शेतकरी बंधुंनो तुम्हाला माहितच असेल कि पीएम किसान सन्मान निधी म्हणजेच PM Kisan Samman nidhi या योजने अंतर्गत शेतकऱ्यांना एका वर्षामध्ये तीन वेळेस एकूण ६००० रुपये मिळतात. पीएम किसान सन्मान निधी योजने अंतर्गत शासन शेतकऱ्यांना २००० रुपयांचा हफ्ता त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करत आहेत. या योजनेचे अर्ज मध्यंतरी काही कारणास्तव बंद झाले होते परंतु आता पुन्हा सुरु झाले आहेत. २००० रुपयांचा हफ्ता मिळविण्यासाठी ऑनलाईन अर्ज कसा करावा या संदर्भातील व्हिडीओ पाहण्यासाठी येथे टच करा.
PM Kisan Samman nidhi संदर्भातील अर्ज पक्रिया.
मोदी सरकारकडून शेतकऱ्यांना मिळणाऱ्या २००० रुपयांच्या हफ्त्यासाठी कोणती प्रोसेस असते ते समजवून घेवूयात.
- pm kisan sanman nidhi.gov.in या संकेत स्थळावर शेतकऱ्यांना त्यांची ऑनलाईन नोंदणी करावी लागते.
- ऑनलाईन अर्ज केल्यानंतर त्या अर्जाची प्रिंट काढावी.
- ऑनलाईन अर्जाची प्रिंट, संबधित कागदपत्रे आणि तलाठी याचा फॉर्म तहसील कार्यालय येथे सादर करावा.
PM Kisan Samman nidhi ऑनलाईन अर्ज करण्याच्या दोन पद्धती.
पीएम किसान सन्मान निधी योजनेचा लाभ मिळविण्यासाठी https://pmkisan.gov.in/ या वेबसाईटवर हा ऑनलाईन अर्ज केला जातो. हा ऑनलाइन अर्ज सीएससी सेंटरवर जावून सादर करू शकता किंवा तुम्ही स्वतः हा अर्ज करू शकता. अर्ज करण्याच्या ह्या दोन पद्धती आपण या ठिकाणी समजावून घेणार आहोत. शेतकऱ्याची जर इच्छा असेल तर शेतकरी स्वतः PM Kisan Samman nidhi योजनेचा अर्ज सादर करू शकतात. खालील दोन पद्धती समजावून घ्या.
PM Kisan Samman nidhi साठी स्वतः अर्ज कसा कराल.
शेतकरी स्वतः PM Kisan Samman nidhi साठी अर्ज करू शकतात. त्यासाठी खालील पद्धतींचा अवलंब करा.
- कॉम्प्युटरमध्ये इंटरनेट सक्रीय असल्याची खात्री करा.
- ब्राउजरच्या युआरएल बारमध्ये PM Kisan Samman nidhi हा शब्द टाईप करा.
- जसे हि तुम्ही वरील किवर्ड टाईप कराल त्यावेळी तुमच्या कॉम्प्युटरच्या स्क्रीनवर पीएम किसान सन्मान निधीची अधिकृत वेबसाइट ओपन होईल.
- या वेबसाईटवर farmers corner या हेडिंगच्या खाली new farmer registration असा एक पर्याय दिसेल त्यावर क्लिक करा.
- जसे हि तुम्ही या पर्यायावर क्लिक कराल त्यावेळी new farmer registration form ओपन होईल.
- या अर्जामध्ये शेतकऱ्यांना त्यांचा मोबाईल नंबर, आधार नंबर, राज्य इत्यादी माहिती टाकावी लागणार आहे. हि सर्व माहिती टाकल्यानंतर send otp या बटनावर क्लिक करायचे आहे.
- शेतकऱ्यांच्या मोबाईलवर एक otp जाईल तो दिलेल्या रकान्यामध्ये टाकून सबमिट या बटनावर क्लिक कार्याचे आहे.
अशा पद्धतीने या ठिकाणी शेतकरी त्यांची नोंदणी करू शकतात. अर्जामध्ये अजून बरीच माहिती भरावी लागणार आहे. हि माहिती कोणकोणती असणार आहे ते जाणून घेवूयात.
शेतकऱ्यांची वैयक्तिक माहिती farmer personal details.
वैयक्तिक माहिती या सदरामध्ये शेतकऱ्याने खालीलप्रमाणे माहिती भरणे आवश्यक आहे.
- शेतकऱ्याने त्यांचे गाव, तालुका, जिल्हा, राष्ट्र, नाव, लिंग आणि कॅटेगरी व्यवस्थित टाकावी.
- शेतकऱ्यांचा प्रकार या मध्ये जर शेतकरी लहान वर्गातील असेल म्हणजे १ ते २ हेक्टर जमीन असेल तर small हा पर्याय निवडावा आणि यापेक्षा मोठा असेल तर other हा पर्याय निवडावा.
- शेतकऱ्याने त्यांचे खाते ज्या बँकेत असेल त्या बँकेचे नाव, ifcs code, खाते नंबर इत्यादी माहिती व्यवस्थित टाकावी.
- शेतकऱ्याने त्यांचा पूर्ण पत्ता, पोस्टल पिनकोड नंबर, ८ अ वरील खाते नंबर, राशन कार्ड नंबर, जन्मतारीख इत्यादी माहिती व्यवस्थित टाकावी.
जमिनीचा तपशिलाची माहिती Land record information
वरील सर्व माहिती भरल्यानंतर शेतकऱ्याने त्यांच्या नावावर जेवढी जमीन असेल त्या संबधीची माहिती व्यवस्थित टाकावी जसे कि
- सर्वे नंबर.
- खाता नंबर.
- शेतकऱ्यांच्या नावावर असलेले क्षेत्र.
कागदपत्रे अपलोड करा.
वरील सर्व माहिती भरल्यानंतर शेतकऱ्यांनी त्यांची कागदपत्रे आवश्यक असलेल्या साईजमध्ये अपलोड करणे आवश्यक आहे. खाली प्रमाणे कागदपत्रे अपलोड करावीत.
- Land Record म्हणजेच सातबारा उतारा.
- आधार कार्ड
- बँक पासबुक
वरील प्रमाणे सर्व कागदपत्रे अपलोड करावीत. कागदपत्रे व्यवस्थित अपलोड केल्यानंतर self declaration form समोरील चौकटीमध्ये टिक करावे आणि सर्वात शेवटी दिसत असलेल्या सेव्ह या बटनावर क्लिक करावे.
सी.एस.सी. आयडी आणि पासवर्ड चा उपयोग करून खालील प्रमाणे सादर करा पीएम किसान सन्मान निधीचा अर्ज.
- परत एकदा तुमच्या कॉम्प्युटरच्या ब्राउजरमध्ये टाईप पीएम किसान सन्मान निधी
- वेबसाईट ओपन झाल्यानंतर csc login या पर्यायावर क्लिक करा.
- सीएससी युजर आयडी, पासवर्ड आणि कॅपचा कोड टाकून लॉग इन करा.
- ज्या पद्धतीने new farmer registration या पर्यायावर क्लिक करून अर्ज भरावा लागतो अगदी त्याच पद्धतीने सीएससी लॉगीन करून हा पीएम किसान सन्मान निधीचा अर्ज भरावा लागणार आहे दोन्ही ठिकाणी सारखीच पद्धत आहे.
पेमेंट प्रोसेस जाणून घ्या.
- पेमेंट करण्यापूर्वी तुमच्या सीएससीच्या वॉलेटमध्ये पुरेशी रक्कम असल्याची खात्री करा.
- अर्ज भरल्यानंतर make पेमेंट या बटनावर क्लिक करा.
- आधार नंबर आणि कॅपचा कोड सर्च करा.
- आता तुम्ही जो अर्ज सादर केलेला आहे त्या संदर्भातील संपूर्ण माहिती तुम्हाला तुमच्या स्क्रीनवर दिसेल. या ठिकाणी make payment असा पर्याय दिसेल त्यावर क्लिक करा.
- तुमचा सीएससी आयडीचा पासवर्ड या ठिकाणी टाका आणि validate या बटनावर क्लिक करा.
- त्यांतर wallet pin टाका.
- wallet pin टाकल्यानंतर पेमेंट केल्याचे डीटेल्स दिसेल ते प्रिंट करून घ्या.
- ज्या शेतकऱ्याचा ऑनलाईन अर्ज भरलेला आहे त्या अर्जाची प्रिंट काढून घ्या आणि सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे संबधित अधिकारी साहेबांकडे हा अर्ज सादर करा.
अशा प्रकारे सीएससी लॉगीन आयडी आणि पासवर्ड वापरून तुम्ही हा अर्ज सादर करू शकता.