मातोश्री ग्राम समृद्धी शेत पाणंद रस्ते योजना शेतात जायला मिळणार रस्ता

मातोश्री ग्राम समृद्धी शेत पाणंद रस्ते योजना शेतात जायला मिळणार रस्ता

चांगली बातमी, मातोश्री ग्राम समृद्धी शेत पाणंद रस्ते योजना matoshri gram samridhi shet panand rasta yojana लवकरच सुरु होत आहे. मातोश्री शेत रस्ते योजना ही योजना महात्मा गांधी रोजगार हमी योजनेतून राबविण्यात येणार आहे. या योजनेसंदर्भातील व्हिडीओ बघण्यासाठी येथे टच करा.

अनुदानावर मिळणार ट्रॅक्टर जाणून घ्या कसा करावा अर्ज

शेतकऱ्यांसाठी लाभदायी ठरणार मातोश्री ग्राम समृद्धी शेत पाणंद रस्ते योजना.

शेतकऱ्याला शेतीमध्ये जाण्यासाठी रस्ता असणे खूपच महत्वाचे असते. शेतीसाठी रस्ता नसेल तर शेतातील पिकांना योग्य वेळी बाजारात नेण्यास अडचण निर्माण होते. परिणामी बाजारभाव कमी मिळाल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. त्यामुळे मातोश्री ग्राम समृद्धी शेत पाणंद रस्ते योजना matoshri gram samridhi shet panand rasta yojana शेतकऱ्यांसाठी खूप मदतीची ठरणार आहे.

पिक नुकसान भरपाई मिळेल का जाणून घ्या काय आहे सत्य

मातोश्री ग्राम समृद्धी शेत पाणंद रस्ते योजनेमुळे योग्य वेळी माल मार्केटमध्ये जावू शकेल.

पिक चांगले येण्यासाठी शेतामध्ये जेवढी मेहनत करणे करणे महत्वाचे तेवढेच महत्वाचे किंबहुना त्याहीपेक्षा महत्वाचे असते हाती आलेल्या पिकला योग्य बाजारभाव मिळणे त्यामुळेच मातोश्री ग्राम समृद्धी शेत, पाणंद रस्ते योजना शेतकऱ्यांसाठी खूप लाभदायी ठरणार आहे.

कशी आहे शेतकरी कर्ज मित्र योजना जाणून घ्या.

योजना नियोजनबद्ध राबविणे गरजेची

ग्रामीण भागातील अनेक शेतकरी बांधवाना त्यांच्या शेतामध्ये जाण्यासाठी रस्ता नसतो. रस्ता असला तरी तो व्यवस्थित नसतो. अनेक संकटांचा सामना करून हाती आलेल्या मालास योग्य बाजारभाव मिळविण्यासाठी योग्य वेळी सदरील माल बाजारामध्ये पोहचविणे खूप महत्वाचे असते. त्यामुळे शेतीसाठी रस्ता खूपच महत्वाचा आहे ह्याच बाबीचे महत्व अधोरेखित करून मातोश्री शेत रस्ता योजना सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये सामील व्हा

शेत-पाणंद रस्त्यांची मोठ्या प्रमाणावर गरज.

महाराष्ट्रामध्ये शेत-पाणंद रस्त्यांची मोठ्या प्रमाणावर गरज आहे. पावसाळ्यातील पीके आर्थिकदृष्ट्या फायदेशीर असली तरी केवळ रस्ता नसल्यामुळे अशी पिके पिकविण्याचा विचार शेतकरी बांधव करत नाहीत. शेतात जाण्यासाठी पाणंद रस्ते नसल्यामुळे शेतकऱ्यांना विविध पीके घेण्यात मोठा अडथळा निर्माण होतो आणि म्हणूनच शेतकऱ्यांना त्यांच्या शेतात मालवाहतुकीसाठी किंवा इतर कारणासाठी जाण्यायेण्यासाठी शेत-पाणंद रस्ता निर्माण करण्याचा निर्णय मंत्री मंडळ बैठकीमध्ये घेण्यात आलेला आहे.

मातोश्री ग्राम समृद्धी शेत पाणंद रस्ते योजना

शेतकरी योजना Whatsapp Group link

मातोश्री ग्राम समृद्धी नावाने शेत पाणंद रस्ते योजना राबविली जाणार.

दिनांक २७ ऑक्टोबर २०२१ रोजी झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीमध्ये मातोश्री शेत रस्ते योजनेमुळे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये राबविली जाणार आहे. या योजने अंतर्गत २ लक्ष कि.मी. अंतराचे रस्ते बांधले जाणार आहेत. “मी समृध्द तर गाव समृध्द” आणि “गाव समृध्द तर माझा महाराष्ट्र समृध्द” ही संकल्पना मनरेगा व राज्य रोहयोच्या माध्यमातून राबविण्यात येत आहे.

टेलिग्राम ग्रुपमध्ये सामील व्हा आणि शेती संबधित योजनांची माहिती मिळवा अगदी मोफत

मातोश्री शेत योजनेचे उद्दिष्ट

  • रोजगार हमी योजने अंतर्गत जो व्यक्ती काम मागेल त्याला अकुशल रोजगार उपलब्ध करुन देणे
  • ग्रामीण भागामध्ये सामूहिक मूलभूत सुविधा निर्माण करणे.
  • मातोश्री शेत योजनेमुळे सर्व शेतांपर्यत योग्य गुणवत्तेचे बारमाही वापरता येतील असे शेत रस्ते, पाणंद तयार करणे.
  • प्रत्येक गावात सरासरी 5 किलोमीटर्सपर्यंत शेत पाणंद रस्ता निर्माण करणे.
  • महाराष्ट्र राज्यात 2 लाख किलोमीटर्सचे रस्ते बांधण्याचे उद्दिष्ट.

मातोश्री शेत रस्ते योजना विषयी थोडक्यात माहिती.

योजनेचे नावमातोश्री ग्राम समृद्धी शेत पाणंद रस्ते योजना
मंत्री मंडळ निर्णय दिनांक२७ ऑक्टोबर २०२१
योजनेचा प्रामुख्याने लाभ कोणाला मिळणारशेतकरी
योजनेचा उद्देशशेतातील उत्पादित माल बाजारपेठेत नेण्यासाठी शेतकऱ्यांना सुविधा मिळणे माहितीचा अधिकृत स्त्रोत महासंवाद वेबसाईट

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *