जुलै-ऑक्टोबर २०२१ मध्ये झालेल्या अतिवृष्टी नुकसान भरपाई यादी 2021 जाहीर झालेली आहे. बाधित शेतकऱ्यांना NDRF च्या तरतुदी नुसार पात्र अनुदान वाटप यादी आलेली आहे. तुम्ही ज्या जिल्ह्याचे रहिवासी असाल त्या जिल्ह्याच्या अधिकृत संकेतस्थळावर हि यादी तुम्हाला बघावयास मिळेल. शेतकरी बंधुंनो सध्या जी यादी प्रकाशित झालेली आहे ती औरंगाबाद जिल्ह्यातील सोयगाव तालुक्यातील आहे. ज्या प्रमाणे सोयगाव तालुक्याची यादी या प्रकाशित करण्यात आलेली आहे अगदी अशाच प्रकारे इतर तालुक्यांच्या याद्या ह्या ज्याच्या त्याच्या जिल्ह्याच्या संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात येणार आहेत. अतिवृष्टी अनुदान वाटप यादी तुमच्या मोबाईलवर डाउनलोड कशी करावी या संदर्भातील व्हिडीओ बघण्यासाठी येथे टच करा.
अतिवृष्टी नुकसान भरपाई यादी 2021 खालीलप्रमाणे बघा.
- सगळ्यात अगोदर तुमच्या मोबाईलमध्ये किंवा कॉम्प्युटरमधील क्रोम किंवा जे तुम्ही वापरत असाल ते ब्राउजर उघडा.
- ब्राउजरच्या सर्च बारमध्ये तुमच्या जिल्ह्याचे नाव आणि एक्सटेन्शन gov.in हे टाका.
- उदाहरणार्थ https://aurangabad.gov.in/ हा वेब ॲड्रेस टाका त्यानंतर एंटर करा.
- वेबसाईटची भाषा इंग्रजी असेल तर स्क्रीनच्या उजव्या बाजूच्या कोपऱ्यामध्ये जावून मराठी करून घ्या.
- वेबसाईटच्या नेव्हिगेशन बारवर दस्ताऐवज हा पर्याय शोधा.
- दस्ताऐवज पर्यावर क्लिक करताच या ठिकाणी तुमच्या जिल्ह्याची जुलै-ऑक्टोबर २०२१ मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे बाधित शेतकऱ्यांना NDRF च्या तरतुदी नुसार पात्र अनुदान वाटप यादी या ठिकाणी तुम्हाला दिसेल तुम्ही ज्या जिल्ह्यातील असाल किंवा तालुक्यातील असाल त्या पर्यायासमोरील pdf आयकॉनवर क्लिक करा आणि हि यादी तुमच्या मोबाईल किंवा कॉम्प्युटरमध्ये डाउनलोड करून घ्या.
विविध शासकीय योजनांची माहिती तुमच्या मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या फेसबुक ग्रुप मध्ये जॉईन व्हा.
तुमच्या जिल्ह्याची अतिवृष्टी नुकसान भरपाई यादी देखील अशीच बघा.
शेतकरी बंधुंनो या ठिकाणी अतिवृष्टी अनुदान वाटप यादी डाउनलोड कशी करावी या बद्दला आपण माहिती जाणून घेतलेली आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील सोयगाव तालुक्याची हि अतिवृष्टी अनुदान वाटप जिल्ह्याच्या संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आलेली आहे. तुम्ही ज्या जिल्ह्यातील असाल त्या जिल्ह्याच्या संकेतस्थळावर तुम्ही तुमची यादी बघू शकता. यादी कशी बघावी याबद्दल अजूनही तुम्हाला माहिती समजली नसेल तर खालील व्हिडीओ पहा आणि त्याप्रमाणे कृती करा म्हणजे हि यादी कशी बघावी या संदर्भात तुम्हाला महिती मिळेल.
शासनाच्या अधिकृत वेबसाईटवरील नुकसान भरपाई यादी बघण्यासाठी येथे टच करा.
इतर जिल्ह्याच्या याद्या देखील लवकरच जाहीर होणार.
बरेच शेतकरी बांधव अतिवृष्टी अनुदान वाटप यादी कधी जाहीर होणार याकडे लक्ष ठेवून होते. सध्या औरंगाबाद जिल्ह्यातील सोयगाव तालुक्याची अतिवृष्टी अनुदान वाटप यादी जिल्ह्याच्या संकेत स्थळावर जाहीर करण्यात आलेली असून लवकरच इतर जिल्ह्याच्या याद्या देखील जाहीर होतील अशी अशा करूयात.