सध्या कापसाला प्रचंड भाव मिळत आहे. तुमच्या शेतात जर कापूस असेल तर नक्कीच व्हिडीओ तुमच्यासाठी चांगली वार्ता ठरणार आहे. कापसाला या वर्षी विक्रमी दर मिळेल अशी अशा आहे. बऱ्याच वर्षापासून कापसाला योग्य भाव मिळत नव्हता परंतु आता कापसाला प्रचंड भाव मिळेल अशी शक्यता वाटत आहे. हे कापसाचे दर का वाढणार आहेत. किती दारापर्यंत कापूस जावू शकेल हि आणि इतर महत्वाची माहिती आपण बघणार आहोत. मित्रांनो पुढील परिस्थिती काहीही असेल पण सध्या मात्र कापसाचे दर दिवसेंदिवस वाढत आहेत एवढे मात्र नक्की. या संदर्भातील व्हिडीओ बघण्यासाठी येथे टच करा.
कापूस हे मुख्य पिक त्यामुळे कापसाला प्रचंड भाव मिळणे गरजेचे.
शेती करत असतांना अनेक संकटांचा सामना शेतकरी बांधवाना करावा लागतो. शेतीसाठी लागणारे बियाणे, वाढलेले खतांचे दर, महागडी औषधी यामुळे शेतीचा खर्च प्रचंड प्रमाणात वाढतो. एवढा खर्च करूनही नैसर्गिक संकटातून पिक वाचलेच तर त्याला योग्य भाव मिळत नाही परिणामी शेती तोट्यात येते. महाराष्ट्रातील असंख्य शेतकऱ्यांचे मुख्य पिक आजही कापूस आहे त्यामुळे जर तुम्ही देखील कापसाचे पिक तुमच्या शेतात लावले असेल तर नक्कीच हि तुमच्यासाठी आनंदाची बातमी ठरणार आहे कारण कापसाला चांगला भाव मिळण्याची शक्यता आहे.
यामुळे मिळेल कापसाला प्रचंड भाव.
ट्रेडर्स बॉडी कॉटन एसोसिएशन ऑफ इंडिया यांना सूट गिरणी यांच्याकडून प्रचंड प्रमाणत कापसाची मांगणी होत आहे. भारतासह अमेरिका ब्राझील आणि पाकिस्तान या प्रमुख कापूस उत्पादक देशामध्ये मोठ्या प्रमाणात घाट आलेली आहे. त्यामुळे कापसाची मोठ्या प्रमाणात कापसाची मांगणी होत आहे. सीएआईच्या मातानुसार या वर्षी ५ लाख गाठी ऐवजी ७७ लक्ष गाठी निर्यात होऊ शकेल त्यामुळे कापसाचे दर आणखी वाढतील यात शंका नाही.
कापसाचे भाव वाढण्याची करणे
- भारतामध्ये कपाशीच्या उत्पादनात मोठी घट
- ब्राझील, पाकिस्तान व अमेरिकेत कापसाच्या उत्पादनात मोठी घट.
- खाद्य तेलाच्या तेजीमुळे सरकीला मांगणी त्यामुळे कापसाचे भाव आणखी वाढणार.
- चीनकडून कापसाची मोठ्या प्रमाणात आयात.
- आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाला तेजी.
कोणत्याही मालाचे दर कमी जास्त होऊ शकतात.
अशा पद्धतीने कापसाला चांगला भाव मिळण्याची शक्यता असू शकते. घरात किंवा गोडावूनमध्ये साठविलेला कापूस कधी विकायचा हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. ज्या प्रमाणे सोयाबीनचे भाव एकदम कमी झाले त्याचप्रमाणे कापसाचे भाव देखील कमी होऊ शकतात. हा धोका लक्षात घेवून शेतकरी बांधवांनी आपल्या घरातील किंवा गोडवून मधील कापूस बाजारात विक्रीसाठी न्यावा.