आज विराट कोहली याचा वाढदिवस. विराट कोहली हे नाव माहित नाही असा व्यक्ती कदाचितच सापडेल. विराट कोहलीने त्यांच्या आयुष्यात अनेकदा चढ उतार बघितलेले आहेत. जेंव्हा कामगिरी चांगली केली तेंव्हा चाहत्यांनी डोक्यावर घेतले आणि कामगिरी खराब झाली तर खाली सुद्धा आदळले. जेंव्हा कधी विराट कोहली वर टीका झाली असेल तर त्याने त्याच्या टीकाकारांना त्याच्या बॅटने उत्तर देऊन शांत केले असेल.
५ नोव्हेंबर १९८८ हा विराट प्रेम कोहली यांचा जन्मदिवस. विराटच्या वडिलांचे नाव प्रेम आहे तर आईचे नाव सरोज आहे. विराटचे वडील व्यवसायाने वकील होते तर त्यांची आई गृह्णी होत्या. विराटचा मोठा भाऊ विकास आणि बहिण भावना आहे. पंजाबी कुटुंबामध्ये जन्मलेल्या या अवलियाने क्रिकेटविश्वामध्ये संपूर्ण जगाचे लक्ष वेधून घेतलेले आहे.
विराटचे शिक्षण विशाल भरती पब्लिक स्कूल (Vishal Bharti Public School). राजकुमार शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली विराटने पश्चिम दिल्ली क्रिकेट अकॅडमीमध्ये West Delhi Cricket Academy क्रिकेटचे धडे गिरवायला सुरुवात केली. सध्या तो भारतीय संघाचा कर्णधार असून त्याच बरोबर आयपीएल मधील आरसीबी संघाचा देखील कर्णधार आहे. पॉली उम्रीगर ट्रॉफीसासाठी विराट कोहली सुरुवातीला दिल्ली संघाकडून खेळला. या स्पर्धेत त्याने दोन शतके आणि दोन अर्धशतके देखील केले होते.
मित्रांनो विराट कोहलीच्या शतकांची आणि अर्धशतकांची गोळाबेरीज करण्यापेक्षा तो माणूस म्हणून कसा आहे हे बघितल्यास नक्कीच आनंद होईल. इंग्रजीमध्ये अशी एक म्हण आहे कि form is temporary but class is permanent. अनेक वेळा विराट फॉर्ममध्ये नसताना अनेकांनी त्यावर टीका केली परंतु शांत बसला तो कोहली कसला याच भावनेतून प्रेरित होऊन त्याने त्याच्या खेळीच्या शैलीमध्ये अमुलाग्र बदल केले आणि तो आज यशाच्या शिखरावर जावून पोहचलेला आहे.
मैदानातील खेळ असो कि जीवनाचा खेळ जोडीदार हा लागतोच. विराट कोहलीच्या जीवनात देखील मोठी पार्टनरशिप करण्यासाठी पार्टनर म्हणून अनुष्का शर्माने प्रवेश केला. या दाम्पत्यांना एक गोंडस बाळ देखील आहे त्यामुळे विराटवर आणखी एक जबाबदारी वाढली असून ती तो यशस्वीपणे सांभाळत देखील आहे. खेळाडू, कर्णधार, मुलगा, पती, वडील अशा अनेक भूमिका तो यशस्वीपणे सांभाळत आहे. मैदानामध्ये जितका आक्रमकपण त्यामध्ये दिसतो तितकीच किंबहुना त्यापेक्षा जास्त शीतलता त्यांच्या मनामध्ये भरलेली आहे. वैयक्तिक खेळापेक्षा देशहिताला नेहमीच विराट प्राधान्य देत आलेला आहे आणि भविष्यातदेखील तो देत राहील अशी आशा आहे. विराट कोहलीला दीर्घायुष्यासाठी हार्दिक शुभेच्छा happy birthday virat kohli.