शेतकरी बंधुंनो अतिवृष्टी नुकसान भरपाई निधी आलेला आहे. मागील महिन्यामध्ये म्हणजेच ऑगस्ट ते सप्टेंबर २०२१ महाराष्ट्र राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी आणि पूरपरिस्थितीमुळे झालेल्या नुकसानीपोटी शेतकऱ्यांना निधी वितरीत करण्याबाबत शासन निर्णय प्रकाशित करण्यात आलेला आहे. विभागीय आयुक्त अमरावती, पुणे व जिल्हाधिकारी नाशिक जळगाव व गोंदिया या जिल्ह्यांसाठी हा निधी वितरणाचा हा शासन निर्णय काढण्यात आलेला आहे. या संदर्भातील व्हिडीओ बघण्यासाठी येथे टच करा.
एकूण निधीच्या ७५ टक्के अतिवृष्टी नुकसान भरपाई मिळणार.
ऑगस्ट ते सप्टेंबर २०२१ या कालावधी दरम्यान महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात गारपिट व पूरपरिस्थिती उद्भवली होती. यासाठी एकूण निधीच्या ७५ टक्के अतिवृष्टी नुकसान भरपाई मिळणार आहे. यामध्ये शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीची नुकसान भरपाई लवकरच शेतकऱ्यांना दिली जाईल असा शासन निर्णय काही दिवसापूर्वी आला होता. त्याच संदर्भात ७५ टक्के एवढ्या नुकसान भरपाईचा निधी शेतकऱ्यांना देण्यात यावा या संदर्भातील शासन निर्णय नुकताच महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत वेबसाईटवर प्रकाशित करण्यात आलेला आहे.
राज्य अप्पती प्रतिसाद निधी व राज्य शासनाच्या निधीमधून मिळणार अतिवृष्टी नुकसान भरपाई
राज्य अप्पती प्रतिसाद निधी व राज्य शासनाच्या निधीमधून ऑगस्ट ते सप्टेंबर २०२१ या कालावधीमध्ये शेतकऱ्यांच्या झालेल्या पिकांच्या नुकसानीसाठी शेतकरी बांधवाना मदत देण्याकरिता एकूण निधीच्या ७५ टक्के निधी म्हणजेच ७७४१५.४३ लक्ष विभागीय आयुक्त यांच्या मार्फत संबधित जिल्ह्यांना वितरीत करण्यास शासनाने मंजुरी दिलेली आहे.
शेतकऱ्यांना मिळणार अगदी सहजतेने कर्ज, कृषी कर्ज मित्र योजना बद्दल जाणून घ्या.
अतिवृष्टी नुकसान भरपाई संदर्भातील जी. आर. बघा.
शेतकरी बंधुंनो, ऑगस्ट ते सप्टेंबर २०२१ या कालावधीमध्ये अतिवृष्टी आणि पूरपरिस्थितीमुळे झालेल्या नुकसानीपोटी शेतकऱ्यांच्या खात्यात हा निधी लवकरच जमा होणार आहे. तुम्हाला जर जाणून घ्यायचे असेल कि कोणत्या जिल्ह्यासाठी किती निधी आलेला आहे तर खाली दिलेल्या जी.आर. डाउनलोड करा या बटनावर क्लिक करा आणि हा नुकसान भरपाईचा हा शासन निर्णय डाउनलोड करून घ्या.
शेतकऱ्यांची दिवाळी होणार गोड.
अतिवृष्टी आणि पूरपरिस्थितीमुळे झालेल्या नुकसानीपोटी हा निधी मिळणार आहे त्यामुळे शेतकरी बांधवांची दिवाळी गोड होणार आहे यात शंका नाही. शेती करत असताना शेतकरी बांधवांना अनेक संकटाचा सामना करावा लागत आहे त्यातच अतिवृष्टी व गारपीटमुळे झालेल्या नुकसानीमुळे शेतकरी बांधवांचा शेतातील पिकांचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते त्यामुळे शासनाची हि जी मदत शेतकरी बांधवाना मिळणार आहे त्यामुळे शेतकरी बांधवांची दिवाळी नक्कीच गोड होईल अशी आशा करूयात.
पिक नुकसान भरपाई पोटी शेतकऱ्यांना किती निधी मिळणार जाणून घ्या.
विविध शासकीय योजनांच्या मोफत माहितीसाठी आमच्या ग्रुपमध्ये सामील व्हा.
शेती संबधित शासनाच्या विविध योजना सुरु असतात परंतु शेतकऱ्यांना या योजनांची माहिती नसण्याची शकता नसते. विविध शासकीय योजनाची मोफत माहिती तुमच्या मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या Whatsapp Group मध्ये सहभागी व्हा. शेतकरी योजनांच्या माहिती तुमची आमच्या टेलीग्राम ग्रुप वरून देखील मिळवू शकता. टेलिग्राम ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी येथे क्लिक करा.
विविध शासकीय योजनाचे अर्ज कसे सादर करावे लगते ते जाणून घ्या.
शेतकरी बंधुंनो शेतकऱ्यांसाठी विविध शासकीय योजना सुरु असतात. या योजनांचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन किंवा ऑफलाईन अर्ज सादर करावे लागतात. तुम्हाला जर माहित नसेल कि शासकीय योजनाचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन किंवा ऑफलाईन अर्ज कसा सादर करावे लागतात तर त्या संदर्भातील अनेक व्हिडीओज आमच्या डिजिटल डीजी युट्युब चॅनलवर बनविलेले आहेत. ते व्हिडीओज बघून तुम्ही शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी तुमचा अर्ज करू शकता. आमच्या युट्युब चॅनलला भेट देण्यासाठी येथे टच करा.
या लेखाचा सारांश
- दिवाळीच्या आसपास अतिवृष्टी नुकसान भरपाई निधी मिळणार,
- या संदर्भातील जी. आर बघा.
- जाणून घ्या कोणत्या जिल्ह्यासाठी किती निधी आला.
- कशा पद्धतीने केले जाणार निधीचे वितरण.