहिती मिळविण्यासाठी whatsapp group ची लिंक

पिक विमा नुकसान भरपाई लवकर मिळण्याच्या आशेवर शेतकरी.

मोठ्या मुश्किलीने शेतामध्ये पिकविलेले पिक हाती येईल कि नाही याची शेतकऱ्यांना शास्वती नसते त्यामुळे ते आपल्या पिकांचा विमा काढत असतात. जर नैसर्गिक कारणामुळे किंवा इतर कोणत्याही कारणामुळे शेतातील पिकांचे नुकसान झाले तर आपल्या शेतातील पेरलेल्या पिकांचा पिकविमा मिळून नुकसानभरपाई मिळू शकेल अशा आशेवर शेतकरी बांधव असतात. परंतु बऱ्याच वेळेस नुकसानभरपाई मिळण्यास शेतकऱ्यास विलंब होतो.

फेसबुक ग्रुप लिंक

नुकसान भरपाई भ्रमाचा भोपळा ठरू नये.

शेतकरी बांधवांच्या शेतातील पिकांचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. अनेक शेतकरी बांधवानी त्यांच्या शेतातील पेरल्याला पिकांचा पिक विमा सुद्धा काढलेला आहे. मित्रांनो शेतकरी जरी त्यांच्या शेतातील नुकसानग्रस्त पिकांच्या मोबदल्यात नुकसान भरपाईची आतुरतेने वाट बघत असेल तर अशा वेळी शेतकरी बांधवांची निराशा होऊ शकते.

पिक विमा नुकसान भरपाई

आमचे युट्युब चॅनल

शेतकऱ्यांची दिवाळी गोड होईल का हाच मोठा प्रश्न ?

अनेक शेतकरी बांधव पिक विमा मिळण्याचे आतुरतेने वाट बघत आहे. परंतु ज्या कंपनीकडे पिक विमा काढलेला आहे ती कंपनीच पिक विमा देण्याच्या मानसिकतेत नसल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. एका दैनिकामध्ये प्रकाशित झालेल्या वृत्तानुसार ज्या पिक विमा कंपनीकडे पिक विमा भरलेला आहे ती कंपनीच नुकसान भरपाईची केंद्राकडे मागणी करण्यास तयार नसल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.

टेलिग्राम ग्रुपची लिंक

अनेक शेतकऱ्यांनी दखल केल्या पूर्वसूचना

१६ जिल्ह्यातील अंदाजे ४.९४ लक्ष शेतकऱ्यांना २२४ कोटी वाटप करणे अपेक्षित असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. स्थानिक नैसर्गिक आपत्ती व मध्य हंगाम प्रतिकूल परीस्थिती अंतर्गत पात्र शेतकऱ्यांना पिक नुकसान वाटप करायचे असल्यास पिक विमाहप्ता अनुदानाचा पहिला हिस्सा केंद्र व राज्य शासनाने देणे बंधनकारक आहे.

नुकसान भरपाई मिळणार लवकरच जाणून घ्या कधी.

नुकसान भरपाई निधीसाठी मागणी करणे आवश्यक.

कृषी विभागाने ९७३ कोटीचा पहिला हप्ता कंपन्यांना दिलेला असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. यानंतर विमा कंपन्यांनी केंद्र शासनाकडे अनुदान हिश्या पोटी मागणी करणे गरजेचे असते. परंतु केंद्राने पैसे दिल्यानंतर ते शेतकऱ्यांना नुकसान भरपाई पोटी वाटावे लागेल या कारणाने बऱ्याच कंपन्यांनी अद्यापही केंद्र शासनाकडे पिक नुकसान भरपाई निधीसाठी मागणी केली नसल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. त्यामुळे पिक विमा कधी मिळणार हे सध्या तरी सांगणे शक्य नाही.

बियाणे अनुदान परमिट काय असते ते जाणून घ्या.

शेतकऱ्यांना लवकर पिक विमा मिळाल्यास शेतकऱ्यांची दिवाळी होणार गोड.

शेतकरी बंधुनो हे गौडबंगाल कधी संपेल हे सांगता येत नाही. कंपन्या आणि शासन यांच्यातील मतभेद किंवा वादविवाद केंव्हा संपतील हे सागता येणार नाही परंतु नुकसान भरपाईची अगदी चातकाप्रमाणे वाट बघणाऱ्या शेतकऱ्यांच्या हाती मात्र निराशाच लागणार आहे एवडे मात्र नक्की. त्यामुळे तुम्ही जर नुकसान भरपाई दिवाळी किंवा दिवाळीच्या आसपास मिळणार असल्याची आस लावून बसलेले असाल तर मात्र तुमची निराशा होऊ शकते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *